38
यहूदा अनी तामार
त्या येळले यहूदा आपला भाऊसले सोडीसनं खालना प्रदेशमा गया अनी अदुल्लामकर हिरा नावना माणुसना घर जाईसनं राहिना. तठे शूवा नावना एक कनानी माणुसनी पोर यहूदानी नजरमा पडनी; त्यानी ती बायको करी लिधी अनं तो तिनाजोडे गया. ती गर्भवती व्हईसनं तिले पोऱ्या व्हयना; त्यानी त्यानं नाव एर ठेवं. ती परत गर्भवती व्हयनी अनं तिले पोऱ्या व्हयना; तिनी त्यानं नाव ओनान ठेवं; आखो तिले एक पोऱ्या व्हयना; त्यानं नाव तिनी शेला ठेवं तो व्हयना तवय यहूदा कबीज आठे राही राहिंता.
मंग यहूदानी आपला पहिला पोऱ्या एर याले बायको करी दिधी, तिनं नाव तामार अस व्हतं; पण यहूदाना पहिला पोऱ्या एर हाऊ परमेश्वरना नजरमा दुष्ट व्हता म्हणीसनं परमेश्वरनी त्याले मारी टाकं. मंग यहूदा ओनानले बोलना, आपली भावजयीनाजोडे जाय अनी दिरना धर्मले धरीन भाऊना वंश चालाव; पण ओनान याले माहित व्हतं की, संतती व्हयनी तरी मनी नही व्हवावु, म्हणीसनं तो त्यानी भावजयीनाजोडे जाये तवय आपलं वीर्य जमीनवर पाडी दिये, त्याना हेतु हाऊ व्हता की, आपला भाऊले आपला बीज देवानं नही. 10 हाई त्यानं कृत्य परमेश्वरले दुष्ट वाटनं म्हणीसनं त्यानी त्याले बी मारी टाकं. 11 यहूदा त्यानी सून तामार हिले बोलना, मना पोऱ्या शेला वयमा येस तोपावत तुना बापना घर विधवा बनीसन राय; कारण त्याले वाटनं की, शेला बी त्याना भाऊनागत नको मराले, मंग तामार आपला बापना घर जाईन रावाले लागनी.
12 बराच काळ व्हवावर यहूदानी बायको जी शूवानी पोर व्हती ती मरण पावनी; तिनाकरता शोक कराना संपावर यहूदा त्याना मित्र अदुल्लामकर हिरा यानासंगे तिम्रा आठे आपला मेंढरंसना लोकर कातरनारासकडे गया. 13 तवय तामार हिले कोणीतरी सांगं की, तुना सासरा आपला मेंढरंसना लोकर कातराकरता तिम्रा आठे जाई राहिना शे. 14 तवय तिनी विधवाना कपडा उतारी दिधं अनी बुरखा लिसन आपला शरीरले झाकी लिधं अनी तिम्राना रस्तावरना एनाईम गावना वेशीजोडे ती जाईन बसनी; शेला जवान व्हई जायेल तरी बी माले अजून त्यानी बायको करं नही आशे तिले दखायनं. 15 यहूदानी तिले दखं, पण हाई कोणीतरी वेश्या व्हई; आशे त्याले वाटनं कारण तिनी आपला तोंड झाकेल व्हतं. 16 तवय हाई आपली सून शे हाई त्याले माहित नव्हतं, म्हणीसनं तो वाटवरतीन तिनाकडे वळीसन बोलना, चाल माले तुनाजोडे येऊ दे, तवय ती बोलनी, मनाजोडे येसी तर माले काय दिसी? 17 तो बोलना, मी मना कळपमाईन एक बच्चा तुले दि धाडसु; ती बोलनी, ते धाडस तोपावत मनाजोडे काय गहाण ठेवसी? 18 तो तिले बोलना, मी तुनाजोडे काय गहाण ठेवु? ती बोलनी, तुनी एखादी निशानी, गोफ अनं हातमाधली काठी दे, हाई दिसन तो तिनाजोडे गया तवय तिले त्यानापाईन गर्भ राहिना. 19 तठेन ती निंघी गयी अनी आपला बुरखा काढीसन विधवाना कपडा परत घाली लिधात. 20 मंग त्या बाईपाईन आपला गहाण आणाकरता त्याना मित्र अदुल्लामकर यानाकडे यहूदानी एक बच्चा दि धाडं; पण त्याले ती सापडनी नही. 21 मंग त्यानी तठला लोकसले ईचारं, एनाईम गावनाजोडे रस्तावर एक वेश्या व्हती ती कोठे शे? त्या बोलनात, आठे कोणतीच वेश्या नव्हती. 22 मंग तो यहूदाकडे परत जाईसन बोलना, माले ती काही सापडनी नही; तठला लोकेसनी बी सांगं, आठे कोणतीच वेश्या नव्हती. 23 तवय यहूदा बोलना, ते वस्तु तिनाजोडेच राहु दे, नहीतर तठला लोके आपली टिंगल करतीन; मी तर बच्चा धाडं, पण तुले ती सापडनी नही.
24 हाई गोष्ट व्हवाले जोडेजोडे तीन महीना व्हई गया तवय कोणीतरी यहूदाले सांगं की, तुनी सून तामार हिनी वेश्याकर्म करं अनं त्या जारकर्ममुये तिले दिवस जायेल शेतस, तवय यहूदा बोलना, तिले बाहेर काढीसन जाळी टाका. 25 तिले बाहेर काढं तवय तिनी आपला सासराले निरोप धाडं की, ह्या वस्तु ज्या माणुसन्या शेतस त्यानापाईन माले दिवस राहेल शेतस; आखो ती बोलनी, डोळा नीट उघाडीसनं दखा, हाई निशान हाऊ गोफ अनं हाई काठी कोणी शे ती. 26 यहूदा त्या वस्तु वळखीसन बोलना, ती मनापेक्षा नितीमान शे; कारण मी मना पोऱ्या शेला तिले नवरा करी दिधा नही; अनी त्यानी परत कधीच तिनासंगे संबंध करं नही. 27 तिना प्रसूती येळले तिना पोटमा जुळा पोऱ्या शेतस अश दिसी वनं. 28 प्रसूतीना येळले एक लेकरूना हात बाहेर वना तवय सुइणीनी त्याना हातले लाल सूत बांधीसन सांगं, हाऊ पहिले जन्मना. 29 पण अश व्हयनं की, जवय त्यानी हात आखडाई लिधं तवय त्याना भाऊ पहिले जन्मना; तवय सूईण बोलनी, तू आपलाकरता कश वाट काढा? म्हणीन त्यानं नाव पेरेस अश पडनं. 30 मंग ज्याना हातले लाल सूत बांधेल व्हता तो जन्मना अनी‍ त्यानं नाव जेरह ठेवं.
38:30 मत्तय 1:3