48
याकोब एफ्राइम अनं मनश्शे यासले आशिर्वाद देस
या गोष्टी व्हवावर कोणी योसेफले सांगं, की, "दख तुना बाप आजारी शे, "तवय तो आपला दोन्ही पोऱ्या मनश्शे अनं एफ्राईम यासले संगे लिसन त्यानाकडे गया. आपला पोऱ्या योसेफ आपलाकडे वना शे, अश कोणीतरी याकोबले माहिती सांगी, तवय याकोब स्वतःले संभाळीसन पलंगवर बसना. याकोब योसेफले बोलना, "सर्वसमर्थ देवनी कनान देशना लूज शहर आठे माले दर्शन दिसन आशिर्वाद दिधा." तो माले बोलना, "दख, मी तुले फलद्रूप करीसन बहुगुणित करसु अनी तुनापाईन राष्ट्रसमुदाय उत्पन्न करसु अनी तुनामांगे तुना संततीले हाऊ देश कायमनाच वतन करी दिसु." मी मिसरमा तुनाकडे येवाना पहिले तुले ज्या दोन पोऱ्या मिसरमा व्हयनात त्या मनाच शेतस, जश रऊबेन अनं शिमोन तसच एफ्राईम अनं मनश्शे ह्या बी मनाच शेतस. त्यासनामांगे ज्या पोऱ्या तुले व्हतीन त्या तुना ऱ्हाईत, त्यासना वतन त्यासना भाऊसना नावतीन चाली. मी पदन आठेन ई ऱ्हायंतु तवय वाटमाच एफ्राथ गावले पोहचाना अगोदर थोडंच दूर कनान देशमा राहेल मरी गयी, अनी मी तिले तठेच एफ्राथना वाटले म्हणजे बेथलेहेममा मुठमाती दिधी.
जवय याकोबनी योसेफना दोन पोऱ्यासले दखं, तवय त्यानी ईचारं, "या कोण शेतस?" मंग योसेफ आपला बापले बोलना, "ह्या मना पोऱ्या शेतस, देवनी माले ह्या मिसर देशमा देयल शेतस, तवय तो बोलना, "त्यासले मनाजोडे आण म्हणजे मी त्यासले आशिर्वाद दिसु." 10 याकोबनी नजर वयना मानतीन मंद व्हई जायेल व्हती, म्हणीन त्याले बराबर दखाई नही राहिंतं, योसेफनी त्यासले त्यानाजोडे लयं, तवय त्यानी त्यासना मुका लिसन त्यासले मिठ्ठी मारी. 11 याकोब योसेफले बोलना, "माले आशा नव्हती की, मी तुनं तोंड दखसु; पण दख, देवनी माले तुनी संतती बी दखाडी देयल शे." 12 मंग योसेफनी त्यासले त्याना मांडीवरीन बाजुले करं अनी जमिनवर झुकीसन नमन करात. 13 मंग त्या दोन्हीसले एफ्राईमले आपला उजवी बाजुले म्हणजे याकोबनी डावी बाजुले अनी मनश्शेले आपला डावी बाजुले म्हणजे याकोबनी उजवीकडे अश धरीन त्यानाजोडे आणं. 14 याकोबनी आपला उजवा हात पुढं करीन एफ्राईमना म्हणजे धाकला पोऱ्याना डोकावर ठेवा; अनी आपला डावा हात मनश्शेना डोकावर ठेवा; त्यानी आपला हात उजवाडावा करात; मनश्शे तर मोठा पोऱ्या व्हता. 15 त्यानी योसेफले आशिर्वाद दिसन सांगं, की,
"ज्या देवनासंगे मना बाप
अब्राहाम अनं इसहाक चालनात,
मना जन्मपाईन ज्या देवनी आजपावत मना सांभाळ करेल शे.
16 जो दूतनी माले सर्व वाईटपाईन सांभाळं
तो या पोऱ्यासले आशिर्वाद देवो,
अनी ह्या मना अनी
तुना पुर्वज अब्राहाम अनं
इसहाक यासनं नाव ह्या चालवोत,
अनी पृथ्विना मध्यभागमा यासनी मोठी वाढ व्हवो.
17 आपला बापनी एफ्राईमना डोकावर उजवा हात ठेयेल शे हाई योसेफनी दखं, तवय त्याले वाईट वाटनं, अनी त्यानी एफ्राईमना डोकावरना बापना हात काढीन मनश्शेना डोकावर ठेवाकरता त्यानी तो धरा. 18 योसेफ आपला बापले बोलना, "बाबा, अस नका करा, मोठा हाऊ शे, याना डोकावर आपला हात ठेवा."
19 त्यानं बोलनं, नाकारीसन त्याना बाप त्याले बोलना, "हाई माले माहित शे, त्यानं बी एक राष्ट्र व्हई अनी तो बी महान व्हई, पण त्याना धाकला भाऊ त्यानापेक्षा मोठा व्हई अनी त्याना वंशजमाईन राष्ट्रसना समुदाय उत्पन्न व्हई."
20 त्याच दिन त्यानी त्यासले हाई सांगीसन आशिर्वाद दिधा, याकोब लोक तुना नाव लिसन हाई आशिर्वाद देतीन, एफ्राईम अनं मनश्शे यासनासारखा देव तुना करो, अश प्रकारमा त्यानी एफ्राईमले मनश्शेपेक्षा श्रेष्ठ करा.
21 याकोब योसेफले बोलना, "दख, मी तर आते मरसु, पण देव तुनासंगे राही अनी तुमले तुमना पुर्वजसना देशले परत लई जाई. 22 मी तुले तुना भाऊसनापेक्षा जमीनना एक वाटा जास्त देस, तो मी मना तलवारना अनं धनुष्यना जोरवर अमोरी लोकसपाईन लेयल शे.
48:3 उत्पती 28:13,14 48:7 उत्पती 35:16,19