49
याकोबना शेवटला शब्द
1 मंग याकोबनी आपला पोऱ्यासले बलाईसन सांगं, "तुम्हीन सर्वजन एकत्र जमा म्हणजे पुढला काळले काय व्हई ते मी तुमले सांगस,
2 "हे याकोबना पोऱ्यासवंन, एकत्र ईसन ऐका;
अनी आपला बाप याकोब याना गोष्टी ध्यान दिसन ऐका.
3 हे रऊबेन, तू मना ज्येष्ठ, मना बळ,
मना पौरूषानं पहिलं फळ शे;
प्रतिष्ठानं अनी सामर्थ्यनं उत्तम भाग तुच शे.
4 तू पाणीनागत चंचल शे, त्यामुये तुले श्रेष्ठत्व भेटावू नही; कारण तू आपला बापना खाटवर चढनास; तू ती भ्रष्ट करेल शे, तो ते मनी खाटवर चढना.
5 शिमोन अनं लेवी ह्या भाऊ भाऊ शेतस; त्यासन्या तरवारी अत्याचारना हत्यारं शेतस.
6 मना जीव, त्यासना मसलतीमा जाऊ नको, मनी महिमा त्यासनी मंडळीमा नको भेटाले, कारण त्यासनी रागना भरमा मनुष्यवध करेल शे; त्यासनी उन्मत पणतीन बैलसना पायन्या शिरा तोडात.
7 त्यासना रागले धिक्कार राव्हो, कारण तो भयानक शे; त्यासना क्रोधले धिक्कार राव्हो, कारण तो निष्ठुर शे; मी त्यासले याकोबमा पांगापांग अनी याकोबमा त्यासले येगयेगळा करी दिसु.
8 हे यहूदा तुना भाऊ तुना धन्यवाद करतीन; तुना हात तुना शत्रुसना मानगुटी धरी; तुना बापना पोऱ्या तुनापुढं नमतीन.
9 यहूदा सिंहासना बच्चा शे; मना पोऱ्या, तू शिकार करीन डोंगरमा जायेल शे; तो सिंहासनासारखा सिंहणीसारखा दबीन बसेल शे, त्याले कोण छेडी?
10 यहूदाकडनं राजदंड ज्यानं शे, तो येवापावत ते त्यानाकडीन जावाव नही, राजदंड त्याना पायासमाईन ढळावु नही; राष्ट्रना लोके त्यानी आज्ञा मानतीन.
11 तो आपला जवान गधडाले द्राक्षरसनावेलले, अनी आपला गधडीनना शिंगरूले उत्तम द्राक्षरसनावेलले बांधी ठेई; तो आपला कपडा द्राक्षरसमा, अनी आपला पोषाख द्राक्षरसमा धुई टाकी.
12 त्याना डोळा द्राक्षरसघाई चमकतीन; अनी त्याना दात दुधघाई धवळा व्हतीन.
13 जबुलून समुद्रकिनारले वस्ती करी; तो जहाजसनं बंदरच व्हई जाई; त्यानी सरहद्द सीदोनपावत जाई.
14 इस्साखार ताकदवान गाढव शे; तो मेंढवाडासमा झोपी ऱ्हास;
15 त्यानी दखं, की, विश्रामगृह चांगलं शे, अनी हाऊ देश मनोहर शे अश दखीन, भार वाहा करता त्यानी आपला खांदाले झुकाड; तो बिगार काम करनारा दास बनी गया.
16 दान याकोबना एक वंश राहिसन आपला लोकसना तो न्याय करी.
17 दान हाऊ मार्गवरना साप, वाटवरना नाग व्हई, हाऊ घोडासना टासले दंश करस तवय त्यानावरना स्वार उलटीन मांगे पडतस.
18 हे परमेश्वर, मी तुनाकडीन उध्दार व्हवानी प्रतिक्षा करी ऱ्हायनु शे.
19 गाद यानावर हल्लाखोरसनी टोळी हल्ला करी; तरी पण तो मांगे फिरीसन त्यासना मांगे ज्या शेतस त्यासवर हामला करी.
20 आशेरानं अन्न पोष्टिक व्हई तो राजाले योग्य अस भोजन पुराई.
21 नफताली हाई मोकळी सुटेल एक हरीण शे, तो चांगलं भाषण करनारा बनी.
22 योसेफ हाऊ फळझाडसनी शाखा शे, निर्झराजोडे लायेल फळझाडासनी शाखा शे, त्याना डहाळ्या भितवर पसरेल शेतस.
23 धनुष्य चालाडनारासनी त्याले भलतं त्रास दिधा, त्याले बाण मारात, त्याना मांगे पडी गयात;
24 पण त्यानं धनुष्य मजबूत राहिना; याकोबना समर्थ देव, मेंढपाळ, याकोबना खडक याना नावतीन त्याना भुज स्फुरण पावना.
25 तुना सहाय्य करनारा तुना बापना देव, तुले वरदान देनारा सर्वसमर्थ देव यानाकडीन हाई व्हई, वरतीन आकाशनी अनं खालतीन जलाशयना वरदाने तो तुले दि, आंगवर पिनारासना अनं पोटना फळसना वरदाने तो तुले दि.
26 तुना बापना वरदाने प्राचीन पर्वतसना वरदानसपेक्षा श्रेष्ठ शेतस; ती सनातन डोंगरसपाईन प्राप्त व्हनारा इष्ट वस्तूसपेक्षा श्रेष्ठ शेतस; हाई आशिर्वाद योसेफना मस्तकवर राही, आपला भाऊबंधमा जो प्रमुख त्याना शिरी येवो.
27 बन्यामिन हाऊ फाडी टाकनारा लांडगा शे; सकायमा तो शिकार खाई टाकी, संध्याकाळना लुटीना वाटा करी.
28 ह्या सर्व याकोबना बारा वंश शेतस, त्यासना बाप त्यासले आशिर्वाद देतांना ह्या वचने बोलना, प्रत्येकले त्यासनी योग्यता प्रमाणे त्यानी आशिर्वाद दिधा.
याकोबनं मृत्यु अनं त्यानं दफन
29 मंग त्यानी त्यासले आज्ञा दिधी की, मी आपला पुर्वजसले जाईन भेटसु तवय माले एफ्रोन हित्ती याना शेतमाधली गुफामा मना बापनाजोडे माले मूठमाती देवानं.
30 कनान देशमाधली मम्रेसमोरनी मकपेला नावनी वावरमाधली गुफा जी अब्राहामना वावरनासंगे एफ्रोन हित्ती यानाकडीन आपला मालकीन कबरस्तान व्हवाले पाहिजे म्हणीन ईकत लियेल व्हती ती हाई शे.
31 तठेच अब्राहाम अनं त्यानी बाई सारा यासले मूठमाती देयल व्हतं; इसहाक अनं त्यानी बाई रिबका यासले बी तठेच मूठमाती देवामा येल व्हतं तठेच मी लेआले बी मूठमाती दिधी.
32 ते वावर अनं त्यामाधली गुफा हाई हेथीकडीन ईकत लेयल शेतस.
33 आपला पोऱ्यासले आज्ञा देवावर याकोबनी पलंगवर आपला पाय लिधात अनं प्राण सोडा अनी आपला पुर्वजसले जाईन भेटना.