5
आदामनी वंशावळी
(१ इतिहास 1:1-4)
आदामनी वंशावळीनी नोंद याप्रकारतीन. देवनी मानव उत्पन्न करा त्या येळले त्यानी तो स्वतःनामायक दिसणारा असा करा, त्यानी त्यासले नर अनं नारी अश उत्पन्न करात अनं त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले उत्पन्न करात त्या येळले त्यासले आदाम हाई नाव दिधं. आदाम एकशेतीस वरीसना व्हवावर त्याले त्यानाशी सदृश, त्याना प्रतिरूपना पोऱ्या व्हयना, त्याना नाव त्यानी शेथ ठेवा; शेथ व्हवावर आदाम आठशे वरीस जगना, अनं त्याले अजुन पोऱ्या अनं पोऱ्यी व्हयनात. आदाम जोडे जोडे नऊशेतीस वरीस जगना, मंग तो मरण पावना.
शेथ एकशेपाच वरीसना व्हवावर त्याले अनोश व्हयना; अनोश व्हवावर शेथ आठशेसात वरीस जगना, अनं त्याले अजुन पोऱ्या अनं पोरी व्हयनात. शेथना आयुष्य जोडेजोडे नवशेबारा वरीसना व्हयना; मंग तो मरण पावना.
अनोश नव्वद वरीसना व्हयना तवय त्याले केनान व्हयना. 10 केनान व्हवावर अनोश आठशेपंधरा वरीस जगना, अनं त्याले अजुन पोऱ्या अनं पोरी व्हयनात; 11 अनोशना आयुष्य जोडेजोडे नऊशेपाच वरीसना व्हयना; मंग तो मरण पावना.
12 केनान सत्तर वरीसना व्हवावर त्याले महललेल व्हयना; 13 महललेल व्हवावर केनान आठशेचाळीस वरीस जगना, अनं त्याले अजुन पोऱ्या अनं पोरी व्हयन्यात; 14 केनान जोडेजोडे नऊशेदहा वरीसना व्हयना; मंग तो मरण पावना.
15 महललेल पासष्ट वरीसना व्हवावर त्याले यारेद व्हयना. 16 यारेद व्हवावर महललेल आठशेतीस वरीस जगना, अनं त्याले अजुन पोऱ्या अनं पोरी व्हयनात; 17 महललेल याना आयुष्य जोडेजोडे आठशेपंचाण्णव वरीसना व्हयनात, मंग तो मरण पावना.
18 यारेद एकशेबासष्ट वरीसना व्हवावर त्याले हनोख व्हयना. 19 हनोख व्हवावर यारेद आठशे वरीस जगना, अनं त्याले अजुन पोऱ्या अनं पोरी व्हयनात; 20 यारेदना जोडेजोडे नऊशेबासष्ट वरीसना व्हयनात, मंग तो मरण पावना.
21 हनोख पासष्ट वरीसना व्हवावर त्याले मथुशलह व्हयना; 22 मथुशलह व्हवावर हनोख तीनशे वरीस देवनासोबत चालना, अनं त्याले अजुन पोऱ्या अनं पोरी व्हयनात. 23 हनोखना आयुष्य जोडेजोडे तीनशेपासष्ट वरीसना व्हयनात; 24  हनोख देवनासोबत चालना, त्यानानंतर तो जगमा नव्हता, कारण देव त्याले ली गया.
25 मथुशलह एकशेसत्याऐंशी वरीसना व्हवावर त्याले लामेख व्हयना. 26 लामेख व्हवावर मथुशलह सातशेब्यायशी वरीस जगना, त्याले अजुन पोऱ्या अनं पोरी व्हयनात; 27 मथुशलहना आयुष्य जोडेजोडे नऊशेएकुणसत्तर वरीसना व्हयनात, मंग तो मरण पावना.
28 लामेख एकशेब्यायशी वरीसना व्हवावर त्याले पोऱ्या व्हयना; 29 त्याना नाव त्यानी नोहा *अश ठेवात, तो बोलना, जी भुमी परमेश्वरनी शाप ठराई तिनासंबधना आमनं काम अनं आमनं हातनं कष्ट याविषयी हाऊ आमनं सांत्वन करी. 30 नोहा व्हवावर लामेख पाचशे पंचाण्णव वरीस जगना; अनं त्याले अजुन पोऱ्या अनं पोरी व्हयनात. 31 लामेखना आयुष्य जोडेजोडे सातशेसत्ताहत्तर वरीसना व्हयनात; मंग तो मरण पावना. 32 नोहा पाचशे वरीसना व्हयना तवय त्याले शेम, हाम, अनं याफेथ ह्या पोऱ्या व्हयनात.
5:1 उत्पती 1:27 5:2 मत्तय 19:4; मार्क 10:6 5:24 इब्री 11:5 * 5:29 नोहा आराम देनारा