6
मानवनी दुष्टाई
नंतर पृथ्वीवर मानवनी वाढ व्हवाले लागनी अनी त्यासले पोऱ्या अनं पोरी व्हयनात. तवय मानव पोरी देखन्या शेतस अश देवपुत्रसनी दखं, अनं त्यासमाईन त्यासले ज्या पटन्यात त्या त्यासनी बायका कऱ्यात. तवय परमेश्वर देव बोलना, मनुष्य भ्रांत व्हवामुये मना आत्मानी त्यानाठायी सर्वकाळ सत्ता रावावु नही; तो शरीरधारी शे, पण त्याले मी एकशेवीस वरीसना काळ दिसु. त्या काळले पृथ्वीवर महाकाय व्हतात, पुढे देवपुत्र मानव पोरीसना जोडे गयात तवय त्यासले पोऱ्या व्हयनात, त्या प्राचीन काळना वीर अनं नावाजेल पुरूष व्हई गयात.
पृथ्वीवर मानवनी दुष्टाई खुप शे, त्यासन्या मनमाधल्या येनाऱ्या सगळ्या कल्पना मात्र एकसारख्या वाईट शेतस अश परमेश्वर देवनी दखं. म्हणीन मानवले पृथ्वीवर बनाडाबद्दल परमेश्वरले अनुताप व्हयना, अनी त्याना चित्तले खेद व्हयना. तवय परमेश्वर बोलना, "मी बनाडेल मानवले पृथ्वीवरीन नष्ट करसु; मानव, पशु, रांगनारा प्राणी, आकाशमाधला पक्षी ह्या सगया नष्ट करसु, कारण त्यासले बनाडाना माले अनुताप व्हई राहिना शे." पण नोहावर परमेश्वर देवनी कृपादृष्टी व्हती.
नोहा तारू बनाडस
नोहानी वंशावळी याप्रकारे नोहा हाऊ आपला काळना लोकसमा नितीमान अनं सात्विक मनुष्य व्हता; नोहा देवनासोबत चाले. 10 नोहाले शेम, हाम, अनं याफेथ अश तीन पोऱ्या व्हयनात. 11 त्या काळले देवना नजरमा पृथ्वी भ्रष्ट व्हयेल व्हती; ती जासजुलुमघाई भरेल व्हती. 12 देवनी पृथ्वीकडे दखा, तवय ती भ्रष्ट व्हई जायेल व्हती, कारण पृथ्वीवरला सगया प्राणीसनी आपलं चालचलणूक बिघाडी लेयल व्हती.
13 मंग देव नोहाले बोलना, सर्वा प्राणीसना नष्ट कराना विचार मना मनमा येल शे, कारण त्यासनामुये पृथ्वीवर जाचजुलुम व्हई राहिना शे, दख, मी पृथ्वीनासंगे त्यासना नाश करसु. 14 तु आपलाकरता गोफेर लाकुडना तारू कर; त्या तारूमा खोल्या बनाड्यात अनी त्यासले मजारतीन अनं बाहेरतीन डांबर लावं. 15 तारूले या प्रकारेतीन बनाड, त्यानी लांबी तीनशे हात, रूंदी पन्नास हात, अनं उंची तीस हात अश कर. 16 तारूले उजेडकरता खिडकी बनाड, तिना माथा वरपाईन एक हात राही अश ती कर; तारूना एक बाजुले दार ठेव; त्याले खालना, दुसरा अनं तिसरा अश ताल बनाड. 17 दख, ज्यासनामा प्राण शे, अश सर्वा देहधारी आकाशना खालतीन नष्ट कराना म्हणीसन मी पृथ्वीवर जलप्रलयना पाणी लवसु; पृथ्वीवर जे काही शे ते नष्ट व्हई. 18 तरी पण मी तुनासंगे आपला करार स्थापन करस; तु आपला पोऱ्या, आपली बायको, अनं आपल्या सुना यासले लिसन तारूमा जा. 19 सर्वा प्राणीसना जातीमाईन नर अनं मादी अश दोन दोननी जोडी जिवत ऱ्हावाकरता आपलासंगे तारूमा ली जाय. 20 पक्षीसना प्रत्येक जातीमाईन, पशुसना प्रत्येक जातीमाईन अनी जमीनवर रांगनारा प्राणीसना प्रत्येक जातीमाईन दोनदोन जिवत रावाकरता तुनाकडे येतीन. 21 खावामा येस ते सर्वा प्रकारना अन्न आपलाजोडे आणीसन त्याना साठा कर; ते तुले अनं त्यासले खावाले भेटी. 22 नोहानी तशच करं; जश देवनी त्याले जे काही सांगेल व्हतं ते त्यानी करं.
6:5 मत्तय 24:36 6:22 इब्री 11:6