2
पौलनं थेस्सलनीकामाधलं काम
1 भाऊसवन अनी बहिणीसवन, तुमनामा आमनं येणं व्यर्थ व्हयनं नही, हाई तुमले स्वतःले पण माहित शे.
2 हाई बी तुमले माहितच शे की, तुमनाकडे येवाना पहिले फिलप्पैमा आम्हीन दुःख भोगीन अनं अपमान सोसीन, मोठा तरासमा राहिसन बी देवनी सुवार्ता तुमले सांगानं धैर्य आपला देवकडतीन आमले मिळनं.
3 कारण आमना उपदेश भ्रममा टाकणारा किंवा अशुध्दपणा यातीन निर्माण व्हयेल किंवा कपटना नव्हता.
4 तर सुवार्ता आमानावर सोपी देवाकरता देवनी आमले पारखीन पसंत करामुये आम्हीन ती सांगतस; आम्हीन माणससले खूश करासारखं नही बोलता आम्हीन अंतःकरण पारखणारा देव हाऊ ज्यामुये खूश व्हई तसं आम्हीन बोलतस.
5 आम्हीन हाजीहाजी करतांना कधीच दखायनुत नही, हाई तुमले माहीत शे, पैसाकरता ढोंगीपण करतांना आम्हीन कधी दखानुत का, देव आमना साक्षी शे!
6 तरी माणससपाईन म्हणजे तुमनापाईन किंवा दुसरासपाईन गौरव मिळावाकरता खटपट आम्हीन करी नही राहिंतुत;
7 आम्हीन ख्रिस्तना प्रेषित ऱ्हावामुये आम्हीन तुमनावर वझ टाकतुत. तरी बी आपला पोऱ्यासोऱ्यासनं लालनपालन करणारी मायना मायक आम्हीन तुमनामा सौम्य वृत्तीना व्हतुत.
8 आमले तुमनाबद्दल कळकळ वाटस म्हणीन आम्हीन तुमले फक्त देवना सुवार्तानं दानच देवाले नही, तर तुमनावरली जास्त प्रितीमुये तुमनाकरता आमनं जिवन बी देवाले तयार व्हतुत.
9 भाऊसवन अनी बहिणीसवन, आमनं श्रम अनी कष्ट यानी आठवण तुमले नक्कीच शे; तुमना मातीन कोणले आमनं वझं व्हवाले नको, म्हणीसन आम्हीन रातनं-दिन कामधंदा करीसन तुमनापुढे देवना सुवार्तानी घोषणा करी.
10 तुमनामा ईश्वास ठेवनारासमा आम्हीन पवित्रतातीन, योग्य अनी निर्दोषतातीन कसं वागनुत यानाबद्दल तुम्हीन साक्षीदार शेतस, अनी देव बी शे.
11 तुमले माहितच शे की, बाप आपला पोऱ्यासले करस तसा आम्हीन तुमनापैकी प्रत्येकले वागाडतस.
12 धीर देत अनं आग्रहपुर्वक ईनंती करीसन सांगी ऱ्हाईंतुत की, जो देव आपला राज्यमा अनी गौरवमा तुमले भागीदार व्हवाकरता बलावस.
13 ह्या कारणमुये आम्हीन बी देवनी निरंतर उपकारस्तुती ह्यामुये करतस की, तुम्हीन आमनापाईन ऐकेल देवनं वचन स्विकारं ते माणससनं नही तर देवनं म्हणीन स्विकार, अनी वास्तविक हाई सत्य शे; ते तुमनामा ईश्वास ठेवणारासमा कार्य करी राहिनं.
14 भाऊसवन अनी बहिणीसवन, यहूदीयामाधल्या देवन्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशुमा शेतस त्यासनं तुम्हीनं अनुकरण करनारा व्हयनात, म्हणजे त्यासनी यहुद्यासना हाततीन ज्या छळ भोगात त्याच छळ तुम्हीन पण आपला स्वतःना लोकसकडतीन भोगात;
15 त्या यहूद्यासनी प्रभु येशुले अनं संदेष्टासले बी मारी टाकं अनी आमना छळ करा; देवले जे आवडस ते त्या करतस नही अनं त्या सर्व माणससना विरोधी व्हयेल शेतस.
16 गैरयहूदीसनं तारण व्हवाले पाहिजे म्हणीन आम्ही त्यासले देवनी सुवार्ता सांगतस; ती सांगाकरता त्या मनाई करतस; हाई यानाकरता की, त्यासनी आपला पापसनं माप कायम भरत ऱ्हावानं; त्यासनावरला क्रोधनी मर्यादा संपेल शे.
पौलनी मंडळीले परत भेटानी ईच्छा
17 भाऊसवन अनी बहिणीसवन, आम्ही हृदयतीन नही तर शारीरतिन तुमनापाईन थोडा येळ येगळा व्हवामुये आमले वाईट वाटी; आम्हीन तुमनी खुप आठवण करी अनी तुमले परत भेटाकरता भलताच प्रयत्न करात;
18 यामुये आम्हीन तुमनाकडे येवानी ईच्छा धरी; विशेष म्हणजे मी पौलनी एकदाव नही तर बराचदाव येवानी ईच्छा करी; पण सैताननी आमले आडावं.
19 कारण आमनी आशा, आमना आनंद अनी आमना अभिमानना मुकूट काय शे? आपला प्रभु येशु ह्याना येवाना येळले त्याना समोर तुम्हीनच राहशात ना?
20 कारण तुम्हीन आमना अभिमान अनी आमना आनंद शेतस.