पौलाने लिहिलेले थेस्सलनीकरास पहिले पत्र
पौलनी लिखेल थेस्सलनीकरसले पहिलं पत्र
वळख
हाई पत्र जे पौलनी लिखेल व्हतं१:१पहिले पवित्र शास्त्रना भाग व्हयना. अनी ख्रिस्तना जन्मना ५१ वरीस नंतर लिखाई गयं. जवय पौलनी हाई पत्र लिखं तवय तो करिंथ शहरमा व्हता. थेस्सलनीकानी मंडळी जिले त्यानी हाई पत्र लिखेल शे, तीले त्यानी आपली दुसरी मिशनरी फेरीना येळले स्थापन करेल व्हतंप्रेषित १७:१-१० प्रेषितसन काम या पुस्तकमा अस लिखेल शे की, हाई मंडळी यहूदी अनी गैरयहूदीसनी बनेल व्हती.
हाई मंडळीनी स्थापना करानंतर पौल थेस्सलनीकामा जास्त दिन राहू नही शकना. यामुये त्यानी हाई पत्र त्यासले प्रोत्साहण देवाकरता लिखं. हाई पत्रमा बराच गोष्टीसनी चर्चा करेल शे, जसं की, ख्रिस्ती लोकसनं जिवन कसं ऱ्हावाले पाहिजे. पौल ख्रिस्तना दुसरा आगमनबद्दल बी लिखस, यामुये की थेस्सलनीकामा राहणारी मंडळीले याबद्दल ऐकानी बरीच ईच्छा व्हती. पौल येशुना दुसरादांव येवाबद्दल लिखीसन अस जिवन जगाकरता प्रोत्साहीत करस की ज्यामुये परमेश्वर खूश व्हई. ५:६-८
रूपरेषा
१. पौलना मंडळीले नमस्कार अनी परमेश्वरले धन्यवाद.
२. पौल आपला कार्यबद्दल अनी तिमथ्थीनी जी बातमी आनेल व्हती त्यावर चर्चा. २–३
३. येशुनं दुसरींदाव येवानी तयारी कराकरता ख्रिस्ती लोकसनी कसं जिवन जगाले पाहिजे. ४:१; ५:१५
४. पौलना मंडळीले नमस्कार अनी मंडळीना प्रत्येकनी त्यानं पत्र वाचाले पाहिजे यानी सुचना. ५:१६-२८
1
मी पौल, सिल्वान अनं तीमथ्य यानासंगे हाई पत्र लिखस, देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्तना लोकसले ज्या थेस्सलनीकरसनी मंडळीमा शेतस, तुमले कृपा अनं शांती मिळो.
थेस्सलनीकरसनं जिवन अनी ईश्वास
आम्हीन आमनी प्रार्थनामा तुमले याद करीसन कायम तुमना सर्वासकरता देवना उपकार मानतस. आपला देवबापसमोर तुमनं ईश्वासतीन करेल काम, प्रितीतीन करेल कष्ट, अनं आपला प्रभु येशु ख्रिस्तना आशामुये धरेल धीर यानं आम्हीन कायम स्मरण करतस. देवना प्रितीमाधला आमना भाऊ अनी बहिणीसवन, तुमनी व्हयेल निवड आमले माहितच शे. कारण आमनी सुवार्ता फक्त शब्दसतीन नही, तर सामर्थ्यतीन, पवित्र आत्मातीन अनं पूर्ण खरापणना निर्धारतीन तुमले सांगामा वनी. तसच आम्हीन तुमनासंगे कसा वागनुत, हाई तुमले माहित शे, हाई तुमना चांगला करता व्हतं. तुम्हीन फार संकटमा व्हतात तरी बी पवित्र आत्माना आनंदतीन वचन स्विकारीन आमनं अनं प्रभुनं अनुकरण करनारा व्हयनात; अस करीसन तुम्हीन मासेदोनिया अनं अखया प्रांतमा राहनारा सर्व ईश्वासणारासले आदर्श व्हयनात. मासेदोनिया अनं अखयामा तुमना कडतीन प्रभुना वचननी घोषणा व्हयेल शे; फक्त इतलंच नही तर देववरील तुमना ईश्वासनी बातमी सगळीकडे पसरेल शे; यामुये त्यानाबद्दल आमले काही सांगानी आवश्यकता नही. त्या लोके तुमनाबद्दल आमले सांगतस की, आम्हीन तुमनाकडे वनुत तवय तुम्हीन आमनं कसं स्वागत करं, तुम्हीन मुर्तिपाईन देवकडे कशा वळणात, अनी जिवत अनं खरा देवनी सेवा कराले लागनात, 10 अनी त्याना पोऱ्या येशु ह्यानी स्वर्गमातीन येवानी वाट दखत ऱ्हा, त्या पोऱ्याले म्हणजे येशुले देवनी मरेल मातीन ऊठाडं अनं तो आपले परमेश्वर कडतीन येणारा क्रोधपाईन सोडवणारा शे.
1:1 प्रेषित १७:१ 1:6 प्रेषित १७:५-९