4
1 मालकसवनं, स्वर्गमा तुमना बी मालक शे, हाई ध्यानमा ठेईसन तुम्हीन आपला नोकरससंगे न्यायतीन अनं समतेमा वागा.
निर्देष
2 प्रार्थनामा कायम सावध राहा अनं तिनामा उपकारस्तुती करीसन जागृत ऱ्हावा;
3 आमनाकरता बी प्रार्थना करा, यानाकरता की, ख्रिस्तनाविषयी जे रहस्य देवनी आमले सांगं, त्यानाबद्दल अनं त्याना संदेश सांगाकरता देवनी आमनाकरता चांगली संधी भेटाले पाहिजे, कारण त्याना उपदेश कराकरता मी कैदमा शे.
4 प्रार्थना करा की, जसं माले बोलाले पाहिजे तसं मी ते स्पष्ट रितीतीन बोलाले पाहिजे.
5 ईश्वासी लोकसनासंगे सुज्ञतेमा वागा; अनी येळना सदुपयोग करा.
6 तुमनं बोलनं नेहमी कृपायुक्त अनी लोकसले आवडणार असं ऱ्हावाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक मनुष्यले कसं उत्तर देवानं हाई समजी.
सलाम
7 प्रिय बंधु, तुखिक, प्रभुमा ईश्वासु सेवक अनं मना सोबतीना दास, हाऊ मनाविषयी सर्व बातमी तुमले सांगी.
8 मी त्याले हाईच कारणतीन तुमनाकडे धाडेल शे की, आमना विषयी बातमी तुमले समजाले पाहिजे अनी त्यामुये तुमनं अंतःकरणले समाधान वाटाले पाहिजे.
9 मी त्याले आमना ईश्वासु अनं प्रिय बंधु अनेसिम, जो तुमनामाईन एक शे, त्याले बी धाडी ऱ्हायनु शे, त्या तुमले अठली सगयी बातमी सांगतीन.
10 अरिस्तार्ख, मना सोबतीना कैदी, तुमले सलाम सांगस, अनी बर्णबाना चुलत भाऊ मार्क हाऊ बी तुमले सलाम सांगस, त्यानाविषयी तुमले अगोदरच माहिती भेटेल शे, तो जर तुमनाकडे वना तर त्यानं स्वागत करा.
11 ज्याले युस्त म्हणतस तो येशु बी तुमले सलाम सांगस; यहूदी ईश्वासणारास माईन ह्याच तिन्ही देवना राज्यकरता मनासंगे सहकारी व्हयेल शेतस अनं त्यासनी माले भलतीच मदत भेटेल शे.
12 ख्रिस्त येशुना दास, एफफ्रास जो तुमनामाधला एक शे, तो तुमले सलाम सांगस, तो आपला प्रार्थनामा कायम तुमनाकरता जीव तोडीसन ईनंती करी राहीना शे की, देवना ईच्छातीन कराले तुम्हीन कायम परीपुर्ण ऱ्हावाले पाहिजे.
13 ज्या लावदिकीयामा अनं हेरापलीत शेतस त्यासनाकरता तो बराच श्रम करी राहीना शे. यानाविषयी मी साक्षी शे.
14 आमना प्रिय वैद्य लूक अनं देमास ह्या तुमले सलाम सांगतस.
15 लावदिकीया माधला राहनारा ईश्वासनारा बंधुसवन, अनं नुफा अनी तिना घर जमणारी मंडळी यासले सलाम सांगा.
16 हाई पत्र तुमनामा वाची दखाडावर लावदिकीया माधली मंडळीमा बी वाचानं, अनं लावदिकीमा जायेल पत्र लईसन तुम्हीन बी वाचाले पाहिजे असं व्यवस्था करा.
17 अर्खिप्पाले पण सांगा की, “जी सेवा तुले प्रभुमा मिळेल शे, ती पुर्ण कराकरता तिनाकडे ध्यान दिसन ती पुरी कर.”
18 मी पौल, मना स्वतःना हातघाई सलाम लिखस. मी कैदमा शे यानी आठवण ठेवा!
देवनी कृपा तुमनासंगे ऱ्हावो.