4
1 यामुये देवना विसावा यानाबद्दलनं वचन अजुन पावत ठेयल शे, तर आम्हीन सावध ऱ्हावाले पाहिजे, कारण अस व्हवाले नको की तुमनापैकी कोणी त्या विसावापाईन वंचित व्हवा.
2 त्यासनामायक आपले बी सुवार्ता सांगामा वनी, पण ऐकेल वचन त्यासले लाभदायक व्हयनं नही, कारण ऐकणारासनी त्यानावर ईश्वास ठेईन स्विकार करा नही.
3 आम्हीन ज्यासनी ईश्वास ठेवा त्यासनी विश्रामस्थानमा प्रवेश करा जस देवनी वचन लिसन सांगेल शे;
“जस की मी आपला क्रोधमुये शप्पथ लिधी,
‘त्या मना विश्रामस्थानमा प्रवेश करू शकावुतच नही. जठे मी त्यासले विश्रांती देतु त्या भुमीमा त्या प्रवेश करू शकावुतच नही!’ ”
तरी त्यानं काम जगना स्थापनापाईन पुर्ण व्हयनात तरी तो बोलना.
4 कारण सातवा दिनबद्दल एक ठिकाने शास्त्रमा त्यानी अस सांगेल शे की, “सातवा दिन देवनी आपला सर्व कामे सराईन विश्रांती लिधी.”
5 अनी ह्यानाबद्दल त्यानी असं बी सांगेल शे; “त्या मना विश्रामस्थानमा प्रवेश करावच नही.”
6 ज्यासनी त्यानाबद्दल पहिले सुवार्ता ऐकेल व्हती, त्यासनी आज्ञा न मानामुये अनी अईश्वासमुये प्रवेश भेटना नही. तरी बी काही लोकसले यामा प्रवेश भेटेल शे.
7 म्हणीसन इतला काळनंतर दावीदनाकडतीन सांगेल वरला लेखप्रमाणे त्यानी “आज” असा एक दिन बी ठरायेल, तो लेख असा शे;
“आज जर तुम्हीन त्यानी वाणी ऐकशात,
तर आपला मनंसले कठीण करू नका.”
8 कारण जर यहोशवा त्यासले देवनी वचन देयल विश्रांती देता तर त्यानानंतर देव दुसरा दिनबद्दल बोलता नही.
9 यामुये जसा देवनी सातवा दिन विसावा लिधा तसा विसावा देवना लोकसकरता बाकी शे.
10 ज्या कोणी देवना विश्रामस्थानमा येल शे त्यासनी, जस देवनी आपला कामे सराईन विसावा लेयल शे तसं त्यासनी आपला बी कामे सराईन विसावा लेतीन.
11 यामुये, या आपण, त्या विश्रामस्थानमा येवाना व्हई तितला प्रयत्न कराले पाहिजे, याकरता की देवनी आज्ञा न मानामुये कोणा नाश व्हवाले नको.
12 देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस.
13 अनी देवनी नजरले दिसाव नही अशी कोणती बी निर्मिती वस्तु नही; तर ज्या निर्मिती वस्तुनासंगे आपला संबंध शे त्याना नजरमा सर्व उघडं शे अनी त्याले आपले प्रत्येकले हिशोब देना शे.
येशु सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक
14 तर मंग, स्वर्गतीन पार जायेल देवना पोऱ्या येशु हाऊ थोर प्रमुख याजक आपले शे, आपण जो स्विकार करेल शे त्याले भक्कम धरी राहूत.
15 आपला प्रमुख याजक असा नही ज्याले आपला अशक्तपणानं दुःख व्हस नही, तो तर सर्व गोष्टीसमा आपलामायकच पारखाई गया, तरी बी त्यानी पाप करं नही.
16 आपलावर दया व्हवाले पाहिजे अनी गरजना येळले मदत व्हवाकरता कृपा मिळाले पाहिजे, म्हणीसन आपण ध्यैर्य करीसन कृपाना देवना राजासननाजोडे जाऊत.