3
येशु हाऊ मोशेपेक्षा श्रेष्ठ शे
1 यामुये मना ईश्वासी भाऊ अनी बहिणीसवन, देवनी पाचारण करेलसवन, येशुवर ध्यान द्या! तो देवना प्रेषित अनी आमना ईश्वासना महायाजक शे.
2 तो आपला नेमेलससंगे ईश्वासु व्हता “जसा मोशे बी देवना सर्व घराणाबद्दल ईश्वासु व्हता.”
3 जस घर बांधणाराले घरपेक्षा जास्त सन्मान शे, तसं येशु बी मोशेपेक्षा जास्त सन्मानना योग्य मोजाई जायेल शे.
4 प्रत्येक घर कोणतरी बांधेल ऱ्हास, पण सर्व वस्तु बनाडणारा देव शे.
5 मोशे देवना घरमा सेवक या नातातीन ईश्वासु राहीना, अनी तो ज्या गोष्टी देव भविष्यमा सांगणार व्हता त्या गोष्टीसबद्दल त्यानी साक्ष दिधी.
6 ख्रिस्त हाऊ ईश्वासु पुत्रना नातातीन परमेश्वरना घरना अधिकारी शे, जर आपण आपली आशाबद्दलना भरवसा अनं आपला अभिमान शेवटपावत भक्कम ठेवा तर त्यानं ते घर आपणच शेतस.
देवना लोकसले आराम
7 यावरतीन, पवित्र आत्मा अस सांगस की, जर तुम्हीन त्यानी वाणी ऐकशात,
8 तुमना पुर्वजसनी रानमा बंड करीसन देवनी परिक्षा दखीन स्वतःनं मन कठीण करं तसं तुम्हीन आपला मनं कठीण करू नका.
9 परमेश्वर म्हणस, जरी चाळीस वरीस मी काय करं हाई दखं, तरी तुमना पुर्वजसनी मनी परिक्षा दखी अनी माले पारखं.
10 त्यामुये त्या पिढीले संतापिन मी बोलनु, “यासना मनं कायम मनापाईन भटकत राहतस, अनी यासनी मन्या आज्ञासले मानं नही.”
11 तवय मी रागमा शपथ वाहीसन बोलनु, या मना विसावाना जागावर प्रवेश करू शकावुत नही.
12 भाऊ अनी बहिणीसवन, जिवत देवले सोडी देवानं ईतलं अईश्वासनं दुष्ट मन तुमनामा कोणच व्हवाले नको म्हणीसन जपीन ऱ्हा.
13 जस शास्त्रमा सांगेल “आजना” दिन आपलाले लागु शे तसं एकमेकसले तुम्हीन प्रत्येक दिन धीर देवाना, याकरता की पापना फसवणुकघाई तुमनामातील कोणी कठोर व्हवाले नको.
14 कारण जर आपण आपला सुरवातना आत्मईश्वास शेवटपावत भक्कम धरी ठेवा तर ख्रिस्तना भागीदार बनी जायेल शेतस.
15 शास्त्रमा अस सांगेल शे; “आज जर तुम्हीन देवनी वाणी ऐकशात, तर आपला मनसले अस कठीण करू नका, जस की त्यासनी क्रोध देवाना येळले करं व्हतं.
16 यामा सांगेल त्या देवनी वाणी ऐकीसन देवविरूध्द ‘बंड करनारा’ त्या कोण व्हतात? तर त्या मोशेद्वारा मिसरमातीन निंघेल सर्वाच नव्हतात का?
17 ‘देव कोणता लोकसवर चाळीस वरीसपावत संतापमा राहिना? काय त्यासनावर नही ज्यासनी पाप करं, ज्यासना प्रेतं रानमा पडी राहीनात.
18 देवनी शप्पथ वाहीसन कोणले बोलना की, “तुम्हीन मना विश्रामस्थानमा प्रवेश करू शकावुत नही,” ज्यासनी आज्ञा मानी नही त्यासले की नही?
19 तर अईश्वासमुये त्यासले वचननी भुमीमा प्रवेश करता वना नही अस आपले दखाई येस.