2
महान तारण
1 यामुये ऐकेल सत्यना गोष्टीसकडे आपण विशेष ध्यान देवाले पाहिजे, नहीतर आपण त्यापाईन भटकी जासुत.
2 जो संदेश आमना पुर्वजसले देवदूतसकडतीन भेटना तो खरा ठरना, अनी ज्यासनी तो पाळा नही त्यासले योग्य ती शिक्षा भेटनी.
3 तर आपण एवढा मोठा तारणनाकडे दुर्लक्ष करीसन कसा वाचु शकसुत. यानं वर्णन सर्वात पहिले प्रभुकडतीन कराई गयं अनी ते ऐकणारासनी त्याबद्दल आपले सत्य प्रमाण पटाडी दिधं.
4 त्यानासंगे देवनी बी चमत्कार, अद्भुत कार्य अनं येगयेगळा प्रकारना पराक्रम करीसन अनी आपली ईच्छाप्रमाणे पवित्र आत्माना दानं वाटीसन साक्ष दिधी.
तारणना मार्गदर्शक
5 देवनी त्या येणारा नवं जगले ज्यानं वर्णन आम्हीन करतस त्यावर देवदूतसले अधिकारी करं नही.
6 कोणतरी अस शास्त्रमा सांगेल शे की;
“मनुष्य तो काय की तु त्यानी आठवण करानी;
मनुष्य तो काय की, तु त्यानी काळजी करानी?
7 तु त्याले देवदूतस पेक्षा किंचीतच कमी करेल शे;
तु त्याले गौरव अनं आदरना मुकुट घालेल शे;
8 अनी तु आपला हातघाई करेल सर्व वस्तुसवर त्याले अधिकारी नेमेल शे, त्याना पायखाल ठेयल शे.”
“सर्वकाही त्याना स्वाधीन ठेयल शे” म्हणजे त्याना स्वाधीन ठेयल नही अस काहीच राहू दिधं नही; पण सर्वकाही त्याना स्वाधीन ठेयल शे, पण आजपावत सर्वकाही त्याना स्वाधीन आपले दखायनं नही हाई खरं.
9 पण आम्हीन त्याले म्हणजे येशुले, ज्याले थोडा येळकरता देवदूतस पेक्षा थोडं कमी करामा येल व्हतं, तो मरण सहन करामुये गौरव अनं आदर यासना मुकुट घालेल असा आपलाले दखास, देवनी आपलावरली कृपामुये येशुनी सर्वासकरता मराले पाहिजे म्हणीसन अस व्हयनं.
10 ज्यानाकरता सर्वकाही शे अनी ज्यानाकडतीन सर्वकाही शे, त्यानी बराच पोरसले गौरवमा लयतांना, त्यासनं तारण करनारा जो येशु त्याले दुःख सहन करामुये परिपुर्ण करानं, हाई योग्य व्हतं.
11 पवित्र करनारा पुरूष अनी पवित्र करेल लोके ह्या सर्वा एकच पितापाईन शेतस, यामुये तो त्यासले भाऊ अनी बहिणी म्हणाले लाजस नही.
12 तो म्हणस;
“मी मना भाऊ अनी बहिणीसकडे तुना नावनी किर्ती करसु,
लोकसभामा तुनी स्तुती करसु.”
13 अनी परत तो म्हणस; “मी त्यानावर भरवसा ठेवसु. तसच ‘दखा, मी अनी देवनी माले देयल लेकरं.”
14 जसा “लेकरं” एकच रक्तमासना व्हतात तसाच तो पण त्यासनामायक रक्तमासना व्हयना. यानाकरता की मरणवर धनीपण करनारा म्हणजे सैतान, याले आपला मरणतीन नष्ट करी देवानं.
15 अनी ज्या लोके मरणना भितीघाई आयुष्यभर दासपणतीन बांधायेल त्या सर्वासले मोकळ करी लेवानं.
16 सर्वासले माहीत शे की, तो देवदूतसना मदतले नही तर “अब्राहामना संतानसना मदतले येस.”
17 यामुये त्याले सर्व प्रकारमा भाऊ बहिणीसना मायक व्हणं आवश्यक व्हतं, यानाकरता की लोकसना पापसनं प्रायश्चीत कराकरता आपण देवनी सेवा करता दयाळु अनी ईश्वासु मुख्य याजक व्हवाले पाहिजे.
18 कारण जस त्यानी स्वतः परिक्षा अनी दुःख सहन करेल शे, तसच ज्यासनी परिक्षा व्हस त्यासले मदत कराले तो समर्थ व्हयेल शे.