इब्री लोकांस पत्र
इब्री लोकसले पत्र
वळख
येशु जुना करारमाधलं बराच भविष्यवाणीसना परीपुर्ती कश करस हाई दखाडणारा इब्री लोकसले पत्र हाई एक प्रोत्साहन देणारा पुस्तक शे. एक उपदेशनाप्रमाणे यानी मांडनी करामा वनी. भविष्यवाणी अनं यहूदी मुख्य याजकासनी कर्तव्य येशु ख्रिस्तनी कश पुर्ण करात हाई स्पष्टपणतीन दखाडणारा साठापेक्षा जास्त जुना करारनं संदर्भ ह्या पुस्तकमा शे. ह्या कारणतीन हाई पुस्तक यहूदी ईश्वासु लोकसकरता प्रोत्साहन देणारा अस मानाई जायेल शे. याजकसनी आठेन पुढं यज्ञ करानी गरज नही हाई येशुनी नियमशास्त्र कश पुर्ण करा यावरीन ह्या पुस्तकमा स्पष्ट कराई जायेल शे. सर्वा पापसनाकरता एकदाच अनी सर्वकाळना यज्ञ अस येशु व्हयना. ह्या पुस्तकवरीन आमले अस समजस की, येशु ख्रिस्त, देववर ईश्वास ठेवाले आमनाकरता शक्य करस. १२:२ अस रितीतीन ह्या काळना आम्हीन ईश्वासनाराकरता हाई पुस्तकमा मोठा प्रोत्साहन शे. आम्हीन त्यानावर विसंबुन रावाले पाहिजे.
इब्री लोकसले पत्र कोणी लिखं हाई आमले ठाऊक नही. तरी काही अभ्यासु विद्वानांसन म्हणनं अस शे की, ते प्रेषित पौल, लूक किंवा बार्णबस असं देवना सेवकसनी लिखं व्हई. तसच हाई पुस्तक कवय लिखाई गयं हाई पण आमले समजत नही. तरी बराच अभ्यासक अस मानतस की, ते ख्रिस्त जन्मानानंतर ७० व्या वरीसना अगोदर लिखं व्हई. यानं कारण अस की, जरी येरूशलेम शहर ७० व्या वरीसले नष्ट करामा वना तरी या पुस्तकामा येरूशलेमना वर्णन अशी पध्दतमा करामा येल शे की जशे काय ते नष्ट व्हयेलच नव्हतं. हाई पुस्तक बराच मंडळीसमा फिराईसन वाचाई जाईल व्हई. ते रोम शहरमा लिखेल व्हतं. १३:२४
रूपरेषा
१. लेखक अस सांगस की, येशु हाऊ देवना सगया संदेष्टा अनी देवदूत यासनापेक्षा मोठा शे. १:१–४:१३
२. यानानंतर तो अस सांगस की, ज्या याजक यरूशलेमना मंदिरमा सेवा करतस त्यासनापेक्षा बी येशु मोठा शे. ४:१४–७:२८
३. मोशेला देयल आज्ञानाद्वारा जो जुना करार देवनी त्याना लोकनासंगे करा त्यानापेक्षा बी येशुनी सेवा श्रेष्ठ शे. ८:१; १०:३१
४. येशु हाऊ प्रत्येक बाबतमा मोठा शे हाई स्पष्ट करावर लेखक बराच दैनदिन व्यवहारना बाबतमा सुचना देस. १०:३२; १३:१७
५. शेवट काही बोध अनं शुभेच्छा दिसन लेखक हाई पत्रना शेवट करस. १३:१८-२५
1
देवना शब्द त्याना पोऱ्याकडतीन
1 देव भुतकाळमा बराचदावं अनं येगयेगळा प्रकारतीन आपला पुर्वजससंगे संदेष्टासनाद्वारा बोलना,
2 तो या शेवटला दिनसमा आपलासंगे आपला पोऱ्याद्वारा बोलेल शे, देवनी त्याले सर्व वस्तुसना वारीस करेल शे अनी त्यानाद्वारा त्यानी सर्व सृष्टी उत्पन्न करेल शे.
3 हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना.
देवना पोऱ्यानं श्रेष्ठपण
4 जेवढ पोऱ्याले देवदूतसपेक्षा वारस हक्कतीन श्रेष्ठ नाव भेटेल शे, तेवढाघाई तो त्यासनापेक्षा जास्त श्रेष्ठ व्हयना.
5 देवनी कोणता देवदूतले कधी अस सांगं;
“तु मना पोऱ्या शे,
आज मी तुले जन्म देयल शे”
अस तो कोणताच देवदूतबद्दल बोलना नही
अनी परत हाई, “मी त्याना पिता असा व्हसु,
अनी तो मना पोऱ्या असा व्हई.”
6 पण जवय देव आपला जेष्ठ पोऱ्याले जगमा धाडी त्या येळबद्दल तो असं म्हणस;
“देवना सर्व दूत त्यानी आराधना करोत.”
7 पण देवदूतसबद्दल देव अस सांगस,
“तो आपला देवदूतसले हवा
अनी आपला सेवकसले अग्नीज्वाला अस बनाडस.”
8 परमेश्वर, पोऱ्याबद्दल तो अस म्हणस;
“हे परमेश्वर तुना राज्य सदासर्वकाळ टिकी,
तु लोकसवर न्यायीपणतीन राज्य करशी.”
9 तु, जे चांगलं शे त्यावर प्रेम अनी जे वाईट शे,
त्यानासंगे वैरी करेल शे,
यामुये हे परमेश्वर, तुना परमेश्वरनी, तुना सोबतीसपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलना अभिषेक तुले करेल शे,
10 तो आखो म्हणस;
“हे परमेश्वर, तु सुरवातले पृथ्वीना पाया घाला,
अनी आकाश तुना हातनघाई बनाडेल शे.
11 ते नष्ट व्हई जाई, पण तु कायम राहशी,
ते सर्व कपडानामायक झिजाई जाई,
12 तु त्यासले सदरानामायक गुंडाळी टाकशी,
अनी ते कपडानामायक बदली बी जातीन,
पण तु तसाच राहशी, तु सर्वकाळ जिवतच ऱ्हाशी.”
13 देवनी कोणता देवदूतबद्दल अस कधी म्हणं;
“मी तुना शत्रुसले तुना पायखाल तुना पदासन करापावत तु मना उजवीकडे बैस.”
14 तर देवदूत कोण शेतस? देवदूत देवनी सेवा करनारा आत्मा शेतस अनी तारण भेटणारा लोकसनी मदत कराकरता ते देवनी धाडेल शेतस.