6
यामुये आपण ख्रिस्तबद्दलन्या सुरवातन्या गोष्टी सोडीसन सिध्दांतसकडे जावाना प्रयत्न करूत. मरेलकडे लई जाणारा कामसपाईन मनले फिरावानं, देववर ईश्वास ठेवानं, अनी बाप्तिस्मानी शिक्षा देनं, हात ठेवानं, मरेलसनं पुनरूत्थाननं अनी सार्वकालिक न्यायनं शिक्षण हाऊ पाया आपण परत घालाले नको. देव व्हवु दि, तर हाई आपण करूत. ज्या लोकं आपला ईश्वासमा भटकी गयात त्यासले परत पश्चताप कराकरता कशं लयता ई? कारण ज्या लोकसले एकदाव प्रकाश भेटी गया, ज्यासनी स्वर्गीय दाननी चव लिधी, ज्या पवित्र आत्माना भागीदार व्हयनात, अनी ज्यासनी देवना सुवचनसनी अनं येणारा युगना सामर्थ्यना अनुभव लेयल शे, त्या जर ईश्वासमा भटकी गयात, तर त्यासले पश्चाताप करता परत नवं बनाडानं हाई अशक्य शे, कारण हाई त्यासनं भटकनं म्हणजे त्यासनी देवना पोऱ्याले परत क्रुसखांबवर खियानं अनी त्याना उघड अपमान करनं अस शे.
कारण जी “भुमी” आपलावर घडीघडी पडेल पाऊस पिसन आपली लागवड करणारसकरता उपयोगी अशी “भाजीपाला” उगाडस, तिले देवना आशिर्वाद भेटस. अनी जी भुमि काटेरी झाडं अनं झुडपं उगाडस, ती टाकाऊ अनी शापीत व्हवानी वाटवर लागेल शे. तिना शेवट जळनं हाई शे.
जरी आम्हीन अस बोलतस तरी, प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुमनी स्थिती यानापेक्षा चांगली अनी तारणकडे लई जाणारी शे असा आमले तुमनाबद्दल भरवसा शे 10 कारण तुमना कार्य अनी तुम्हीन देवना लोकसनी करेल अनी करी राहिनात ती सेवा, यावरतीन जी प्रिती तुम्हीन त्याना नाववर दखाडेल शे, ती बी देवनी ईसरी जावं इतला तो अन्यायी नही. 11 आमनी अशी आशा शे की, तुमनापैकी प्रत्येकनी आशानी पुरी खात्री करी लेवाकरता तशीच उत्सुकता शेवटपावत धरी ठेवानी. 12 म्हणजे तुम्हीन आळशी व्हणार नहीत, पण त्यासनंमायक व्हवानं ज्या ईश्वासतीन अनं धीरतीन देवना वचनसले स्विकारतस, त्यासनामायक व्हा.
देवना ईश्वासयोग्य वचन
13 जवय देवनी अब्राहामले वचन दिधं, तवय त्याले शपथ लेवाकरता स्वतःपेक्षा कोणी मोठा नव्हता म्हणीसन त्यानी स्वतःनी शपथ वाहिसन. 14 सांगं की, “मी तुले आशिर्वादित करसु अनी तुले बरीचशी संतती दिसु.” 15 त्यानी धीर धरीसन वाट दखी, म्हणीसन त्याले यानामायक वचननं फळ प्राप्त व्हयनं. 16 माणुस आपलापेक्षा मोठानी शपथ लेस अनी आपले निश्चित कराकरता शपथ हाई त्यासनामा सर्व वादसना शेवट शे. 17 ज्यासले देवनं अभिवचन मिळाणं व्हतं त्यासले हाई स्पष्ट व्हावं की तो आपला उद्देश बदलावुच नही म्हणीसन त्यानी आपला वचनले शपथनी जोड दिधी. 18 असा दोन गोष्टी त्यानं वचन अनी शपथ ज्या बदलतस नही, अनी या गोष्टीसबद्दल देव खोटं बोलू शकस नही. तर ज्या आमले त्यानामा संरक्षण भेटेल शे त्या आम्हीन जी आशा आमनासमोर ठेयल शे तिले दृढ धरीसन ऱ्हावाकरता भलताच उत्साहीत व्हयेल शेतस. 19 ती आशा आपलाकरता जिवननं नांगर शे, अशी आशा जी निश्चित अनी भक्कम शे अनी स्वर्गना मंदिरना परदामातीन मझारना पवित्र स्थानपावत आरपार जास. 20 तठे मलकीसदेकना संप्रदायनामायक, युगानुयुगना प्रमुख याजक व्हयेल येशु आपलाकरता पुढे जायेल शे.