7
मलकीसदेक याजक
हाऊ “मलकीसदेक, शालेमना राजा” अनं सर्वोच्च देवना याजक व्हता, अब्राहाम हाऊ जवय चार राजासले हराईसन परत वना तवय मलकीसदेकनीच समोर जाईसन त्याले आशिर्वाद देयल व्हता. अनं त्याले अब्राहामनी जे युध्दमा लुटी आनेल व्हतं त्या सर्वासमाईन दहावा हिस्सा* दिधा. मलकीसदेक आपला नावना अर्थप्रमाणे एक “नितीमान राजा” अनी दुसरं हाई की शालेमना राजा, म्हणजे “शांतीना राजा” व्हता. मलकीसदेकना मायबाप, अनं पुर्वज कोण, त्याना जन्म कवय व्हयना, मरना कवय यानी काहीच लिखेल माहीती नही शे, तो देवना पोऱ्यानामायक कायमना याजक असा शे. तुम्हीनच ईचार करा की, हाऊ माणुस म्हणजे मलकीसदेक कितला महान व्हता ज्याले कुलाधिपती अब्राहामनी आपला लुटेल वस्तुमाईन सर्वात चांगल्या वस्तुसना दशमांश दिधा. लेवीना संतानसपैकी ज्याले याजकपण मिळस त्याले बंधुसपाईन, म्हणजे अब्राहामना घरानामा जन्मेल आपला लोकसपाईन नियमशास्त्रप्रमाणे दहावा हिस्सा लेवानी आज्ञा शे. पण मलकीसदेक ज्याना वंश त्या लोकसपाईन नव्हता त्यानी अब्राहामकडतीन दहावा हिस्सा लिधा अनी ज्याले देवना वचनं भेटेल व्हतात त्याले आशिर्वाद दिधा. यामा शंका नही की धाकलाले मोठापाईन आशिर्वाद भेटस. इकडे दखं तर मरेल माणससले दहावा हिस्सा भेटस, पण मलकीसदेककडे दखं तर जो जिवत राहणारा शे अशी ज्यानाबद्दल साक्ष शे, त्याले मिळस. अस म्हणता ईकी जवय अब्राहामनी दहावा हिस्सा दिधा त्या अर्थतीन ज्यानं वंशच दहावा हिस्सा लेतस तो लेवी त्यानी बी तो दिधा अस म्हणता ई. 10 कारण तवय लेवीना जन्म व्हयेल नव्हता जवय त्याना पुर्वज अब्राहाम मलकीसदेकले भेटना.
11 लेवीय याजकपणना आधारवर इस्त्राएल लोकसले नियमशास्त्र देवामा वनं. आते जर लेवीय याजकसनं काम परीपुर्ण ऱ्हातं तर दुसरा प्रकारना याजकनं म्हणजे अहरोनना नही पण मलकीसदेकना परंपराना शे त्यानी येवानी गरज व्हती. 12 याजकपण बदलनं म्हणजे नियमशास्त्र बी अवश्य बदलस. 13 ज्यानाबद्दल हाई वचन सांगं तो, ज्या वंशमाधला कोणीच याजक म्हणीसन वेदीजोडे काम करेल नव्हतं, असा दुसरा वंशमाधला शे. 14 कारण आपला प्रभु यहुदाना वंशमातीन व्हता हाई उघड शे, जवय मोशे याजकपणबद्दल बोलस तवय या वंशना त्यानी उल्लेख करा नही.
मलकीसदेकनामायक दुसरा याजक
15 हाई गोष्ट तवय बी स्पष्ट व्हई जास जवय मलकीसदेकनामयक कोणी दुसरा याजक उभा व्हई जास. 16 जो शारिरीक व्यवस्थाना नियमनूसार नही, पण अविनाशी जिवनना सामर्थ्यघाई बनेल असा व्हता. 17 त्यानाबद्दल शास्त्र अस सांगस की; “तु मलकीसदेकना संप्रदायनामायक युगानुयुगना याजक शे.” 18 जुननी आज्ञा कमजोर अनं निरूपयोगी असामुये ती बाजुले करामा वनी. 19 कारण मोशेना नियमशास्त्रघाई काहीच व्यवस्थित व्हयनं नही. अनी अधिक चांगली आशा देवामा येल शे, त्या आशाना द्वारा आपण देवजोडे जातस. 20 अनी देवनी शपथसुध्दा शे. जवय दुसरा याजक व्हयनात तवय त्या शपथशिवाय व्हयनात. 21 अनी “ ‘तु युगानुयुग याजक शे’ अशी शपथ देवनी लिधी, अनी ती तो बदलाव नही,” अस ज्यानी त्यानाबद्दल सांगं त्याना त्या शपथघाई येशु हाऊ याजक व्हयना. 22 त्यामुये येशु त्यानापेक्षा चांगला करारना हामी बनेल शे.
23 त्यासले कायम टिकी राहता येस नही कारण मरणना त्यासले अडथळा असामुये बराच याजक व्हईसन गयात. 24 पण येशु युगानुयुग ऱ्हावामुये त्यानं याजकपण कायमनं शे. 25 यामुये त्यानाद्वारा देवकडे जाणारासले हाऊ पुर्णपणे तारण कराले समर्थ शे, कारण त्यासनाकरता मध्यस्थी कराले हाऊ सर्वदा जिवत शे.
26 असाच प्रमुख याजक आपले ऱ्हावाले पाहिजे हाई योग्य व्हतं, येशु पवित्र, सात्विक, निर्मळ, पापी जणसपाईन येगळा अनं आकाशतीन उच्च करामा येल असा शे. 27 त्याले त्या दुसरा प्रमुख याजकसनामायक पहिलींदाव स्वतःना पापसकरता, मंग लोकसना पापसकरता, प्रत्येक दिनले यज्ञ करानं आवश्यक नही. तवय एकदावच सर्वासकरता त्यानी स्वतःनं अर्पण करं. 28 नियमशास्त्र दुर्बळ असा माणुसले प्रमुख याजक नेमस, पण नियमशास्त्रना नंतर देवनी शपथ लिसन देयल वचन “युगानुयुग” परिपुर्ण करेल “पुत्रले” नेमस.
* 7:2 दशमांश आपली कमाईना दहावा भाग (दहा टक्का)