9
पृथ्वीवरली अनं स्वर्गमाधली आराधना
पहिला करारमा बी उपासनाना विधी व्हतात अनं एक पवित्रस्थान व्हतात, ज्या पृथ्वीवर व्हतात. पहिला मंडप तयार करेल व्हता त्यामा दिवासनी समई, मेज अनी समर्पित भाकरी व्हत्यात, त्याले पवित्रस्थान म्हणेल शे. अनी दुसरा पडदाना पलिकडे परमपवित्र स्थान म्हणेत तो मंडप व्हता. त्यामा धुप जाळाकरता सोनानी एक वेदी अनी करारना कोश व्हता. या कोशमा मान्ना ठेयल सुवर्णपात्र, कळ्या येल अहरोननी काठी, अनं करारना आज्ञासन्या दगडी पाट्या या व्हत्यात. अनी त्यानावर गौरवशाली करूबीम* आपला पंखासघाई दयासनवर छाया करी राहिंतात, पण आम्हीन या सर्व गोष्टीसनं आठे सविस्तर वर्णन करू नही शकावुत.
या वस्तुसनी अशी व्यवस्था करेल व्हती तरी याजक त्यासनी सेवा कराकरता पहिला मंडपमा कायम जात राहतस. दुसरामा प्रमुख याजक मात्र वरीसमातीन एकदावं स्वतःबद्दल अनं लोकसना अज्ञानमुये व्हयेल पापसबद्दल जे रक्त देवले अर्पण करानं ते लिसन जास, त्यानाशिवाय जास नही. पवित्र आत्मा स्पष्टपनतीन दखाडस की, जोपावत पहिला मंडप उभा शे, तोपावत परम पवित्रस्थाननी वाट प्रकट व्हस नही. तो मंडप वर्तमान काळमा प्रतिकाना रूपमा शे, त्यानी व्यवस्थाप्रमाणे उपासकना विवेकभाव शुध्द कराकरता समर्थ नहीत असा दानं अनं यज्ञपशु अर्पण करामा येस. 10 कारण हाई फक्त खावानं पेवानं अनी शुध्दीकरणना येगयेगळा विधीसले जोडेल शारिरीक नियम शेतस, देवनी जे सुधारनुकना नवा काळपावत लाई देयल व्हतं.
11 पण जवय ख्रिस्त येणाऱ्या चांगल्या गोष्टीसना पहिलाच प्रमुख याजक व्हईसन प्रकट व्हयना तर त्यानी आखो मोठा अनं परीपुर्ण मंडप मातीन व्हईसन प्रवेश करा जो मनुष्यना हाततीन बनाडेल मंडप नव्हता, म्हणजे हाई सृष्टीना नव्हता. 12 अनी बोकड अनी वासरू यासनं रक्त नही तर स्वतःनं रक्त लिसन एकदाच परमपवित्र स्थानमा गया अनी त्यानी सार्वकालिक मुक्ती मिळाई लिधी. 13 कारण विधीनानुसार जर अशुध्द लोकसवर बोकडसनं अनी बैलसनं रक्त तसच वासरूना राखना शितडा पडनात म्हणजे शरिरना शुध्दताकरता पवित्र करस. 14 तर सार्वकालिक आत्मानाद्वारा ज्यानी निष्कलंक अस स्वतःनं देवले अर्पण करं त्या ख्रिस्तनं रक्त तुमना विवेकभाव जिवत देवना सेवा करता निर्जीव कामसपाईन कितलं तरी विशेषतातीन शुध्द करी.
15 अनी ख्रिस्त यानाकरताच नवा करारना मध्यस्थी शे, कारण पहिला करारमा त्यासनी ज्या पापं करात त्यानापाईन खंडणी भरीसन मुक्ती कराकरता तो मरणा, यानाकरता की पाचारण व्हयेलसले वचन देयल सार्वकालिक आशिर्वाद भेटाले पाहिजे.
16 कारण जठे मृत्युपत्र शे तठे कर्ताना मृत्यु व्हनं आवश्यक शे. 17 मृत्यु व्हवानंतर मृत्युपत्र अमलमा येस, कारण मृत्युपत्र कर्ता जिवत शे तोपावत ते कधीच चालावु नही. 18 यामुये पहिला करारनी बी स्थापना रक्तशिवाय व्हयनी नही. 19 मोशेनी नियमशास्त्रप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकसले सांगावर, तवय त्यानी पाणी, किरमीजी लोकर अनं एजोबनं वनस्पतीन्या फांद्या यासनासंगे वासरू अनी बोकडनं रक्त लिसन नियमशास्त्रना पुस्तकवर अनं सर्व लोकसवर शिंपडं. 20 अनी तो बोलना, “जो करार देवनी आज्ञा करीसन तुमनाकरता दिधा त्यानं हाई रक्त शे.” 21 अनी तसच मोशेनी मंडप अनं आराधनामा वापरेल सर्व पात्रसवर रक्त शिंपडं. 22 नियमशास्त्रप्रमाणे रक्तघाई जवळपास सर्व शुध्द व्हतस अनी रक्त वाहत नही तोपावत पापसनी क्षमा व्हस नही.
ख्रिस्तना बलीदानद्वारा पापासनी क्षमा
23 यामुये शे की, स्वर्गीय वस्तुना प्रतिमासनं या पशुसना अर्पणस द्वारा शुध्द कराई जास, पण स्वर्गीय वस्तु स्वतःबी यानापेक्षा उत्तम बलिदानद्वारा शुध्द व्हणं आवश्यक व्हतं. 24 खऱ्या गोष्टीसना नमुनाना मायक हातसनी करेल पवित्रस्थान यामा ख्रिस्त गया नही, तर आपलाकरता देवनापुढे उभा ऱ्हावाकरता स्वर्गमा गया. 25 अनी जसा प्रमुख याजक प्रत्येक वरीसले दुसरासनी देयल पशुसना रक्त लिसन परमपवित्र स्थानमा जास, तसा ख्रिस्त स्वतःले परत परत अर्पण कराले गया नही. 26 तो जर जाता तर जगनी स्थापनापाईन ख्रिस्तले परत परत दुःख सोसनं पडतं, पण तो युगना समाप्तीले स्वतःना अर्पणघाई पापं नष्ट कराकरता एकदावंच प्रकट व्हयेल शे. 27 जस मनुष्यले एकदावनं मरणं अनी त्यानानंतर देवकडतीन न्याय व्हणं नेमी ठेयल शे. 28 तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.
* 9:5 करूबीम पंख व्हतात असा प्राणी