10
1 यहूदी नियमशास्त्रमा तर भावी चांगल्या वस्तुसना वास्तविक प्रतिमा नही, पण सावली शे, लोकसकडतीन देवले कायम वरीस दर वरीस चढाई जाणारा अर्पणसघाई जोडे येणाराले नियमशास्त्र कधीच योग्य ठरावु शकस नही?
2 ते जर योग्य ठरावतं तर, एकदाव शुध्द व्हयेल लोके देवनी आराधना करनारासनं यानापुढे जर पाप सरी जातं तर त्यासनं अर्पण करानं बंद व्हतं नही का.
3 पण ते यज्ञ वरीसनंवरीस पापसनी आठवण करी देतस.
4 कारण बैलसनं अनी बोकड्यासनं रक्त यासनामुये पापं दुर व्हतीन हाई अशक्य शे.
5 यामुये ख्रिस्त जगमा येतांना देव बोलना,
“यज्ञपशु अनी अन्न यासनं अर्पण ह्या तुले पाहिजे नव्हतात,
तु मनाकरता शरीर तयार करेल शे;
6 तु होमबली अनी पापसकरता करेल
अर्पणंसनी तुले आनंद व्हयना नही,
7 तवय मी बोलनु, ‘हे परमेश्वर, हा मी शे, मी तुनी ईच्छा पुरी कराकरता येल शे, नियमशास्त्रमा मनाबद्दल हाईच लिखेल शे.’ ”
8 वर उल्लेख करेलप्रमाणे सुरवातले तो बोलना, “अर्पण, अन्नार्पणं, होम अनं पापसबद्दल अर्पण, यासनी तुले ईच्छा नही अनं त्यामा तुले काहीच आनंद नही.” जरी ह्या सर्व अर्पण नियमशास्त्रप्रमाणे करामा ई राहिंतात तरी तो अस बोलना,
9 अनी मंग तो बोलना, “मी तुनी ईच्छाप्रमाणे कराले येल शे,” तो पहिला यज्ञसले काढी टाकस अनी ख्रिस्तना यज्ञनी स्थापना करस.
10 देवना “ईच्छातीन” आपण येशु ख्रिस्तना शरिरनं एकदाच व्हयेल अर्पणद्वारा पवित्र करेल शेतस.
11 प्रत्येक यहूदी याजक दररोज सेवा करत अनी ज्या यज्ञ पापं दूर कराकरता कधीच समर्थ नहीत तेच तो घडीघडी करत उभा ऱ्हास.
12 पण ख्रिस्त तर याजकना बनीसन पापसबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पण करीसन देवना उजवीकडे बठेल शे.
13 अनी देव त्याना वैरीसनं त्यानं पादासन करस नही तोपावत तो वाट दखी राहीना.
14 पापसपाईन शुध्द व्हणारासले त्यानी एक अर्पणघाई सर्वकाळकरता पवित्र करेल शे.
15 पवित्र आत्मा बी आपले साक्ष देस ती अशी, पहिले परमेश्वर बोलस;
16 “त्या दिनस नंतर जो करार मी त्यासनासंगे करसु
अस परमेश्वर म्हणस ते हाई शे;
मी आपला नियम त्यासना हृदयसमा ठेवसु,
अनी ते त्यासना मनवर लिखसु,”
17 अस म्हणावर तो म्हणस, “त्यासना पापं अनी त्यासना दुष्ट कामेसनी यापुढे मी आठवण करावु नही.”
18 तर मंग जठे त्यासनी क्षमा व्हयनी तठे पापसबद्दल अर्पण ऱ्हावाले नको.
चला आपण देवजोडे जाऊत
19 यामुये हे भाऊ अनी बहिणीसवन, आपले येशुना मरणना द्वारा परमपवित्र स्थानमा जावाकरता पुरी सुट भेटनी,
20 त्यानी पडदातीन म्हणजे आपला स्वतःना शरिरनाद्वारा आपलाकरता एक नवी अनी जिवत वाट उघडी.
21 अनी आपलाकरता एक असा प्रमुख याजक शे जो देवना घरवर अधिकारी शे.
22 तर चला, आपण खरा मनतीन अनी पुरा ईश्वासतीन अनी विवेकना दोष दूर कराकरता शिंपडेल हृदय लिसन, अनी शरिरले शुध्द पाणीघाई धोईसन, देवनाजोडे जाऊत.
23 या, आपण आशा धरी ठेयल शे तिले भक्कम धरी ठेवुत, कारण ज्यानी वचन देयल शे तो देव ईश्वासयोग्य शे.
24 प्रिती अनी चांगला कामे कराकरता उत्तेजन भेटी अस एकमेकसकडे ध्यान द्या.
25 आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.
26 कारण सत्यनं ज्ञान भेटानंतर आपण जाणीबुजीसन पाप करं तर पापसबद्दल यानापुढे यज्ञ व्हनार नही.
27 न्याय व्हवानी भयंकर अशी मार्गप्रतीक्षा अनी विरोधकसले नष्ट करी टाकी असा अग्नीप्रकोप राखीन ठेयल शे.
28 मोशेनं नियमशास्त्र जर कोणी तुच्छ मानं तर त्यानावर दया व्हस नही, त्याले दोन्हीसना किंवा तिन्हीसना साक्षमुये मरणदंड व्हस.
29 तर ज्यानी देवना पोऱ्याले पायखाल तुडावं, देवना पोऱ्या स्वतः पवित्र व्हयेल व्हता त्यानं ते करारनं रक्त अपवित्र मानं अनी कृपाना आत्माना अपमान करा असा तो कितला कठीण दंडकरता पात्र ठरी, ईचार करा!
30 “सुड लेनं मनाकडे शे, मी फेड करसु” हाई ज्यानी सांगं तो आपले माहीत शे अनी आखो बोलना, “प्रभु आपला लोकसना न्याय करी.”
31 सदाजिवत देवना हातमा सापडनं हाई भयंकर शे!
32 तुम्हीन पहिला दिनसनी आठवण करा. त्यामा तुमले देवना प्रकाश भेटावर, तुम्हीन दुःखसना सामना बराच धीर धरीसन करा.
33 तवय निंदा अनं संकट सोसामुये तुम्हीन लोकसले तमाशा व्हयनात, तर कधी अशी दशा व्हयेल लोकसना भागीदार व्हयनात.
34 कारण तुम्हीन कैदीसले सहानुभुती दखाडी अनी तुमनी संपत्तीनं नुकसान व्हयनं तरी त्याना तुम्हीन हाई समजीसन आनंद करा की तुमना जोडे आखो चांगली अनी टिकावु संपत्ती शे.
35 यामुये आपली हिम्मत सोडू नका, त्यापाईन मोठं प्रतिफळ शे.
36 तुमले हिम्मतनी गरज शे, यानाकरता की तुम्हीन देवनी ईच्छाप्रमाणे वागीसन वचननं फळ प्राप्त करी लेवाले पाहिजे.
37 कारण शास्त्र सांगस;
“थोडाच येळ राहेल शे, जो येवाव शे तो ई,
तो उशीर करावु नही.
38 मना नितीमान लोकं ईश्वासतीन वाचतीन;
तो जर माघार ली,
तर त्यानाबद्दल माले चांगलं वाटावु नही.”
39 नाश व्हई अशी माघार लेणारसपैकी आपण नही, तर जिवना उध्दारकरता ईश्वास धरणारा लोकासपैकी शेतस.