11
ईश्वास
आते ईश्वास हाऊ आशा करेल गोष्टीसना भरवसा अनी न दखावणाऱ्या गोष्टीसबद्दलनी खात्री अशी शे. ईश्वासबद्दलनं आपला पुर्वजसनं नाव व्हतं.
ईश्वासमुये आपले समजस की देवना शब्दतीन सृष्टीनी रचना व्हयनी, अस की ज्या गोष्टी दखास ते दखावणाऱ्या वस्तुसपाईन व्हयेल नही.
हाबेलनी काईनपेक्षा चांगला यज्ञ ईश्वासतीन देवले अर्पण करा, त्यामुये तो नितीमान शे अशी त्यानाबद्दल साक्ष व्हयनी. अनी ती साक्ष दान देवाना येळले देवनी दिधी अनी तो मरणा तरी बी त्या ईश्वासनाद्वारा आत्ते बी बोलस.
मरणना अनुभव येवाले नको म्हणीसन ईश्वासतीन मरण न दखताच हनोखले देवनी वर उचली लिधं, तो सापडना नही कारण त्याले देवनी उचली लिधं, त्याना पहिले त्यानाबद्दल शास्त्र अस सांगस की, तो देवले खूश करे. अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
जे आजपावत दखामा येल नव्हतं त्यानाबद्दल देवना सुचना नोहानी ऐकं अनी आदरतीन भय धरीसन आपला कुटुबंना उध्दारकरता ईश्वासतीन तारू तयार करं, त्या ईश्वासनाद्वारा त्यानी जगले दोषी ठरावं अनी ईश्वासनाद्वारा जी नितिमत्वना शे त्याना तो वारसदार व्हयना.
अब्राहामले पाचारण व्हवानंतर जे ठिकाण त्याले वतन म्हणीन मिळणार व्हतं तठे जावाकरता तो ईश्वासतीन तयार व्हयना अनी आपण कोणता देशमा जाई राहीनु हाई त्याले माहीत नव्हतं तरी तो निंघी गया. ईश्वासतीन तो देवनी वचन देयल देशमा परकानामायक जाईसन राहीना, त्याच वचनना सोबती वारसदार इसहाक अनं याकोब यासनामायक तो तंबुमा राहीना. 10 कारण ज्याले पाया शे, ज्यानी आखनी अनी बांधनी करनारा देव शे, असा शहरनी अब्राहाम वाट दखी राहिंता.
11 ईश्वासतीन अब्राहाम जरी तो धल्ला व्हता अनी सारा वांज व्हती तरी त्या मायबाप व्हयनात, कारण देवनी त्याले वचन देयल व्हतं त्याले त्यानी ईश्वासयोग्य मानं. 12 त्यामुये एकपाईन अनी तो बी निर्जीव व्हयेल असापाईन, संख्यामा आकाशना तारासनामायक अनं समुद्रना काठवरली वाळूनामायक मोजता येवाव नही इतली संतती निर्माण व्हयनी. 13 या सर्वा ईश्वास धरीसन मरणात, त्यासले वचनफळ मिळनं नव्हतं, तर त्यासनी ती दुरतीनच दखी अनं त्याले वंदन करं अनी आपण पृथ्वीवर परका अनं प्रवाशी शेतस अस सांगी दखाडं. 14 अस बोलनारा आपण स्वतःना देशना शोध करी राहीनुत अस दखाडतस. 15 जर त्यासनी ज्या देशले सोडं अनी त्या देशबद्दल त्या ईचार करत राहिनात नही जर ईचार करतस तर त्यासले परत जावाले संधी व्हती. 16 पण त्या अधिक चांगला देशनी म्हणजे स्वर्गीय देशनी आशा धरतस, यामुये देवले त्यासनी लाज वाटस नही, त्यासना देव म्हणाले तो लाजस नही, त्यानी त्यासनाकरता एक शहर तयार करी ठेयल शे.
17 अब्राहामनी आपली परिक्षामा ईश्वासतीन इसहाकनं अर्पण करं ते आपले माहीत शे. ज्यानी वचनं स्विकारेल व्हतात तो आपला एकुलता एक पोऱ्यानं अर्पण कराकरता तयार व्हयना. 18 देवनी त्याले अस सांगं व्हतं की, “इसहाकपाईन तुना नावना वंश चाली.” 19 तवय इसहाकले मरेल मातीन बी जिवत कराले देव समर्थ शे, अस अब्राहामानी ध्यानमा लिधं अनी त्या परीस्थितीमा देव त्याले दृष्टांतना रूपमा परत भेटना.
20 इसहाकनी याकोबले अनं एसावले भावी गोष्टीसबद्दल ईश्वासतीन आशिर्वाद दिधात.
21 याकोबनी मराना येळले योसेफना प्रत्येक पोऱ्याले ईश्वासतीन आशिर्वाद दिधा अनी जी काठी धरीन तो चाले तीना टोकवर टेकीसन त्यानी देवनी उपासना करी.
22 योसेफनी मराना येळले इस्त्राएलना लोके मिसरमातीन बाहेर येतीन असं ईश्वासतीन सांगं अनं आपला अस्थीबद्दल काय करानं हाई आज्ञा करी.
23 मोशेना जन्म व्हयना तवय त्याना मायबापनी ईश्वासतीन त्याले तीन महिना दपाडी ठेवं. कारण ते बाळ सुंदर शे अस त्यासनी दखं, अनं त्यासले राजानी देयल आज्ञानं भय वाटनं नही.
24 मोशेनी प्रौढ व्हवानंतर स्वतःले फारोनी पोरना पोऱ्या म्हणनं हाई ईश्वासतीन नाकारी दिधं. 25 पापनं क्षणभरनं सुख भोगापेक्षा त्यानी देवना लोकससंगे दुःख भोगनं पसंद करं. 26 ख्रिस्तमुये अपमान सोसनं हाई मिसर देशना धनपेक्षा उत्तम संपत्ती शे अस त्यानी मानं, कारण त्यानी नजर भावी प्रतीफळवर व्हती.
27 मोशे राजाना क्रोधले भ्यायना नही अनी ईश्वासतीन मिसर देश सोडा, कारण जो अदुश्य शे त्याले जस तो दखी राहीना असा त्यानी धीर धरा. 28 त्यानी वल्हांडण सण अनं दरवाजासवर रक्त शिंपडनं या विधी ईश्वासतीन पाळ्यात, यानाकरता की मरणंना देवदूतनी इस्त्राएलसना पहिला जन्मलेलसले मारं नही.
29 जस कोरडी जमीनवर तसा इस्त्राएलना लोके ईश्वासतीन तांबडा समुद्रमातीन पार गयात, मिसरी लोकसनी तसच कराना प्रयत्न करा पण त्या बुडी गयात.
30 ईश्वासतीन यरीहोना गावकुसना आजुबाजू सात दिनपावत इस्त्राएल लोकसनी फेऱ्या माऱ्यात तवय ती भिंत पडनी. 31 ईश्वासतीन राहाब वेश्यानीं जासुसना स्विकार चांगला भावतीन करामुये तिना देवनी आज्ञा मोडणारासंगे नाश व्हयना नही.
32 आत्ते आखो काय सांगु? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल अनं संदेष्टा यासनं वर्णन करू लागनु तर येळ पुराव नही. 33 त्यासनी ईश्वासतीन राज्य जिंकात, नितीमत्वनुसार वागनात, वचनसना स्विकार करा, सिंहसना तोंड बंद करात, 34 अग्नीनी शक्तीले शांत करी दिधं, त्या तलवारना धारपाईन वाचनात, त्या दुर्बळ व्हतात पण बलवान कराई गयात, लढाईमा पराक्रमी व्हयनात, त्यानी परकासना सैन्यसले पळाई लिधं. 35 ईश्वासतीन बायासले त्यासना मरेल माणसे अनी नातेवाईक पुनरूत्थानघाई जिवत व्हयेल असा भेटनात, कितलातरी जणसनी आपले जास्तीनं चांगलं पुनरूत्थान मिळाले पाहिजे म्हणीसन सुटका न करी लेता मरणनामायक यातना सहन कऱ्यात. 36 अनी बाकीनासले टवाळकी, मारहाण यासना अनी बंधनं अनं कैद यासना बी अनुभव वना.
37 त्यासले दगडमार करा, करवतघाई चिरं, त्या तलवारना धारतीन मरणात, त्या मेंढरंसनी अनं बकरीसनी कातडी पांघरीन फिरी राहिनतात, त्या लाचार, पीडीत, त्रासेल अस व्हतात. 38 जग त्यासले योग्य नव्हतं, ते ओसाड प्रदेशमाईन, डोंगरसमाईन, गुहामातीन अनं भुमीना कपारीसमाईन भटकी राहिंतात.
39 या सर्वासबद्दल त्यासना ईश्वासतीन चांगली साक्ष देयल व्हती तरी बी त्यासले वचनफळ प्राप्त व्हयना नही. 40 देवनी जे उत्तम ते आपलाकरता पुर्वीच नेमीन ठेयल व्हतं. अनी त्याना उद्देश असा व्हता की आपलासंगेच त्यासनी पुर्ण व्हवाले पाहिजे.
11:3 योहान १:३