12
देव आपला पिता
1 तर मंग आपण येवढा मोठला साक्षरूपी ढगसघाई इतला घेरायेल शेतस म्हणीसन आपण बी सर्व दडपण अनी सहज आपले गुंताई लेणारं पाप टाकीसन, तर या आपले नेमी देयल धावमा धीरतीन पळाले पाहिजे.
2 आपण आपला ईश्वासना उत्पन्नकर्ता अनी तो ईश्वास पुरा करणार येशु यानाकडे दखत ऱ्हावानं. त्यानापुढे जो आनंद ठेयल व्हता त्याले तुच्छ मानीसन क्रुसखांब सहन करा अनी तो देवना राजासनना उजवीकडे बठेल शे.
3 ज्यानी, आपला विरोधमा पाप करनारासनी करेल इतला विरोध सहन करा त्यानापाईन शिका, म्हणजे तुमना मने खचीसन धीर सुटाव नही.
4 तुम्हीन पापनासंगे संघर्ष करतांना मरापावत इतला प्रतिकार आजुनपावत करा नही.
5 जो बोध लेकरंसले कराले पाहिजे तसा तुमले करा तो तुम्हीन ईसरी गयात का,
“मना पोऱ्या, प्रभुनी शिस्तना अनादर करू नको,
अनी त्यानाकडतीन दोष पदरमा पडना तर तु खचु नको,
6 कारण ज्यानावर प्रभु प्रिती करस त्याले तो शिक्षा करस,
अनी ज्या पोऱ्यासले तो स्विकारस त्या प्रत्येकले फटका मारस.”
7 बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे?
8 जर तुमले इतर पुत्रसनामायक शिक्षा व्हयनी नही तर त्याना अर्थ असा की तुम्हीन त्याना खरा पोऱ्या नहीत तर तुम्हीन दासीपुत्र मायक शेतस.
9 शिवाय शिक्षा करनारा असा शारिरीक बाप आपले व्हतात अनी आपण त्यासनी आस धरी, तर मंग आपण विशेष करीसन जो जिवत अनी आत्मिक पिता त्याना अधीन राहीसन जिवत ऱ्हावाले नको का!
10 कारण आपला शारिरीक बाप त्यासना मनले पटनं तशी थोडा दिन शिक्षा करी, पण देव जे करस ते आपला हितकरता, म्हणजे आपण त्याना पवित्रपणना भागीदार व्हवाले पाहिजे म्हणीसन करस.
11 कोणती बी शिक्षा लगेच आनंद देणारी वाटस नही, खेदनी वाटस, तरी ज्यासले तिना अभ्यास व्हयेल शे त्यासले ती पुढे न्यायीपणं हाई शांतीकारक फळ देस.
बोध अनी इशारा
12 यामुये कमजोर हात उंच करा अनी लटपटणारा गुडघा बळकट करा,
13 अनी आपला पापसकरता सरळ वाटा करा यानाकरता की लंगडासना पाय निकामी व्हवाले नको तर उलटा त्या बरा व्हवाले पाहिजे.
14 सर्वासंगे शांतीमा ऱ्हावानं अनी ज्यानाशिवाय प्रभुनं दर्शन व्हस नही त्यासनी पवित्रकरण मिळाडाना मांगे लागा.
15 देवनी कृपापाईन कोणीच दुर जावाले नको, कोणी कडूपणना मुळतीन उगीसन चुकीन्या गोष्टी कराले नको, अनं त्यामुये बराच जणसले विटाळ व्हई ते व्हवाले नको,
16 कोणी व्यभिचारी असाले नको, ज्यानी जेवणकरता आपलं जेष्ठपण ईकं त्या एसावनामायक कोणी ऐहीक बुध्दीना ऱ्हावाले नको, याकडे ध्यान द्या.
17 तुमले माहीत शे त्यानानंतर तो वारस हक्कतीन आशिर्वाद मियाडा करता ईच्छा करी राहींता पण त्याले परत रिकामा हात धाडामा वनं, त्यानी जरी अश्रु काढीसन बराच प्रयत्न करात तरी बापनं मन फिरावनं त्याले जमनं नही.
18 जसा इस्त्राएल लोकसनामायक तुम्हीन सिनाय पर्वतपावत वनात नही स्पर्शज्ञान अनं पेटेल अग्नी, गाड अंधार, घोर नैराष्य, वादय,
19 कर्णासना नाद अनं शब्दसना आवाज, यासनाजोडे तुम्हीन अजुन पावत वनात नही; ती वाणी ऐकणारासनी ईनंती करी की, तिनासंगे आमनं जास्त बोलनं व्हवाले नको,
20 कारण “जनावर बी डोंगरले शिवना म्हणजे त्यासले दगडसघाई मारानं” अशी जी आज्ञा ती त्यासनाघाई सहन व्हयनी नही.
21 अनी जे दिसनं ते ईतलं भयानक व्हतं की, मोशे बोलना, “मना भलताच घाबरीसन थरकाप व्हयेल शे!”
22 पण तुम्हीन सियोन डोंगर, सदाजिवत देवनं स्वर्गीय शहर यरूशलेम, लाखो देवदूत,
23 स्वर्ग माधला यादीमधला पहिला जन्मलेलसनी आनंदी मंडळी, सर्वासना न्यायाधीश देव, पुरा करेल न्यायी लोकसना आत्मा,
24 नवा करारना मध्यस्थी येशु, अनी शिंपडानं रक्त यानाजोडे येल शेतस, त्या रक्तनं बोलनं हाबेलना रक्तपेक्षा उत्तम गोष्टीसनं अभिवचन देस.
25 जो बोली राहीना त्याना अपमान व्हवाले नको म्हणीसन जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणारासना अपमान करनारा जर टिकनात नहीत, तर स्वर्गमातीन आज्ञा सांगणारासना अपमान करनारा तुम्हीन अजिबातच टिकावुत नही.
26 त्या येळले त्यानी वाणीघाई पृथ्वी हालनी अनी आते त्यानाबद्दल त्यानी अस वचन देयल शे की, “आखो एकदाव मी नुसती पृथ्वी नही तर आकाश बी कंपनमाय करसु.”
27 “आखो एकदाव” या शब्दसघाई असा बोध व्हस की, बनाडेल वस्तुसनामायक हालायेल वस्तु नष्ट व्हतीन अनी ज्या हालाई जावावुत नही त्या ऱ्हातीन.
28 आपण त्या देवना उपकार मानुत, कारण न हालणारं राज्य आमले भेटेल शे अनी देवले आवडी अशी जी सेवा सुभक्तीघाई अनी भय धरीसन करूत,
29 कारण आपला “देव भस्म करनारा अग्नी बी शे.”