13
देवले कसं आनंदीत करानं
ईश्वासु भाऊ अनी बहिणीसवन एकमेकसवर प्रिती करत राहा. प्रेमतीन अनोळखीसना पाहूणचार करानं ध्यानमा ठेवा, कारण त्यामुये कितलातरी जणसनी देवदूतसना पाहूणचार न समजता करेल शे. तुम्हीन कैदीसंगे कैदमा शेतस अस समजीन त्यासनी आठवण करा, आपण बी संकटमा शेतस अस समजीन ज्या पिडामा शेतस त्यासनी आठवण ठेवा.
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
तुमनी वागणुक पैसासना लोभवीना असाले पाहिजे, जोडे शे तितलामा तुम्हीन तृप्त असाले पाहिजे, कारण देवनी स्वतः म्हणेल शे, “मी तुले सोडाव नही अनं तुले टाकावं बी नही.” यामुये आम्हीन हिम्मत धरीसन म्हणतस;
“परमेश्वर मना साहाय्यकर्ता शे, मी भिणार नही,
माणुस मनं काय करी?”
ज्या तुमना अधिकारी शेतस, ज्यासनी तुमले देवनं वचन सांगं, त्यानी आठवण करा, त्यासनी वागणुकना परिणाम ध्यानमा लिसन त्यासना ईश्वासनं अनुकरण करा. येशु ख्रिस्त कालदिन, आज अनं युगानुयुग मायकच शे. विचित्र अनं चुकीना शिक्षणघाई खरी वाटपाईन भटकी जावु नका, कारण जी विधी पाळणारासले लाभ व्हयना नही असा खावाना विधीसघाई नही, तर कृपाघाई मनले स्थिर करनं हाई चांगलं शे.
10 ज्या याजक यहूदी सभामंडपनी सेवा करतस त्यासले वेदीवरनं खावाणा काहीच अधिकार नही 11 ज्या जनावरनं रक्त पाप बद्दल यहूदी मुख्य याजकसना द्वारा परमपवित्र स्थानमा लई जातस त्यासना शरीर तळबाहेर जाळतस. 12 यामुये येशुनी बी आपला रक्तघाई लोकसले पवित्र करावं म्हणीसन शहरना बाहेर मरण सहन करा. 13 तर आते आपण त्याना अपमानमा सहभागी व्हवाकरता त्यानाजोडे तटना बाहेर जाऊत. 14 कारण आपले आठे कायमनं शहर नही, तर जे शहर व्हवाव शे त्यानी वाट आपण दखतस. 15 यावरतीन आपण येशु द्वारा देवले उपकार स्मरणरूपी यज्ञ निरंतर अर्पण करानं, हाऊ यज्ञ त्याना नावना स्विकार करनारासना ओठनं फळना मायक शे. 16 इतरसले दानधर्म करानं ईसरू नका, कारण असा यज्ञ देवले आवडतस.
17 तुम्हीन आपला अधिकारीसना आज्ञामा ऱ्हावा अनी त्यासनासंगे ईमानदारीमा ऱ्हा, कारण आपले हिशोब देना शे अस समजीसन त्या तुमना जीवकरता जागृत राहतस, तुम्हीन त्यासन्या आज्ञा पाळ्यात तर त्या त्यासनं काम खूशीतीन करतीन जर नही पाळ्यात तर त्या आपले काम दुःखतीन करतीन, अनी त्याना तुमले काहीच फायदा व्हवावु नही. 18 आमनाकरता प्रार्थना करत रहा. आमले खात्री शे की, शुध्द मनतीन चांगलं ते आम्हीन कायम करत राहसुत. 19 मी तुमले परत लवकरच भेटाले पाहिजे म्हणीसन कळकळीनी प्रार्थना करानी मी तुमले विशेष ईनंती करस.
शेवटनी प्रार्थना
20 आते ज्या शांतीना देवनी सर्वकाळना करारना रक्तघाई मेंढरसना महान मेंढपाळ आपला प्रभु येशु, याले मरेलस मातीन माघारे परत आणं. 21 तो देव आपली नजरतीन जे आवडस ते आपलामा येशु ख्रिस्तनाद्वारा करो अनी आपली ईच्छानुसार वागाकरता तुमले प्रत्येक काममा सिध्द करो, ख्रिस्तना युगानुयुग गौरव असो. आमेन.
शेवटला शब्द
22 भाऊ अनी बहिणीसवन, तुमले ईनंती करस की, हाई बोधवचन शांततातीन सहन करा, कारण मी थोडासा लिखेल शे. 23 आपला ईश्वासु बंधु तीमथ्य यानी सुटका व्हयेल शे हाई तुमले कळाले पाहिजे, तो लवकर वना तर त्याले संगे लिसन मी तुमले भेटाले येस.
24 तुम्हीन आपला सर्व अधिकारीसले अनं सर्व पवित्र जणसले आमना सलाम सांगा, इटलीना भाऊ अनं बहिणी त्यासना सलाम तुमले सांगतस,
25 देवनी कृपा तुमनासंगे राहो, आमेन.
13:5 अनुवाद ३१:६