याकोबाने लिहिलेले पत्र
याकोबनी लिखेल पत्र
वळख
याकोबनं पत्र हाई पुस्तक एक याकोब नावना माणुसनी लिखेल शे. तो येशु ख्रिस्तना भाऊ व्हता. तो मंडळीसना पुढारी अनी यरूशलेम मंडळी प्रेषित १५:१३ कमेटीना सदस्य व्हता. प्रेषित पौल त्याले कायम मंडळीना स्तंभ असा सांगस. गलती २:९ तज्ञ लोकसना ईचारनुसार याकोबनी हाई पत्र ख्रिस्त जन्मना ५० वरीस नंतर लिखेल शे. जवय याकोब यरूशलेम मातील मंडळीना पुढारी व्हता तवय त्यानी तठे राहतांना हाई पुस्तक लिखेल व्हतं.
त्यानी त्याना पुस्तकमा “राष्ट्रसमा पसरेल बारा वंशसवन” अस नमुद करस. याकोबनं पत्र या पुस्तकमातील धडा सर्व ख्रिस्ती लोकसकरता लागु व्हतस. पण “बारा वंश” १:१ या शब्दना वापर करामुये हाई शक्य व्हवु शकस की, याकोब हाई पत्र थेट यहूदी ख्रिस्ती लोकसले लिखी राहींता कारण हाई पुस्तक वाचणारा एक विशेष गटपावत पोहचाडाकरता व्हतं. त्यामातीन बराच विषयसवर चर्चा व्हयनी. याकोबनी ईश्वास अनी कृती यासनामातील संबंधवर भर देयल शे खरा ईश्वास प्रितीमा दखाडामा ई. २:१७. त्यानी श्रीमंत लोकसकरता पक्षपात दखाडाकरता चेतावणी देयल व्हती, २:१-४ अनी आपण कसं बोलाले पाहिजे यानाबद्दल सावध ऱ्हावाले सांगस. ३:१-१२
रूपरेषा
१. याकोब आपला वाचकसले नमस्कार करस. १:१
२. पुढे त्यानी ख्रिस्ती लोकसले जवय दुःख सहन करनं पडी तवय त्यासले धीरतीन प्रोत्साहन करस. १:२-२७
३. नंतर कृती करीसन ईश्वास दखाडाकरता ईश्वास व्यक्त करनं आवश्यक शे. २:१-२६
४. त्यानानंतर शब्द कितला शक्तीशाली ऱ्हास हाई तो सांगस. ३:१-१२
५. नंतर याकोब समजाडीन सांगस की, ईश्वरनं ज्ञान जगनी बुध्दीपेक्षा कसं येगळं शे हाई सांगस. ३:१३; ४:१०
६. पुढे त्यानी आपला वाचकसले अभिमान करानी चेतावणी दिधी. ४:११; ५:६
७. याकोबनी काही सामान्य सुचना दिसन आपलं पुस्तक पुर्ण करं. ५:७-२०
1
देवना अनी प्रभु येशु ख्रिस्तना दास याकोब याना कडतीन बारा वंशना पांगेल लोकसले सलाम;
ईश्वास अनी ज्ञान
मना भाऊ अनी बहिणीसवन, बराच प्रकारना संकटसघाई तुमनी परिक्षा व्हस तरी तुम्हीन आनंदच माना. तुमले माहित शे की, तुम्हीन ईश्वासनी परिक्षामा यशस्वी व्हवामुये तुमनामा धीर तयार व्हस; अनी धीरले आपलं काम पुरं करू द्या, यानाकरता की तुम्हीन कसामाच कमी नही पडता तयार अनी परिपुर्ण व्हवाले पाहिजे. तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस; पण त्यानी काही संशय नही धरता ईश्वासतीन मांगानं; संशय धरणारा वाराघाई ढकलेल अनं उंच ऊठणारा लाटासनामायक शे. असा माणुस आपले प्रभुकडतीन काहीतरी भेटी अस त्यानी समजी लेवाले नको. कारण असा माणुस दोन मनना ऱ्हास अनी आपला सर्व कामसमा चंचल ऱ्हास.
गरीबी अनी श्रीमंती
गरीबीमा राहणारा ईश्वासी लोकसनी देव त्यासले उच्च करी, यानाबद्दल त्यासनी आनंद कराले पाहिजे. 10 अनी श्रीमंतसनी देव त्यासले गरीबीमा टाकस तवय त्यासनी आनंद कराले पाहिजे; कारण त्या जंगली फुलना गवतनामायक नष्ट व्हतीन. 11 सुर्य फटकामा उगायना, उष्णताघाई गवतले सुकाडी टाकं अनी त्यासना फुले गळी गयात अनी त्यासनी सुंदरतानी शोभा गई असच श्रीमंत बी आपला व्यवसायना भरमा कोमाई जाई.
परिक्षा अनी मोह
12 जो माणुस परिक्षामा टिकस तो धन्य, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी. 13 कोणी परिक्षा व्हतांना, देवनी माले मोहमा टाकं, अस त्यानी म्हणाले नको कारण देवले वाईट गोष्टीसना मोह व्हस नही अनी तो स्वतःबी कोणले मोहमा टाकस नही. 14 तर प्रत्येक माणुस आपला वासनाघाई वढाई जाई अनी भुल व्हयेलना मायक मोहमा पडस. 15 मंग वासना गर्भवती व्हईसन पापले जन्म देस अनी पाप पक्क व्हवावर मरणले जन्म देस.
16 मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन फसु नका, 17 प्रत्येक चांगली देणगी अनं प्रत्येक पुर्ण दान देवकडतीन शे ते ज्याले विकार नही अनी जो सावली बदलस तसा बदलस नही असा प्रकाशाना देवबापकडतीन उतरस. 18 त्यानी आपला ईच्छातीन अनी सत्य वचनघाई आमले जन्म दिधा, यानाकरता की आपण त्याना बनाडेल वस्तुमातील प्रथम फळ व्हवाले पाहिजे.
ऐकनं अनी करनं
19 मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन तुमले हाई समजस यामुये प्रत्येक मनुष्य ऐकाले तेज, बोलाले सावकाश अनी रागले मंद असा ऱ्हावाले पाहिजे. 20 कारण मनुष्यना रागघाई देवना न्यायना कामे व्हतस नही. 21 यामुये सर्व मलिनता भरीसन येल वैरभाव सोडीन तुमना जिवननं तारण कराले समर्थ असा रूजेल वचन सौम्यतातीन स्विकाराले पाहिजे.
22 फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना. 23 कारण जर कोणी वचन नुसता ऐकीसन तसा कामे करस नही तर तो आरसामा आपलं तोंड दखणारा माणुसना मायक शे. 24 तो स्वतःले दखीसन तठेन निंघी जास अनी आपण कसा व्हतुत हाई तवयच ईसरी जास. 25 पण स्वतंत्रना पुर्ण नियमवर नजर टाकीन जो त्यानाकडे लक्षपुर्वक दखी ऱ्हास तो ऐकीन ईसरनारा असा नही व्हता कामे करनारा व्हस. अनं आपला कामसमा धन्यता मिळाडस.
26 मी धर्मचरण करनारा शे, अस कोणले वाटत व्हई अनी तर तो आपला जिभले आळा घालस नही अनी आपला मननी भुल करी लेस तर त्यानं धर्मचरण व्यर्थ शे. 27 देवबाप याना नजरमा शुध्द अनं निर्मळ धर्मचरण म्हणजे अनाथ अनी विधवा यासनी त्यासना संकटमा ईचारपुस करनं अनी स्वतःले जगना कलंकपाईन संभाळीन ठेवनं हाई शे.
1:1 मत्तय १३:५५; मार्क ६:३; प्रेषित १५:१३; गलती १:१९ 1:10 कारण त्या जंगली फुलना गवतनामायक नष्ट व्हतीन यशया ४०:६,७