2
श्रीमंत अनी गरीबससंगे वागनं
1 मना भाऊ अनी बहिणीसवन, गौरवशाली प्रभु म्हणजे आपला प्रभु येशु ख्रिस्त यानावर ईश्वास ठेवणारा तुमनामा तोंड दखीन वागनं असाले नको.
2 समजा सोनानी अंगठी घालेल अनी भडक कपडा घालेल असा एखादा श्रीमंत माणुस तुमना सभास्थानमा वना अनी भिकारीना कपडा घालेल एक गरीब बी वना;
3 तुम्हीन भडक कपडा घालेल माणुसकडे दखीसन म्हणतस हाई चांगली जागा शे आठे बठा, अनी गरीबले म्हणतस तु आठे उभा ऱ्हाय किंवा मना पायसकडे खाल बठ.
4 तर तुम्हीन आपसमा भेदभाव करा की नही अनी वाईट ईचार करनारा तुम्हीन व्हयनात की नही.
5 मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन ऐका! लोकसना नजरमा ज्या गरीब त्या ईश्वासमा श्रीमंत व्हवाकरता अनी जे राज्य देवनी आपलावर प्रिती करनारासले देयल शे त्यानं वारीस व्हवाकरता त्यानी निवडेल शे की नही?
6 पण तुम्हीन गरीबसना अपमान करेल शे, श्रीमंत लोके तुमनावर जुलूम करतस की नही? अनी त्या तुमले न्यायसभामा वढीन नेतस की नही?
7 ज्या उत्तम नावमुये तुमले नाव भेटेल शे त्यानी त्या निंदा करतस की नही?
8 तरी तुम्हीन स्वतःनामायक आपला शेजारीसवर प्रिती कर, या शास्त्रलेखमाधील राजमान्य नियम तुम्हीन पुरा पाळतात तर बरं करतस.
9 पण जर तुम्हीन तोंड दखीन वागतस तर पाप करतस अनी नियमशास्त्रनं उल्लंघन करनारा असा दोषी ठरतस.
10 जो कोणी पुरं नियमशास्त्र पाळीन एक नियमबद्दल चुकस तो सर्वासबद्दल दोषी व्हस.
11 व्यभिचार करू नको अस ज्यानी सांगं त्यानीच नरहिंसा करू नको हाई पण सांगं, तु व्यभिचार नही करता नरहिंसा करस तर नियमशास्त्र उल्लंघन करनारा व्हस.
12 जो नियम आमले स्वतंत्र करस त्यानुसार तुमना न्याय ठराव शे अस समजीन बोला अनी वागणुक करा.
13 कारण ज्यानी दया करी नही त्याना न्याय दया बिना व्हई. दया न्यायवर विजय मिळावस.
ईश्वास अनं कर्म
14 मना भाऊ अनी बहिणीसवन, माले ईश्वास शे अस कोणी म्हणत व्हई अनी तो तसा वागत नही व्हई तर त्यापाईन काय लाभ? तो ईश्वास त्यानं तारण कराले शक्तीमान शे का?
15 भाऊ किंवा बहिणीसकडे खराब कपडा व्हतीन; त्यासले रोजना जेवणनी वनवन शे.
16 अनी तुमनामाधील कोणी त्यासले म्हणस शांततामा जा, तुमले पुरेसा कपडा मिळोत, अनी खाई पीसन तृप्त व्हा. पण त्याना शरिरले पाहिजे ते त्याले तुम्हीन देतस नही तर त्यापाईन काय लाभ?
17 यानामायक ईश्वाससंगे जर कामे नहीत तर तो जात्या निर्जीव शे.
18 कोणी म्हणी तुले ईश्वास शे अनी माले कर्म शेतस, कर्मशिवाय तु आपला ईश्वास माले दखाडं अनी मी आपला ईश्वास मना कर्मसघाई तुले दखाडसु.
19 काय तुले ईश्वास शे का एकच देव शे, हाई बरं करस, भूतं बी ईश्वास धरतस अनी कापतस.
20 अरे, असंमजसं मनना मनुष्य कामेसशिवाय ईश्वास बिनकामना शे, हाई समजी लेवानं तुले पाहिजे का?
21 आपला बाप अब्राहाम यानी आपला पोऱ्या इसहाक याले अग्नीवेदीवर अर्पण करं यामा तो त्याना कामसघाई नितीमान ठरना नही का?
22 ईश्वास त्याना कर्मससंगे कृती करी राहींता अनी कर्मसघाई ईश्वास पुरा व्हयना हाई तुले दखास.
23 अब्राहामनी देववर ईश्वास ठेवा अनी हाई त्याले नितीमान अस मोजामा वनं अनी त्याले देवना मित्र म्हणामा वनं. हाऊ शास्त्रलेख पुरा व्हयना.
24 तर मंग फक्त ईश्वासनाद्वारा नही तर कृतीघाई मनुष्य नितीमान ठरस. हाई तुम्हीन दखतस.
25 तसच राहाब वेशानी बी जासुदसना पाहूणचार करा अनं त्यासले दुसरी वाटतीन धाडी दिधं. या तिना कर्मसनी ती नितीमान ठरनी नही का?
26 जसं शरीर आत्माविना निर्जीव शे तसा ईश्वास बी कर्मसशिवाय निर्जीव शे.