योहानाने लिहिलेले तिसरे पत्र
योहाननी लिखेल तिसरं पत्र
वळख
योहाननं तिसरं पत्र प्रेषित योहान कडतीन येशु ख्रिस्तना जन्मनंतर ५०-१०० वरीसना मझार लिखाई गयतं. योहान स्वतःले लेखकना रूपमा वळखस नही. तो स्वतःले वडील म्हणस. १:१ तो जसं २ योहानमा लिखस तसच यामा बी लिखस. २ योहान १:१ अस म्हणतस की, योहानकृत शुभवर्तमान अनी १ योहान, २ योहान, अनी ३ योहान या पुस्तकं बी योहाननी इफिसमा राही राहींता तवय लिखात.
योहाननी हाई पत्र एक गयास नावना ईश्वासु व्यक्तीले लिखं व्हतं. तो गयासले एक मित्र मानीसन सुचना करस अनी त्याले त्या भागमातीन सुवार्ता प्रचार करत जाणारा ख्रिस्ती भाऊसना पाहूणचार कराना, अशी सुचना देस.
रूपरेषा
१. योहाननी आपलं पत्र सादर करं. १:१
२. त्यानंतर गायसले प्रोत्साहन देस अनी त्याले ईश्वासु भाऊसबद्दल आदर पाहूणचार करानी सुचना देस. १:२-८
३. पुढे, तो दियत्रफेस अनं देमेत्रियस या आखो दोन लोकसबद्दल बोलस. १:९-१२
४. योहान आपला पत्रना शेवट करस. १:१३-१४
1
प्रिय गायस याले तुनावर खरी प्रिती करनारा वडील यानाकडीन; प्रिय बंधु, जसं तुना आत्मा सुरक्षित शे तसा तुले सर्व गोष्टीसमा सुस्थिती अनं आरोग्य ऱ्हावाले पाहिजे, अशी मी प्रार्थना करस. कारण तु सत्यमा चालस अस तुनाबद्दल बंधुजनसनी ईसन साक्ष दिधी, त्यावरतीन माले भलताच आनंद व्हयना. मना पोऱ्या सत्यमा चालतस, हाई ऐकीसन माले जो आनंद व्हस तितला कसाघाई बी व्हस नही.
प्रिय बंधु, ज्या अनोळखी बंधुजनसकरता तु जे काही करी ऱ्हाईनास ते ईश्वासमा लिसन करी ऱ्हाईनास; त्यासनी तुना प्रितीबद्ल साक्ष दिधी; देवले आवडस असा मार्गले जर तु त्यासले लयसी तर भलतं चांगलं करशी; कारण त्या गैरयहूदी लोकसपाईन काहीच नही लेता ख्रिस्तना नावकरता बाहेर पडना शेतस.
म्हणीसन आपण असासना पाहुनचार कराले पाहिजे, म्हणजे आपण सत्यमा त्यासना सहकारी व्हसुत.
मी मंडळीसले थोडंच लिखेल शे; पण तिनामा पुढारी व्हवाना लालस धरनारा दियत्रफेस हाऊ आमना स्विकार करस नही. 10 यामुये मी वनु तर तो ज्या कृत्य करस त्यासनी आठवण दिसु, तो आमनाविरूध्द द्वेषबुध्दीतीन वाईट बडबड करस; तवढामाच त्याना समाधान व्हस नही; अनी बंधुजनसना स्विकार स्वतःबी करस नही; अनी ज्या त्यासना स्विकार करानी ईच्छा धरतस त्यासले बी तो नाकारस अनं मंडळीमातीन बाहेर काढी टाकस.
11 प्रिय बंधु, वाईटना अनुकरण करू नको तर चांगलासना कर. चांगला करणारा देवपाईन शे, वाईट करणारासनी देवले दखं नही.
12 देमेत्रियानाविषमा सर्वासनी अनं स्वतः सत्यने बी साक्ष देयल शे; आम्हीन बी साक्ष देतस; अनी आमनी साक्ष खरी शे हाई तुले माहिती शे.
शेवटनं शुभेच्छा
13 माले बरच काही तुले लिखानं व्हतं, पण ते शाईघाई अनं लेखनीघाई लिखाणी मनी ईच्छा नही शे; 14 तर मी तुले लवकर भेटसु, अशी माले आशा शे, तवय आपण समक्ष बोलुत. 15 तुले शांती मिळो. मित्रमंडळी तुले सलाम सांगतस. मित्रमंडळीसले ज्यासना त्यासना नावमा सलाम सांग.
1:1 प्रेषित १९:२९; रोम १६:२३; १ करिंथ १:१४