यहुदाने लिहिलेले पत्र
यहुदानी लिखेल पत्र
वळख
यहुदानं पत्र ज्याना नावनं शे त्याना लेखक यहुदा स्वतः शे. यहुदा स्वतःले याकोब जो येशुना भाऊ व्हता त्याना भाऊ म्हणीसन वळख देस १. म्हणजे यहुदा बी येशुना भाऊ व्हता अस मानतस. हाई पत्र एक विशिष्ट मंडळीना उद्देशकरता शे की नही हाई आमले माहित नही अनी जुना नियमसबद्दल लिखामुये यहुदाना मुळवाचक कदाचित यहूदी लोक व्हतात. तसच तो आपला पत्रमा “त्या सर्वासले सुचना करस की, ज्यासले बलायेल शे, ज्या देवबापवर प्रेम करतस अनी येशु ख्रिस्तकरता राहतस.” १ हाई पत्र येशु ख्रिस्तना जन्मना ६० वरीस नंतर लिखेल व्हतं.
सर्व ख्रिस्ती लोकसले पत्र लिखाना त्याना उद्देश हाऊ व्हता की खोटा शिक्षकसनं ऐकीसन भटकानं नही यहुदानं पत्र ४. त्यानी जुना करारना घटनांसना उल्लेख करा अनी त्यासनी युक्तीवादले बळकटी देवाकरता लेख देयल शे. हाई पत्रमा खोटा शिक्षकसना विरूध्द २ पेत्रमा मांडेल ईचारसनामायक लिखेल शे यहुदानं पत्र ४२ पेत्र २:१ तसच देवदूतसना अनी सदोम अनं गमोराना बद्दल बी लिखेल शे.
रूपरेषा
१. यहुदा सुरवातले आपला वाचकसले सुचना देस. १:१-२
२. पुढे, त्यानी खोटा शिक्षकसविरूध्द त्यासले सावध कराकरता जे लिखी राहीना त्यानं कारण सांगस. १:३-४
३. त्यानानंतर तो जुना करारमातील लोके अनी घटनासना उदाहरणं देस. १:५-१६
४. मंग तो त्यासले त्यासनी चेतावणीवर कसा प्रतिसाद देवाना हाई सांगस. १:१७-२३
५. शेवट त्यानी देवनी स्तुती करनारा पत्रना शेवट करा. १:२४-२५
1
देवपिताले प्रिय असा आवडणारा अनी येशु ख्रिस्त यानाकरता सर्व ठिकानना निवडेल असा लोकसले येशु ख्रिस्तना दास अनं याकोबना बंधु यहूदा यानाकडीन हाई पत्र शे, देवनी दया, शांती, अनं प्रिती हाई तुमले भरपुर प्राप्त होवो.
खोटा शिक्षक
प्रियसवन, जवय मी तुमले त्या तारणना बारामा लिखामा जास्त श्रम कराना प्रयत्न करी राहिंतु, जेनामा आम्ही सगळा भागीदार शेतस; मी तुमले हाई समजावाना खास समज देस की त्या ईश्वासकरता पुरा प्रयत्न करा जो पवित्र लोकासले एकच सर्वकाळकरता सोपामा येल व्हता हाई सांगानं कारण की, तुमनामा सुरवातमा शिक्षा व्हयेल बराच लोके चोरीसन मजार येल शेतस; या लोकसनी शिक्षाबद्दल संदेष्टासनी पहिलेच भविष्यवाणी करेल व्हती. त्या देवना भय नही धरनारा लोके आपलामा ईसन देवनी कृपाले बदलीन तिले कामातुरपनानं स्वरूप आनतस; अनी आपला एकच स्वामी अनं प्रभु येशु ख्रिस्त ह्याले त्या नाकारतस.
तुमले हाई सर्व माहित शे, तरी तुमले ह्यानी आठवण करी देवानी अशी मनी ईच्छा शे; ते हाई शे की, प्रभुनी मिसर देशमाईन इस्त्राएल लोकसले सांभाळीसन बाहेर काढी आना अनी ज्या ईश्वासहिन व्हतात त्यासना नाश करा;
अनी ज्या देवदूतनी आपलाले देयल अधिकार नही राखता सोडी दिधात, त्यासले त्यानी कायमना बंधनमा, दखास नही असा अंधारमा न्यायना दिनकरता राखीन ठेवं. त्यानामायकच सदोम अनं गमोरा अनी त्यासना आजुबाजूना शहर यासनी त्यासनामायक वेगया शरिरसना संगे जारकर्म करा, म्हणीसन ती नगरे सार्वकालिकना अग्नीना शिक्षाकरता असा पुरावासहित पुढे दृष्टांत म्हणीन ठेयल शेतस.
तसाच ह्या स्वप्न दखणारा त्यासना शरिरसले विटाळतस, अनी दुसरीकडे प्रभुत्व नाकारतस अनं निवडेलसनी निंदा करतस.
मुख्य देवदूत मिखाएल ह्यानी जवय मोशेना शरिरनाबद्ल सैतानले विरोध करीसन त्यानासंगे वाद करा, तवय त्याले दोषी ठेईन त्याले धमकाडाले धजना नही; तर “प्रभु तुले धमकाडो” एवढंच बोलना. 10 म्हणजे ज्या गोष्टी त्यासले समजस नही त्यासनी ह्या निंदा करतस अनी ज्या गोष्टी बुध्दीहिन जनावरसना मायक यासले समजतस त्यासनाद्वारा या आपला नाश करी लेतस. 11 त्यासनी कितली दुर्दशा व्हई! कारण त्या काईनना मार्गमा चालतस, धनकरता बलामना भ्रांती मार्गमा त्या घुसनात अनी कोरहानामायक बंड करीसन त्यासनी आपला नाश करी लिधा.
12 त्या तुमनासोबत नुसता खातस पितस तवय त्या तुमना प्रिती भोजनमा झाकायल खडानामायक शेतस; त्या मेंढपाळ ऱ्हाईसन बी स्वतःच नुसता चरत ऱ्हातस; त्या वाराघाई वाही जायेल बिनकामना ढग, हेमंत ऋतुमाधला बिनफयना, मुयासकट उपटेल, अनं दोनदांव मरी जायेल झाडं, असा शेतस; 13 त्या लज्जारूपी फेस दखावनारा समुद्रना विक्राळ लाटासनामायक, अनी भ्रमण करत फिरनारा तारा, यासनामायक शेतस; त्यासनाकरता देवनी दखास नही असा कायमना अंधार सर्वकाळ राखी ठेयल शे. 14 आदामपाईन सातवा पुरूष हनोख यानी त्यासले त्यासनाबद्ल अशी भविष्यवाणी करेल शे की, दखा, सर्वासना न्यायनिवाडा कराकरता प्रभु आपला लाखो पवित्र जणनासंगे ई.
15 भक्तीहिन लोकसनी अभक्तीमा करेल आपला सर्व भक्तीहिन कृत्यसवरीन अनी ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तीहिन पापी लोकसनी त्यानाविरूध्द सांगं, त्यानावरीन त्यासले दोषी ठराई.
16 त्या लोके कुरकुर करनारा, असमाधानी अनं वासना अधीन व्हयेल शेतस; तोंडघाई त्या बडाई मारतस; अनं लाभ व्हवाकरता त्या तोंडघाई पुजा करतस.
चेतावणी अनी आदेश
17 पण प्रियजनहो, तुम्हीन तर आपला प्रभु येशु ख्रिस्तना प्रेषितसनी सांगेल वचननी आठवण ठेवा; 18 त्या तुमले अस सांगत राहेत की, शेवटना काळमा आपला वासनाना मायक चालनारा अभक्तिहीन माणसे निंघतीन.
19 त्या फुट पाडनारा, देहबुध्दीना, ज्यासले देवना आत्मा नही असा त्या शेतस. 20 पण मना प्रिय लोकसवन, तुम्हीन तर आपला परमपवित्र ईश्वासमा स्वतःनी रचना करा; पवित्र आत्माना सामर्थ्यतीन प्रार्थना करा, 21 सार्वकालिक जिवनकरता आपला प्रभु येशु ख्रिस्तनी दयेनी वाट दखा, अनी आपलाले देवनी प्रितीमा राखा. 22 ज्या बराचजन संशयमा शेतस त्यासनावर दया करा, 23 त्यासले नरक अग्नीमाईन ओढीसन त्यासनं तारण करा, अनी बराचजनसवर भ्याईसन दया करा. पण शरीरघाई मळेल त्यासना कपडासना बी व्देष कराना.
24 तुमले नाश व्हवापाईन राखाले अनी आपला ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष अस उल्लासमा उभा कराले जो समर्थ शे,
25 असा एकच उध्दारक एकच देवले, येशु ख्रिस्त आपला प्रभु यानाद्वारे गौरव, महिमा, पराक्रम अनं अधिकार हाई युगना सुरवात पाईन, आते अनं युगानुयुग शेतस. आमेन.
1:1 मत्तय १३:५५; मार्क ६:३ 1:9 प्रकटीकरण १२:७ 1:18 २ पेत्र ३:३