योहानाला झालेले प्रकटीकरण
योहानले व्हयेल प्रकटीकरण
वळख
प्रकटीकरण हाई पुस्तक नवं करारमधलं शेवटलं पुस्तक शे. तसच हाई शेवट लिखामं वनं प्रेषित योहाननी येशु ख्रिस्तना जन्मानानंतर इसवी. ९५ ना जोडेजोडे ते लिखामा वनं. योहान १:१ अनी त्यानीच योहानकृत शुभवर्तमान अनी योहाननी पहिलं, दुसरं अनी तीसरं पत्र लिखं. हाऊच योहानाले लोकं “ज्यानावर येशुनी प्रिती व्हती” अस म्हणीसन वळखी राहिंतात. योहान १३:२३ येशु ख्रिस्तना सुवार्तामुये पात्म नावना बेटवर जवय शिक्षा भोगी राहिंता त्या येळले त्यानी हाई पुस्तक लिखं. प्रकटीकरण १:९
हाई पुस्तक लिखाणामांगे योहानना हाऊ उद्देश व्हता की, मना वाचनारासले येशुनासंगे ईश्वासु रावाकरता प्रोत्साहन देवाणं अनी येशुना परत येवानं जोडे ऱ्हावामुये त्यासनामा आशा निर्माण करानी योहान १:३;२२:७ त्यानी सर्वा ईश्वासनारासले हाई पत्र लिखं पन विशेष करीसन त्या सात मंडळीसले लिखं ज्यासना उल्लेख अध्याय २–३ मा दखास. योहान स्वतःना लिखाणले देवना जोडेतीन येल संदेश, भविष्यवाणी म्हणीसन सांगस अनी ज्या गोष्टी त्यानी स्वतः दख्यात त्या गोष्टीसन वर्णन तो अलंकारी भाषामा मांडस. हाई जे पुस्तक शे हाई जुना करारमातीन काही शास्त्रभागसले मिळतं जुळतं शे, विशेष करीसन. जखर्या ६:१-८ हाई वचनासंगे त्यानं साम्य शे, तसच सात तुताऱ्या अनी सात वाट्या ह्या देवनी मिसर देशमा आणेल पिढा यानासारख्या शेतस, निर्गम ७–९ प्रकटीकरण हाई शेवटना दिनना वर्णन करस. शेवटमा येशु विजयी कशा व्हई अनी त्यानावर ईश्वास ठेवनारा त्यानासोबत सर्वाकाळ कशा जिवत राहतीन अस ते सांगस. हाई पुस्तकनाद्वारा तुमले ताकिद मिळो अनी येशुना परत येवाविषयी तुमले आशा मिळो.
रूपरेषा
१. योहान सुरवातले स्वतःनी वळख करीसन त्याले भविष्यवाणी कशी प्राप्त व्हयनी हाई सांगीसन तो सुरवात करस. प्रकटीकरण १:१-२०
२. येशुपाईन सात मंडळीसले प्रत्यक्ष मिळेल संदेश योहान देस. प्रकटीकरण २:१–३:२२
३. नंतर तो सात शिक्कासना उल्लेख करस. प्रकटीकरण ४:१–८:५ अनी सात तुतारीसना वर्णन करस. प्रकटीकरण ८:६–११:१९
४. यानानंतर योहान एक धाकला पोऱ्या सात डोकासना श्वापदनासंगे कसं लढाई करस हाई सांगस. प्रकटीकरण १२:१–१४:२०
५. यानानंतर योहान सात क्रोधना वाट्यासबद्दल लिखस प्रकटीकरण १५:१–१६:१८
६. यानानंतर देव त्याना आकाशमाधला शत्रुवर कश विजय मियाडस हाई सांगस. प्रकटीकरण १७:१–२०:१५
७. जो नवा स्वर्ग अनी जी नवी पृथ्वी शेवट ई तिनं वर्णन करस प्रकटीकरण २१:१–२२:२१
1
नमस्कार
1 येशु ख्रिस्तनं प्रकटीकरण जे त्याले देवनी दिधं. अनी ज्या गोष्टी लवकर घडाले पाहिजेत त्या आपला दाससले दखाडाकरता हाई व्हयनं, अनी ख्रिस्तनी दूत धाडीसन आपला दास योहान याले हाई माहिती दिधी.
2 योहाननी देवना वचनबद्दल अनं येशु ख्रिस्तनी साक्षबद्दल म्हणजे त्यानी जे जे दखं त्यानाबद्दल साक्ष दिधी.
3 ह्या संदेशना शब्द वाचीन दखाडणारा, अनं भविष्यवाणी त्या ऐकणारा अनं त्यामा लिखेल गोष्टी पाळणारा ह्या धन्य; कारण ह्या गोष्टी घडी येवानी येळ जोडे येल शे.
सात मंडळीसले नमस्कार
4 आशिया प्रांतमाधल्या सात मंडळीसले योहान कडतीन;
त्या देवकडतीन जो शे, जो व्हता अनं जो ई त्यानापाईन त्याना राजासन समोर ज्या सात आत्मा शेतस त्यासनापाईन,
5 अनी ईश्वसनीय साक्षी, मरेलस मातीन पहिला जन्मेल अनं पृथ्वीवरला राजासना अधिपती. येशु ख्रिस्त यानापाईन, तुमले कृपा अनं शांती असो.
जो आपलावर प्रेम करस, ज्यानी आपला रक्तघाई तुमले आमले पापसपाईन मुक्त करं
6 अनी आपलाले राज्य अनी आपला देव अनं पिता याना सेवा करता याजकं अस करं. त्या येशु ख्रिस्तले गौरव अनं पराक्रम ह्या युगानुयुग शेतस! आमेन.
7 दखा, तो ढगससंगे ई! प्रत्येक डोया त्याले दखी, ज्यासनी त्याले भोसकं त्या बी दखतीन अनी पृथ्वीवरला सर्वा लोके त्यानामुये छाती ठोकीसन शोक करतीन, असंच व्हई.
8 प्रभु जो देव शे, जो व्हता अनं जो ई, जो सर्वसमर्थ, तो म्हणस, “मी पहिला अनं शेवटला शे.”
ख्रिस्तनं साक्षात्कार
9 मी योहान, जो तुमना भाऊ अनी येशुमाधला क्लेश, राज्य अनं धीर यासना तुमनासंगे भागीदार शे, तो मी देवनं वचन अनं येशुबद्दलनी साक्ष यानामुये पात्म नावना बेटमा व्हतु.
10 प्रभुना दिनले मी आत्मातीन संचरीत व्हयनु, तवय मी आपलामांगे कर्णाना आवाजमायक मोठा आवाज ऐका.
11 तो बोलना, “तुले जे दखास ते पुस्तकमा लिख अनी ते इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलादेलफिया अनं लावदिकीया या शहरसमाधल्या सात मंडळीसकडे धाड.”
12 मनासंगे बोलणारा आवाज कोणा शे हाई दखाले मी मांगे वळनु, मांगे वळीन दखस तर सोनाना सात समई
13 अनी त्या समईसना मध्यभागले मनुष्यना पोऱ्यानामायक, पायघोळ कपडा घालेल, अनी छातीवरतीन सोनाना पट्टा बांधेल, असा कोणी एक माले दखायना.
14 त्यानं डोकं अनं केस बरफनामायक किंवा कापुसनामायक धवळं व्हतं; त्याना डोया आगना ज्वालानामायक चमकदार व्हतात;
15 त्याना पाय जशा काय भट्टीमातीन काढेल जळजळीत सोनपितळनामायक व्हतात अनी त्याना आवाज अनेक जलप्रवाहना ध्वनीनामायक व्हता.
16 त्याना उजवा हातमा सात तारा व्हतात; त्याना तोंडमातीन तीक्ष्ण दुधारी तलवार निंघनी अनी त्याना चेहरा भर दुपारमा चमकणारा सूर्यनामायक व्हता.
17 मी त्याले दखं तवय मी मरेलना मायक त्याना पायजोडे पडनु. मंग त्यानी आपला उजवा हात मनावर ठेईन माले सांगं, भिऊ नको; मी पहिला अनं शेवटला शे,
18 अनी जो जिवत तो मी शे! मी मरेल व्हतु तरी दखा मी युगानुयुग जिवत शे, अनी मरणन्या अनं अधोलोकन्या किल्ल्या मनाजोडे शेतस.
19 म्हणीन जे तु दखं, जे शे अनं यानानंतर जे व्हई ते लिखी ठेव;
20 ज्या सात तारा तु मना उजवा हातमा दखात त्यासनं, अनी सोनाना त्या सात समईसना रहस्य हाई शे; त्या सात तारा ह्या सात मंडळ्यासना दूत शेतस; अनी सात समई या सात मंडळ्या शेतस.