योनाना पुस्तकनी वळख
परिचय
योना हाऊ देवना संदेश लोकसपावत लयनारा माणुस (संदेष्टा) शे, योनानं पुस्तक हाई बाकीना पुस्तकस पेक्षा ज्या देवना संदेश लई येतस त्यासनापेक्षा येगळं शे. ह्यामा जस घडेल शे. तसच लिखेल शे. ज्यामा संदेष्टाना येगयेगळ कामना उल्लेख करेल शे. ज्यामा देवनी आज्ञा मोडाना प्रयत्न योनानी करा. देवनी त्याले निनवे शहरमा जावाले सांगं. ते अस शहर व्हतं की, त्यानी इस्त्राएल लोकससंगे दुश्मनी व्हती अनं अशुरिया राज्यनी राजधानी व्हती. पण तठे जाईसन देवनी सांगेल गोष्टीसले सांगानी योनानी अजिबात ईच्छा नव्हती. कारण त्याले मनपाईन माहीत व्हतं देव त्या शहरना नाश करानं सांगी राहिंता ते तो कराव नई. योनानी ईच्छा नव्हती पण काही घटना असा घडण्यात की, त्याले देवनी आज्ञा ऐकनीच पडनी. पण नंतर तो नाराज व्हयना. कारण देवनी “शहरना नाश करसु अस सांगेल व्हतं” ते कर नई. हाई पुस्तक देवना पृथ्वीवर पुरा हक्क शे अस दखाडस. पण हाई पुस्तकमा एक महत्वनी बात शे. आठपावत की देव आपला लोकसना शत्रुले शिक्षा अनं त्यासना नाश करापेक्षा त्यासले माफ करानं शिकाडस अनं त्यासनं तारण (उध्दार) करानी देवनी ईच्छा शे.
रूपरेषा
१. योनाले पाचारण अनी त्याना आज्ञाभंग. १:१-१७
२. योनानी प्रार्थना. २:१-१०
३. निनवेना पश्चाताप.३:१-१०
४. योनाना राग अनी निनवेवर देवनी दया. ४:१-१०
1
योना परमेश्वरनी आज्ञा मोडसं
अमित्तयाना पोऱ्या योना यानासंगे देव बोलना, “निनवे मोठं शहर शे, तठला लोके वाईट कामे करतस अस मी दखेल शे. तु त्या शहरमा जा अनी त्यानाविरूध्द संदेश दे.” योनाले देवनी आज्ञा पाळानी नव्हती म्हणीन योना याफोस नावना गावले गया, तठे त्याले तार्शीश शहरले जावानं जहाज भेटनं. योनानी भाडाना पैसा दिधात अनं देवना नजरना आड व्हवानं म्हणीन जहाजमा जाईन बसना.
पण देवनी समुद्रमा मोठं वादय निर्माण करं, वारामुये समुद्र अस खवळना की जहाज तुटामा वनं. जहाज बुडाले नको म्हणीन जहाजवरला लोकसनी जहाज मधला सर्व माल समुद्रमा फेकाले सुरवात करी. जहाज चालाडनारा घाबरी गयात. प्रत्येकजण आपापला देवसनी प्रार्थना कराले लागनात. पण योना जहाजना तळघरमा गाढ झोपेल व्हता. जहाजना अधिकारीनी योनाले झोपेल दखं. तो त्याले बोलना, “ऊठ! काय झोपना? तुना देवनी प्रार्थना कर, तुना देव तरी तुनी प्रार्थना ऐकी अनी आपले वाचाडी.”
तवय त्या लोके एकमेकसले बोलनात आपण चिठ्ठ्या टाकुत म्हणजे आपले समजी, “कोणामुये हाई संकट आपलावर वनं. मंग त्यासनी चिठया टाक्यात. त्यावरतीन त्यासले समजनं की हाई संकट योनामुये वनं.” मंग त्या योनाले बोलनात, “तुनामुये आमनावर हाई संकट वनं, खरं सांगं तु काय करं? तुना धंदा काय शे? तु कोठला शे? तुना देश कोणता शे? तु कोणता लोकसपाईन शे? योनानी त्यासले सांगं, मी इब्री *लोकसपाईन शे.” मी स्वर्गना देवनी भक्ती करस, समुद्रले अनी जमीनले बनाडणारा तोच देव शे. 10 तो देवपाईन दुर पळी राहीना. हाई योनानी लोकसले सांगं, हाई ऐकीन त्या घाबरनात. त्यासनी योनाले ईचार, “तु देवनाविरुध्द अस काय करं?”
11 वादयना जोर वाढाले लागना अनं लाटापण जोरमा उसळी राहींतात. तवय त्या लोकसनी योनाले ईचारं, “समुद्र शांत व्हवासाठे आम्हीन तुनं काय करानं?” 12 योना त्यासले बोलना, “समुद्रमातील वादयले मी कारणीभुत शे, माले तुमीन समुद्रमा फेकी द्या, मंग समुद्र शांत व्हई जाई!” 13 जहाज किनारले लावानं म्हणीन त्यासनी जहाजले किनारावर लई जावाना प्रयत्न करा. पण त्यासनाघाई ते व्हई नही राहींत. समुद्र बी त्यासनावर जास्तच खवळी राहिंता. 14 तवय त्यासनी देवले प्रार्थना करीसन सांगं! “हे स्वर्गना देव, आम्हीन तुले ईनंती करतस की, हाऊ माणुसना जिवमुळे आमले मारू नको, निष्पाप माणुसले मारी टाकं, असा अपराध आमनावर लावु नको. कारण तु देव शे. अनी तुना मनसारखं तु करशी, हाई आमले माहित शे.”
15 मंग त्यासनी योनाले धरीन समुद्रमा टाकं, तवय वादय थांबी गयं अनी समुद्र शांत व्हयना. 16 हाई दखीसन त्या लोके देवले घाबराले लागनात अनी मंग त्यासनी देवले यज्ञ करा अनी नवसपन करा. 17 योना समुद्रमा पडना तवय त्याले गिळाकरता देवनी एक मोठा मासा धाडा; त्या मासाना पोटमा योना तिन दिन तिन रात व्हता.
* 1:9 इब्री यहुदी