9
परमेश्वरना न्यायपाईन सुटका अशक्य
1 मी प्रभूले वेदीजवय उभा राहेल दखा, अनी तो बोलना “खांबासना माथावर मार, म्हणजे इमारत उंबरठापाईन हादरी. अनी त्यासना डोकावर मारीसन त्याना तुकडा कर. कोणी जिवत राहीना, मी त्यासले तलवारघाई मारी टाकसू. त्यासनामाधला एकलेभी पळी जाता येवाव नही, अनी त्यासनामाधला एकलेभी सुटता येवाव नही.
2 त्या खाईसन अधोलोकसमा जरी गयात, तरी मना हात तठेन ओढीन काढी. त्या आकाशमा उंच चढीसन गयात, तरी मी त्यासले तठेन खाल आणसू.
3 त्या जरी कर्मेल डोंगरना माथावर लपनात, तरी तठेन मी त्यासले शोधी काढसू. त्या जरी मनापाईन लपीसन समुद्रना तळपावत गयात, तर मी सापले आज्ञा करसू अनं तो त्यासले चाई.
4 त्या जरी आपला वैरीसनासमोर पाडाव व्हईन गयात, तरी तठे मी तलवारले आज्ञा करीन अनी ती त्यासले मारी टाकी. मी त्यासनाकडे आपली नजर लावसु, ती त्यासना चांगलाकरता नही, तर त्यासनं वाईटकरता राही.”
5 अनी ज्यानी जमीनले स्पर्श करा म्हणजे ती वितळस अनी त्यामा राहणारा सर्वा शोक करतस, तो प्रभू, सेनाधीस परमेश्वर शे, अनी तिले नील नदीनामायक पुर ई, अनं मिसरना नदीनामायक ती परत ओसरी.
6 ज्यानी आकाशमा आपला माड्या बांधात, अनी आपला ढगना मंडप पृथ्वीमा बनाडेल शे, तो समुद्रना पाणीले बलाईसन पृथ्वीना पाठवर ओतस, त्यानं नाव यहोवा परमेश्वर शे.
7 परमेश्वर अश सांगस; “इस्राएलना लोकसवन, तुम्हीन माले कूश वंशजना लोकसनामायक नहीत का? मी इस्राएलले मिसर देशमाईन पलिष्ट्यासले कफतोरमाईन अनी अरामीसले कीर माईन आणेल नही का?”
8 दखा, प्रभू परमेश्वरनी नजर पापी राज्यसवर शे, अनी मी त्यासले पृथ्वीना पाठवरतीन नाश करसू, पण याकोबना घरानासले मी पुरा नाश कराव नही, अश यहोवा परमेश्वर सांगस.
9 “दखा, मी आज्ञा करसू, धान्य चाळतस तसं मी इस्राएलना घरानासले सर्वा राष्ट्रसमा पकडसू, अनं त्यामातीन लहान अशी कणभी जमीनवर पडाव नही.”
10 मना लोकसमातीन पापी ज्या अश सांगतस, “आमनं काही वाईट व्हवाव नही किवा त्या आमले आडवाभी येवाऊत नही. त्या सर्वा तलवारघाई मरतीन.”
इस्राएलना भावी मुक्ती
11 त्या दिनले दावीदनं मंडप जो पडेल शे, मी तो परत उभा करसू. मी त्यासना भिंतीसना तडा बुंजीटाकसू अनी ज्या नष्ट व्हई जायेल शेतस, त्या मी परत बांधसू. मी त्या जुना दिनसमा व्हतू, तशच परत बांधसू.
12 “ह्याकरता की त्यासनी अदोमना उरेलसले, अनी ज्या राष्ट्रसले, आपला ताबामा देवानं.” परमेश्वर जो हाई करस तो अश सांगस.
13 परमेश्वर सांगस, “अशा दिन ई राहीनात की,” नांगरणी करणारा कापनी करणाराले, द्राक्ष तोडणाराले बी पेरणाराले, गाठी अनी पर्वतवरीन नवा द्राक्षरस वाही जाई अनी सर्वा टेकड्यासले पाझर फुटतीन.
14 मी मना लोकसले, इस्राएलले, कैदमाईन सोडाईसन परत आणसू, त्या नष्ट व्हयेल गावं परत बांधतीन, अनी त्यामा राहतीन. त्या द्राक्षसना मळा लावतीन. अनी त्यापाईन भेटणारा द्राक्षरस पितीन. त्या बागा लावतीन अनं त्यापाईन भेटणारा पिकं खातीन.
15 मी त्यासले त्यासना जमीनमा लावसु अनी मी त्यासले देल जमीनमाईन त्या परत उपटाई जावावुत नहीत. परमेश्वर तुना देव अश सांगस.