8
चौथा दृष्टांत: पिकेल फळनी डालकी
परमेश्वरनी माले हाई दखाडं, दखा, उन्हाळामधला फळसना भरेल एक टोपली दखायनी.
तो बोलना, “आमोस, तुले काय दखास?” मी बोलनू, “उन्हाळी फळसना टोपली.” मंग परमेश्वर माले बोलना, “मना लोकसना, इस्राएलना शेवट येल शे; मी त्यासनाकडे परत दुर्लक्ष कराव नही. परमेश्वर, आशे सांगस, त्या दिनसमा मंदिरमाधला गाणा शोकना व्हतीन सगळाकडे प्रेतच प्रेत राहतीन, प्रत्येक जागावर लोके गुपचूप त्या बाहेर टाकी देतीन.”
दारवर येल इस्राएलना शेवट
ज्या तुम्हीन गरीबसले गिळाकरता आ करतस, अनी देशमाधला गरीबसले नाश कराले दखतस त्या तुम्हीन हाई ऐका. तुम्हीन सांगतस “चंद्रदर्शन कवय सरी? म्हणजे मंग आम्हीन आमना धान्य इकसूत. शाब्बाथ, कवय सरी? म्हनजे आमले गहू ईकता ई, मंग आपण *एफा धाकला करसूत, अनं शेकेल नाणा मोठा करसूत अनं कपटना तराजू लिसन फसाडसूत. आपण पैसा दिसन गरीबसले अनी एक जोडाना किंमतीमा गरजूसले विकत लेवुत अनी गहूना भूसाभी इकी टाकूत.”
परमेश्वरनी याकोबना वैभवनी शपथ लेयेल शे की, “खरच मी त्यासनं कोणतंबी कर्म कधीच इसरावु नही. त्यासनामुळे जमीन घाबराव नही का? अनी या देशमा राहणारा प्रत्येकजण शोक कराव नही का? त्यामातीन सर्वा नील नदीनामायक पुर ई, अनी मिसरमधली नदी सारखं खवळेल अनं परत खाल ओसरी.” परमेश्वर आशे सांगस, “त्या दिनसमा,” “मी सूर्यले दुपारलेच मावळाडसु अनी पृथ्वीवर भर दुपारले दिनले अंधकारमय करसू. 10 मी तुमनं उत्सव पलटाडीसन शोक आशे करसू, अनी तुमना सर्वा गाणा पलटाडी विलाप आशे करसू. तुमना बठासले गोणताटना कपडा घालसू, मी प्रत्येक डोकासनं मुंडन करसू. एकुलता एक पोऱ्या जावावर जशा आकांत व्हस, तशं मी करसू, तो भलता कडू शेवट राही.”
11 परमेश्वर सांगस, “दखा! मी देशमा दुष्काळ धाडसू, त्या दीन ई राहीनात, तवय भाकरना दुष्काळ नही रावाव, पाणीना दुष्काळ नही रावाव, पण परमेश्वरनं वचन ऐकाना दुष्काळ राही.” 12 “लोके हाऊ समुद्रपाईन त्या समुद्रपावत अनी उत्तरपाईन ते पुर्वपावत भटकतीन. परमेश्वरनं वचन शोधत लोके इकडे तिकडे भटकतीन. पण त्यासले ते सापडावु नही. 13 त्या येळले सुंदर तरुण अनं तरूणीसले तीस लागीसनं अशक्त व्हतीन. 14 ज्या शोमरोनना मूर्तीनी शपथ लेतस, अनी ‘हे दान, तुना परमेश्वर जिवत शे, अनी बैर-शेबाना देव जिवत शे, आशे सांगतस, त्या पडतीन, अनी त्या परत कधीच उठावुत नही.”
* 8:5 किलोग्राम, माप, याले एफा सांगतस