7
विनाशना तीन दृष्टांत
टोळ
परमेश्वरनी माले अश दखाडं की दखा, वसंतना महीनामा पिक वर येताच त्यानी टोळ बनाडात. पहिला पिकनी राजानी कापणी व्हवानंतर हाई हिरवा गवत शे. टोळसनी जमीनमाधला सर्वा गवत खाईसन व्हवानंतर मी सांगनु, “ परमेश्वरा, मना प्रभू, मी इनंती करस, आमले माफ कर. याकोब जगू शकाव नही, कारण तो बराच अशक्त शे.”
मंग याबाबतमा परमेश्वरनं मन बदलनं अनी परमेश्वर बोलना, “ते व्हवाव नही.”
इस्तव
प्रभू परमेश्वर, माले पुढला गोष्टी दखाडात, दखा, परमेश्वर देवनी इस्तवले दंड कराकरता बलायं. त्यानी महासागर कोरडा करा अनं जमीन खाई टाकनार व्हता. पण मी सांगनु, “हे परमेश्वर देव, थांब, याकोब कसा वाची? कारण तो बराच धाकला शे.”
मंग परमेश्वरनं या गोष्टना ईशयमा मन बदलनं. प्रभू परमेश्वर बोलना, “हाई घडाऊ नही.”
वळंबा
परमेश्वरनी माले पुढला गोष्टी दाखाडात. दखा, परमेश्वर, त्याना हातमा ओळंबा शे तो एक ओळंबा लिसन भितनाजोडे उभा व्हता. परमेश्वर माले बोलना, “आमोस, तुले काय दखास?” मी बोलनू ओळंबा, मंग प्रभू बोलना, “दखा, मना मनुष्यसमा, इस्राएलमा मी ओळंबा धरसू. मी त्यासनाकडे दुर्लक्ष कराव नही. इसहाकना उंच जागना नाश व्हई, इस्राएलनी पवित्र जागा नष्ट व्हतीन, अनी मी यराबामना घरानासवर हल्ला करसू अनी तलवार लिसन त्यासनावर चाली जासु.”
आमोस अनं अमस्या
10 अमस्या बेथेल आठला याजक अमस्या ह्यानी “इस्राएलना राजा, यराबामले निरोप धाडा की. आमोसनी इस्राएलना घरमा तुना ईरोधमा कट करेल शे. त्याना सर्वा शब्द देशले सहन व्हस नही. 11 कारण आमोस अश सांगस, यराबाम तलवारघाई मरी, अनी इस्राएलना लोकसले देशमाईन गुलाम म्हणीन बाहेर ली जातीन.”
12 अमस्या आमोसले बोलना, “अरे संदेष्टा, खाल यहूदा देशमा पळी जाय अनी तठेन भाकर खाईसन तूना संदेश दे. 13 पण यानामोरे बेथेलमा भविष्य देवानं नही. कारण हाई राजानं पवित्रस्थान शे अनं राज घराणा शेतस.” 14 मंग आमोस अमस्याले बोलना, “मी संदेष्टा नव्हतू अनं संदेष्टासना पोऱ्याभी नव्हतू. मी गुरंसना राखण करणारा अनी उंबरना झाडंसना निगा राखणारा व्हतू. 15 मी कळपना मांगे व्हतु, तवय परमेश्वरनी माले बलाई लीधं, अनी माले बोलना, ‘जाय, मना लोकसले, इस्राएलले, भविष्य सांग.’ 16 म्हणीन आते परमेश्वरनं ऐक, ‘इस्राएलना ईरोधमा संदेश सांगु नको, इसहाकना घराणासना ईरोधमा संदेश देऊ नको’ आशे तू माले सांगस. 17 पण परमेश्वर अश सांगस, ‘तुनी बायको गावनी वेश्या व्हई; तुना पोऱ्या-पोर तलवारतीन मरतीन, तुनी जमीन शत्रू दोनभाग करतीन, तू अपवित्र देशमा मरशी, इस्राएलना लोकसले नक्कीच त्यासना देशमाईन कैदी म्हणीन ली जातीन.’ ”