14
पिताकडे जावानी वाट
1 येशुनी त्यासले सांग, “तुम्हीन मनमा नाराज व्हवु नका; देववर ईश्वास ठेवा अनी मनावर बी ईश्वास ठेवा.
2 मना बापना घरमा राहवाले भरपूर जागा शे, नही राहत्यात तर मी तुमले सांगतु, मी तुमनाकरता जाग तयार कराले जाई राहीनु.
3 अनी मी जाईसन तुमनाकरता जाग तयार करी म्हणजे परत ईसन तुमले आपलाजोडे लिसु, यानाकरता की जठे मी शे तठे तुम्हीन बी ऱ्हावाले पाहिजे.
4 मी जास तिकडली वाट तुमले माहीत शे.”
5 थोमा त्याले बोलना, “प्रभु, तुम्हीन कोठे जातस हाई आमले माहीत नही, मंग तठे येवाकरता आमले वाट कशी माहीत राही?”
6 येशुनी त्याले सांगं, “मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
7 मी कोण शे हाई जर तुम्हीन वळखतात तर मना पिताले बी वळखतात; आठेन पुढे तुम्हीन त्याले वळखतस अनं तुम्हीन त्याले दखेल बी शे.”
8 फिलीप्प त्याले बोलना, “प्रभु, पिता आमले दखाडा म्हणजे आमले भरपूर शे.”
9 येशुनी त्याले सांगं, “फिलीप्प, मी इतका काळ तुमनासंगे व्हतु तरी तु माले वळखतस नही का? ज्यानी माले दखं त्यानी पिताले दखं शे; तर ‘पिता आमले दखाडा,’ हाई तु कसं म्हणस?
10 मी पितामा अनी पिता मनामा शे असा ईश्वास तु धरस नही का? ज्या गोष्टी मी तुमले सांगस त्या मी आपला मनन्या सांगस नही तर मनामा राहनारा पिता स्वतःना कामे करस.
11 मी पितामा अनी पिता मनामा ऱ्हास हाई मना शब्द खरा माना, नहीतर मना काममुये तरी मनं खरं माना.
12 मी तुमले खरंखरं सांगस, मी ज्या कृत्ये करस त्या मनावर ईश्वास ठेवनारा बी करी, अनी त्यानापेक्षा मोठा करी, कारण मी पिताकडे जास.
13 तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे.
14 तुम्हीन मना नावतीन मनाकडे काही बी मांगशात तर ते मी करसु.”
पवित्र आत्मा मिळाबद्दल वचन
15 मनावर तुमनी प्रिती व्हई तर मन्या आज्ञा पाळशात.
16 मी पिताले ईनंती करसु, मंग तो तुमले दुसरा कैवारी दि; त्यानी तुमनासंगे सदासर्वदा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन.
17 जो सत्यना आत्मा तो देवना सत्यले प्रकट करस, त्याले जगना लोकसघाई लेवावनार नही, तुम्हीन त्याले दखशात, तुम्हीन त्याले वळखशात, कारण तो तुमनामा ऱ्हास अनी तुमनामा वस्ती करीसन राही.
18 मी तुमले अनाथ असा सोडावं नही, तुमनाकडे परत ईसु.
19 आखो थोडाच येळ शे मंग जग माले आखो दखाव नही, तरी तुम्हीन दखशात; कारण मी जिवत शे अनी तुम्हीन बी जिवत राहशात;
20 त्या दिन तुमले समजी की मी आपला पितामा, तुम्हीन मनामा अनी मी तुमनामा शे.
21 “ज्यासनाजोडे मन्या आज्ञा शेतस अनं ज्या त्या पाळतस त्याच मनावर प्रिती करनारा शेतस, अनी ज्या मनावर प्रिती करतस मना पिता बी त्यासनावर प्रिती करस, मी बी त्यासनावर प्रिती करसु अनं स्वतः त्यासले प्रकट व्हसु.”
22 यहुदा त्याले बोलना, “प्रभु, अस काय व्हयनं की तुम्हीन स्वतः आमले प्रकट व्हशात अनी जगले प्रकट व्हणार नही?”
23 येशुनी त्याले उत्तर दिधं, “ज्यानं मनावर प्रेम व्हई” तर तो मनी शिकवन पाळी अनी मना पिता त्यानावर प्रेम करी अनी आम्हीन त्यानाकडे ईसन त्यानासंगे वस्ती करीसन राहसु.
24 मनावर कोणं प्रेम नही तर तो मनी शिकवन पाळाव नही, जी शिकवन तुम्हीन ऐकतस ती मनी नही, ज्या पितानी माले धाडेल शे त्याना शेतस.
25 मी तुमना जोडे राही राहींतु तवय तुमले या गोष्टी सांगेल शेतस.
26 तरी ज्याले पिता मना नावतीन धाडी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुमले सर्व शिकाडी अनी ज्या गोष्टी मी तुमले शिकाड्यात त्या सर्वासनी तुमले आठवण करी दि.
27 मी तुमले शांती दि ठेवस, हाई मनी स्वतःनी शांती ती तुमले देस, जसं जग देस तसं मी तुमले देस नही, तुमनं अंतःकरण अस्वस्थ अनी भयबीत व्हवाले नको म्हणीसन.
28 मी जास, अनी तुमनाकडे परत येसु अस जे मी तुमले सांगं ते तुम्हीन ऐकं, मनावर तुमनी प्रिती ऱ्हाती तर मी पिताकडे जाई राहीनु यानी तुमले खूशी वाटती, कारण मना पिता मनापेक्षा थोर शे.
29 त्या गोष्टी व्हई तवय तुम्हीन ईश्वास धराले पाहिजे, म्हणीसन ते व्हवाना पहिले आत्तेच मी तुमले सांगेल शे.
30 यापुढे मी जास्त तुमनासंगे बोलावं नही, कारण जगना अधिकारी येस; तरी मनामा त्यानं काहीच नही.
31 पण मी पितावर प्रिती करस अनी पितानी जशी माले आज्ञा दिधी तसं मी करस, हाई जगनी वळखावं म्हणीसन अस व्हस, “ऊठा, आपण आठेन जाऊत.”