15
येशु खरा द्राक्षवेल
1 मी खरा द्राक्षवेल शे अनी मना बाप माळी शे.
2 फळ न देणारा प्रत्येक फाटा तो मनामातीन काढी टाकस अनी फळ देणारा फाटाले जास्तीना फळ येवाले पाहिजे म्हणीसन तो त्या प्रत्येकसले साफसुफ करस
3 जे वचन मी तुमले सांगेल शे त्यामुये तुम्हीन पहिला पाईनच शुध्द व्हयेलच शेतस.
4 तुम्हीन मनामा राहा अनी मी तुमनामा ऱ्हास, जसं फाटा वेलमा ऱ्हावाशिवाय त्याले स्वतःव्हईसन फळ देता येस नही तसं मनामा ऱ्हावाशिवाय तुमले बी फळ देता येवाव नही.
5 मी वेल शे तुम्हीन फाटा शेतस जो मनामा ऱ्हास, तो बरंच फळ देस; कारण मनापाईन येगळं राहीनात तर तुमले काहीच करता येवाव नही.
6 जर कोणी मनामा राहीना नही तर त्याले तुटेल फाटानामायक बाहेर टाकतस, अनं तो वाळाई जास; मंग त्यासले गोया करीसन आगमा टाकतस अनं त्या जळी जातस.
7 तुम्हीन मनामा राहीनात अनी मना वचनं तुमनामा राहीनात, तर जे काही तुमले पाहिजे व्हई ते मांगा म्हणजे तुमले ते भेटी जाई.
8 तुम्हीन बरंच फळ दिधं तर पितानं गौरव व्हई अनी तुम्हीन मना शिष्य व्हशात.
9 जशी पितानी मनावर प्रिती करी तशी मी बी तुमनावर प्रिती करेल शे, तुम्हीन मनी प्रितीमा राहा.
10 जसं मी मना पितान्या आज्ञा पाळीसन त्यानी प्रितीमा ऱ्हास, तसं तुम्हीन मन्या आज्ञा पाळ्यात तर मनी प्रितीमा राहशात.
11 मना आनंद तुमनामा ऱ्हावाले पाहिजे अनी तुमना आनंद परीपुर्ण व्हवाले पाहिजे म्हणीसन मी तुमले या गोष्टी सांगेल शेतस.
12 जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी अशी मनी आज्ञा शे.
13 आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही.
14 मी तुमले जे काही सांगस ते जर तुम्हीन करशात तर तुम्हीन मना मित्र शेतस.
15 मी आत्तेपाईन तुमले दास म्हणस नही, कारण धनी काय करस ते दासले माहीत नही ऱ्हास. पण मी तुमले मित्र म्हणेल शे, कारण जे काही मी आपला पिताकडतीन ऐकी लिधं ते सर्व मी तुमले सांगेल शे.
16 तुम्हीन माले निवाडेल नही, तर मी तुमले निवाडेल अनी नेमेल शे, यामा हेतु हाऊ की तुम्हीन जाईसन फळ द्याव अनं तुमनं फळ टिकावं; अनी जे काही तुम्हीन मना नावतीन पिताकडे मांगशात ते त्यानी तुमले द्यावं.
17 तुम्हीन एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे म्हणीसन मी तुमले या आज्ञा करस.
जगना व्देष
18 जग तुमना व्देष करस, तर तुमना व्देष कराना पहिले त्यानी मना बी करा हाई तुमले माहीत शे.
19 तुम्हीन जगना राहता तर जग आपलासवर प्रिती करतं, पण तुम्हीन जगना नही; मी तुमले जगमाईन निवाडेल शे, म्हणीसन जग तुमना व्देष करस.
20 दास धनीपेक्षा मोठा नही. अस जे वचन मी तुमले सांगं त्यानी आठवण करा, त्या मनामांगे लागनात तर तुमना बी मांगे लागतीन; त्यासनी मना वचनं पाळात तर तुमना बी पाळतीन.
21 पण त्या मना नावकरता हाई सर्व तुमले करतीन, कारण ज्यानी माले धाडेल शे त्याले त्या वळखतस नही.
22 मी येतु नही अनं त्यासनासंगे बोलतु नही तर त्या पापना दोषी नही ऱ्हातातं; पण आते त्यासले आपला पाप बद्दल निमित्त सांगता येवाव नही.
23 जो मना व्देष करस तो मना पिता बी व्देष करस.
24 ज्या कामे दुसरानी कोणी करात नही त्या कामे मी त्यासनामा करतु नही तर त्या पापना दोषी ऱ्हातं नही, पण आते त्यासनी माले अनी मना पिताले बी दखेल शे अनं आमना व्देष करेल शे.
25 “तसं तर विनाकारण त्यासनी मना व्देष करा” अस जे वचन त्यासना शास्त्रमा लिखेल शे, ते पुरं व्हवाले पाहिजे म्हणीसन ते अस व्हई राहीनं.
26 पण जो पितापाईन निंघस, ज्याले मी पिताकडतीन तुमनाकडे धाडस असा मदतगार म्हणजे सत्यना आत्मा ई तवय तो मनाबद्दल साक्ष दी.
27 अनी तुम्हीन बी साक्ष देशात, कारण “सुरवात पाईन तुम्हीन मनासंगे शेतस.”