16
“तुम्हीन ईश्वासले सोडाले नको म्हणीसन मी तुमले या गोष्टी सांगेल शेतस.” त्या तुमले सभास्थानमातीन काढी टाकतीन, इतलंच नही अशी येळ ई राहीनी की जो कोणी तुमना जीव ली, त्याले आपण देवले सेवा अर्पण करी राहीनु अस वाटी. त्या असा करतीन, कारण त्यासनी पिताले अनं माले बी वळखं नही. मी तुमले या गोष्टी याकरता सांग्यात की, ती येळ ई म्हणजे त्या गोष्टी मी तुमले सांगेल व्हत्यात यानी आठवण व्हवाले पाहिजे. या गोष्टी मी सुरवात पाईन तुमले सांग्यात नहीत, कारण मी तुमनासंगे व्हतु.
पवित्र आत्मना काम
पण ज्यानी माले धाडेल शे, त्यानाकडे मी आते जाई राहीनु, अनी तुम्हीन कोठे जाई राहीनात अस तुमना मातीन कोणी माले ईचारस नही. या गोष्टी मी तुमले सांगेल शे म्हणीसन तुमनं मन दुःखतीन भरी जायेल शे. तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु. तो मदतगार ईसन पाप बद्दल, धार्मीकताबद्दल अनी देवना न्यायनिवाडाबद्दल जगनी खात्री करी दि. त्या मनावर ईश्वास ठेवतस नही यावरतीन पाप बद्दल; 10 मी पिताकडे जाई राहीनु अनी पुढे तुमले मी दिसावु नही यावरतीन धार्मीकताबद्दल; 11 अनी या जगना अधिकारीना न्याय व्हयेल शे यावरतीन न्यायनिवाडाबद्दल;
12 माले आखो तुमले बऱ्याच गोष्टी सांगान्या शेतस, पण आते तुमनाघाई त्या सहन व्हवाव नही. 13 तरी तो आत्मा ई, जो देवना सत्यले प्रकट करी, तो तुमले वाट दखाडीन पुरं सत्यतामा लई जाई; कारण तो स्वतःना अधिकारतीन बोलावं नही, तर जे काही ऐकेल शे तेच सांगी, अनी व्हनाऱ्या गोष्टी तुमले सांगी. 14 तो मना गौरव करी कारण जे मनं शे त्यामातीन लिसन ते तुमले प्रकट करी. 15 जे काही पितानं शे ते सर्व मनं शे; म्हणीसन मी बोलनु की जे मनं शे त्यामातीन सत्यना आत्मा काही लिसन ते तुमले प्रकट करसु.
खूशी अनं उदासी
16 “थोडा येळनंतर तुम्हीन माले कधी दखावुत नही; अनी परत थोडा येळनंतर तुम्हीन माले दखशात.”
17 यावरतीन त्याना शिष्यसपैकी कितलातरी जण बोलनात, “हाऊ आमले म्हणस थोडा येळनंतर तुम्हीन माले दखु शकाव नहीत अनी थोडाच येळनंतर तुम्हीन माले दखशात; यानं कारण मी पिताकडे जास; अस जे तो आमले म्हणस ते काय?” 18 त्या बोलनात, “थोडा येळमा, अस जे हाऊ म्हणस ते काय शे? तो काय म्हणस हाई आमले समजी नही राहीनं.”
19 माले ईचारानं हाई त्यासना मनमा शे हाई वळखीसन येशुनी त्यासले सांगं, थोडा येळनंतर तुम्हीन माले दखणार नही अनी परत थोडा येळनंतर तुम्हीन माले दखशात, हाई जे मी बोलनु त्याबद्दल तुम्हीन एकमेकसले ईचारतस का? 20 मी तुमले खरंखरं सांगस की तुम्हीन रडशात अनी शोक करशात तरी जग आनंद करी; तुमले दुःख व्हई, तरी तुमना दुःखना आनंद व्हई. 21 बाई मोकळी व्हस तवय तिले दुःख व्हस, कारण ती येळ येल ऱ्हास; पण बाळ जन्म लेवानंतर बाळना जगमा जन्म व्हयना याना जो आनंद व्हस त्यामुये तिले त्या तरासनी याद ऱ्हास नही. 22 यामुये तुमले आते दुःख व्हयेल शे; तरी मी तुमले परत भेटसु अनी तुमनं मन आनंदीत व्हई; तुमना आनंद तुमनापाईन कोणी काढी लेवावु नही.
23 त्या दिन तुम्हीन मनाकडे काहीच मांगावुत नही, मी तुमले खरंखरं सांगस की, तुम्हीन पिताकडे जे काही मना नावतीन मांगशात ते पिता तुमले दि. 24 तुम्हीन अजुन पावत मना नावतीन काय मांगेल नही, मांगा म्हणजे तुमले भेटी, यानाकरता की तुमना आनंद परीपुर्ण व्हवाले पाहिजे.
सर्व जगवर विजय
25 या गोष्टी मी तुमले दृष्टांतना रूपतीन सांगेल शेतस; मी तुमनासंगे दृष्टांतमा आखो बोलावं नही, तर पिताबद्दल तुमले उघड सांगसु अशी येळ ई राहीनी. 26 जवय तो दिन ई तवय तुम्हीन मना नावतीन जे काही मांगशात; अनी मी तुमनाकरता पिताकडे ईनंती करसु; अस मी तुमले म्हणी नही राहीनु. 27 कारण पिता स्वतः तुमनावर प्रिती करस, कारण तुम्हीन मनावर प्रिती करेल शे, अनी मी पिताकडतीन येल शे असा ईश्वास धरेल शे. 28 “मी पिताकडतीन निंघीसन जगमा येल शे, अनी आते परत जग सोडीन पिताकडे जाई राहीनु.”
29 त्याना शिष्य बोलनात, “आते तुम्हीन उघड बोली राहीनात, दृष्टांत सांगी नही राहीनात. 30 आते आमले समजनं की तुमले सर्व माहीत शे, म्हणीसन यानी गरज नही की कोणी तुले प्रश्न ईचारी; यावरतीन तुम्हीन देवकडतीन येल शेतस असा आम्हीन ईश्वास धरतस.”
31 येशुनी उत्तर दिधं, “आते तुम्हीन ईश्वास करी राहीनात का?” 32 अशी येळ ई राहीनी, म्हणजे ईच जायेल शे की तुमनी दाणादाण व्हईसन तुम्हीन सर्व आपआपला घर जाशात अनं माले एकटा सोडशात; तरी मी एकला नही, कारण पिता मनासंगे शे. 33 या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.