8
व्यभिचारी बाई
1 येशु जैतुन नावना डोंगरकडे गया.
2 नंतर पहाटले तो परत मंदिरमा वना तवय सर्व लोके त्यानाकडे वनात, अनी तो बशीन त्यासले शिकाडु लागना.
3 त्या येळले शास्त्री अनी परूशी यासनी व्यभिचार करतांना धरेल एक बाईले त्यानाकडे लई वनात अनं तिले मझार उभं करं.
4 त्या येशुले बोलनात, “गुरजी, हाई बाईले व्यभिचार करतांना धरेल शे.
5 मोशेनी नियमशास्त्रमा अस सांगेल शे की, असासले दगडमार कराना; तर तुम्हीन तिनाबद्दल काय सांगतस?”
6 त्यानावर दोष ठेवाले आपले काहीतरी निमित्त भेटी, म्हणीन त्यानी परिक्षा दखाकरता त्यासनी हाई सांगं; पण येशु तर खाल वाकीन बोटघाई जमीनवर लिखु लागना.
7 अनी त्या त्याले एकसारख ईचारी राहींतात तवय तो ऊठीसन त्यासले बोलना, “तुमनामा जो निष्पाप व्हई त्यानी पहिले तिनावर दगड टाकाना.”
8 मंग तो परत खाल वाकीन जमीनवर लिखु लागना.
9 हाई ऐकीन वडील लोकसपाईन सुरवात करीसन शेवटला माणुसपावत एकना मांगे एक असा त्या सर्व निंघी गयात; येशु एकटाच राहीना अनी तठेच ती बाई मझार उभी व्हती.
10 नंतर येशु सिधा उभा राहीना अनी ती बाईले बोलना, “बाई, तुले दोष देणारा त्या कोठे शेतस? तुनाकरता कोणी दंड ठरावा नही का?”
11 ती बोलनी, “प्रभुजी, कोणीच नही” तवय येशु तिले बोलना, “मी बी तुनाकरता दंड ठरावस नही, जाय, पण यापुढे पाप करू नको.”
येशु जगना प्रकाश
12 येशु परत परूशीसले बोलना, “मी जगना प्रकाश शे, जो मनामांगे चालस तो अंधारामा चालावं नही, तर त्यानाजोडे जिवनना प्रकाश राही.”
13 यावरतीन परूशी त्याले बोलनात, “तुम्हीन स्वतःबद्दल साक्ष देतस; तुमनी साक्ष खरी नही शे.”
14 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी स्वतःबद्दल साक्ष देस, तरी मनी साक्ष खरी शे, कारण मी कोठेन वनु अनी कोठे जासु हाई माले माहीत शे; मी कोठेन येस अनी कोठे जास हाई तुमले माहीत नही.
15 तुम्हीन लोके मनुष्य रितीनुसार न्याय करतस; मी कोणा न्याय करस नही.
16 अनी जर मी लोकसना न्याय करा तर मना न्याय खरा शे; कारण मी एकला नही तर मी अनं ज्यानी माले धाडेल शे तो असा शेतस.
17 तुमना नियमशास्त्रमा अस लिखेल शे की, दोन लोकसनी साक्ष खरी शे.
18 मी स्वतःबद्दल साक्ष देणारा शे, अनी ज्या बापनी माले धाडेल शे तो बी मनाबद्दल साक्ष देस.”
19 यावरतीन त्या त्याले बोलनात, “तुमना बाप कोठे शे?” येशुनी उत्तर दिधं, “तुम्हीन माले अनी मना बापले वळखतस नही, तुम्हीन माले वळखं तर, मना बापले बी वळखशात.”
20 तो मंदिरमा शिकाडी राहींता तवय हाई वचन जठे दानपेटी ठेयल व्हती त्या खोलीमा बोलना; तरी कोणीच त्याले धरं नही, कारण त्यानी योग्य येळ तोपावत येल नव्हती.
जठे मी जाई ऱ्हाईनु तठे तुमले येता येवाव नही
21 मंग येशु परत त्यासले बोलना, “मी जासु, तुम्हीन मना शोध करशात पण तुम्हीन आपला पापमा मरशात, जठे मी जाई राहीनु तठे तुमले येता येवाव नही.”
22 यावर यहूदी लोके बोलनात, “जठे मी जासु तठे तुमले येता येवाव नही अस हाऊ म्हणस, यावरतीन हाऊ स्वतःना जीव तर नही लेवाव शे ना?”
23 येशुनी उत्तर दिधं, “तुम्हीन खालना शेतस, मी वरना शे, तुम्हीन या जगना शेतस, मी या जगना नही.
24 यामुये मी तुमले सांगस की तुम्हीन आपला पापमा मरशात; कारण मी जो शे तो शे असा ईश्वास तुम्हीन धरा नही तर तुम्हीन आपला पापमा मरशात.”
25 त्या त्याले बोलनात, “तु कोण शे?”
येशुनी त्यासले उत्तर दिधं, “जे मी सुरवात पाईन तुमले सांगत वनु तोच.
26 तुमनाबद्दल माले बरच बोलनं शे अनं न्यायनिवाडा कराना शे, पण ज्यानी माले धाडेल शे तो खरा शे अनी ज्या गोष्टी मी त्यानाकडतीन ऐक्यात त्याच मी जगले सांगस.”
27 तो आपलासंगे पिताबद्दल बोली राहीना हाई त्यासले समजनं नही.
28 यामुये येशु त्यासले बोलना, “जवय तुम्हीन मनुष्यना पोऱ्याले उंच करशात तवय तुमले समजी की ‘मी जो शे तो शे!’ अनी मी स्वतः व्हईन काय करस नही, तर पितानी माले सांगाप्रमाणे मी या गोष्टी बोलस.
29 ज्यानी माले धाडेल शे तो मनासंगे शे; त्यानी माले एकलं सोडेल नही, कारण जे त्याले आवडस ते मी कायम करस.”
30 तो या गोष्टी बोली राहींता तवय बराचसा लोकसनी त्यानावर ईश्वास ठेवा.
सत्य तुमले स्वतंत्र करी
31 तवय येशु त्या यहूदीसले ज्यासनी त्यानावर ईश्वास ठेवा त्यासले बोलना, “तुम्हीन मना वचनंसमा राहीनात तर, खरोखर मना शिष्य शेतस;
32 तुमले सत्य समजी, अनं सत्य तुमले स्वतंत्र करी.”
33 त्यासनी त्याले सांगं, “आम्हीन अब्राहामना वंशज शेतस, अनं कधीच कोणी गुलामगिरीमा नव्हतुत, तर तुम्हीन स्वतंत्र व्हशात अस तुम्हीन कसं म्हणतस?”
34 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले खरंखरं सांगस, जो कोणी पाप करस तो पापना गुलाम शे.
35 गुलाम घरमा सदासर्वदा ऱ्हास नही, पोऱ्या सदासर्वदा ऱ्हास.
36 यामुये पोऱ्या तुमले स्वतंत्र करी, तर तुम्हीन खरा स्वतंत्र व्हशात.
37 तुम्हीन अब्राहामना वंशज शेतस हाई माले माहीत शे तरी तुमनामा मना वचनंसले जागा नही, म्हणीसन तुम्हीन मना जीव लेवाकरता दखी राहीनात.
38 मी बापजोडे जे दखस ते बोलस, तसच तुम्हीन तुमना बापकडतीन जे ऐकतस ते करतस.”
39 त्यासनी त्याले उत्तर दिधं, “आमना बाप अब्राहाम शे.”
येशु त्यासले बोलना, “तुम्हीन अब्राहामना पोऱ्या राहतात तर तुम्हीन अब्राहामनी करेल कार्य करतस.
40 पण ज्यानी देवपाईन ऐकेल सत्य तुमले सांगं त्या माणुसले, तुम्हीन आते मारी टाकाकरता दखी राहीनात; अब्राहामनी अस करं नही!
41 तुम्हीन तुमना बापनं कार्य करी राहीनात.”
त्या बोलनात, “आमना एकच बाप, म्हणजे देव शे, अनी आम्हीन त्याना खरा पोऱ्या शेतस.”
42 येशुनी त्यासले सांगं, “देव जर तुमना बाप ऱ्हाता तर तुम्हीन मनावर प्रिती करतात; कारण मी देवपाईन निंघेल अनी येल शे, मी स्वतःवहीन येल नही शे, तर त्यानी माले धाडेल शे.
43 तुम्हीन मनं बोलनं का बरं समजी लेतस नही? यानं कारण अस की तुमनाघाई मन वचन ऐकावस नही
44 तुम्हीन आपला बाप सैतान यानापाईन व्हयेल शेतस, अनी आपला बापना वासनाना मायक कराले दखतस; तो सुरवात पाईन मनुष्यघातक शे, अनी तो सत्यमा टिकना नही, कारण त्यानामा सत्यच नही शे, तो खोटं बोलस ते स्वतःव्हईनच बोलस, कारण तो लबाड अनी लबाडना बाप शे.
45 मी तर तुमले सत्य सांगस, म्हणीसन तुम्हीन मना ईश्वास धरतस नही.
46 तुमना मातीन कोण माले पापी ठरावु शकस? जर मी खरं बोलस तर, तुम्हीन का बरं मनावर ईश्वास ठेवतस नही?
47 जो देवकडला शे तो देवन्या गोष्टी ऐकस; तुम्हीन देवकडला नही म्हणीन तुम्हीन ऐकतस नही.”
येशु अनी अब्राहाम
48 यहूदी लोकसनी त्याले उत्तर दिधं, “आम्हीन खरं बोलतस की नही, तु शोमरोनी शे अनं तुले भूत लागेल शे?”
49 येशुनी उत्तर दिधं, “माले भूत लागेल नही, तर मी मना बापना सन्मान करस अनी तुम्हीन मना अपमान करतस.
50 मी स्वतःना गौरव कराले दखस नही, मना गौरव अनं न्यायनिवाडा करनारा एकजण शे.
51 मी तुमले खरंखरं सांगस; जर कोणी मनं वचन पाळी तर तो कधीच मराव नही.”
52 यहूदी लोके त्याले बोलनात, “तुले भूत लागेल शे हाई आते आमले समजी गयं! अब्राहाम अनी संदेष्टा बी मरी गयात अनी तु म्हणस, जर कोणी मनं वचन पाळी तर त्याले मरणना अनुभव कधीच येवाव नही.
53 आमना बाप अब्राहाम मरी गया त्यानापेक्षा तु मोठा शे का? संदेष्टा बी मरी गयात; तु स्वतःले कोण समजस?”
54 येशुनी उत्तर दिधं, “मी स्वतःनं गौरव करी लिधं तर ते काय मनं गौरव नही; मना गौरव करनारा मना बाप शे, ज्याले तुम्हीन तो आमना देव शे अस म्हणतस.
55 तरी तुम्हीन त्याले वळख नही, पण मी त्याले वळखस; अनी जर मी त्याले वळखस नही अस म्हणसु तर तुमनामायक लबाड व्हसु; पण मी त्याले वळखस अनी त्यानं वचन पाळस.
56 तुमना बाप अब्राहाम मना दिन दखानी आशातीन आनंदीत व्हयना अनी ते दखीन त्याले आनंद व्हयना.”
57 यावरतीन यहूदी लोके त्याले बोलनात, “आखो तुले पन्नास वरीस व्हयनात नही अनी तु अब्राहामले दखेल शे?”
58 येशुनी त्यासले सांगं, “मी तुमले खरंखरं सांगस, अब्राहाम व्हयना त्याना पहीलापाईन ‘मी शे.’ ”
59 यावरतीन त्यासनी येशुवर फेकाकरता दगड उचलात, पण येशु गुपचुप मंदिरमातीन बाहेर निंघी गया.