13
आखो राज्यसले जिंकनं शे
1 यहोशवा आते भलता धैयडा अनी उतार वयना व्हयेल व्हता, तवय परमेश्वर त्याले बोलना, “तु धैयडा अनी उतार वयना व्हयी जायेल शे अनी देशना बराच भाग आजुन ताबामां लेवानं राहेल शे.
2 ज्या परदेश बाकी राहेल शेतस त्या हया; पलिष्टीसना बठा परदेश, बठा गशुरी;
3 मिसरनामोरेना शीहोर नदीपाईन उत्तरपावोत एक्रोनना सीमापावोत कनान्यासना म्हणीसनं ज्या मोडेल शेतस त्या प्रांत, तशेच पलिष्टीसना पाच सुभा म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ अनी एक्रोन; यानाशिवाय, दक्षिणकडला अव्वी,
4 अफेक अनी अमोर्यासनी सरहद्द आठेपावतना कनान्यासना बठा देश अनी सीदोन्यासना मारा नावना देश;
5 अनी गिबली यासना देश तसच उगवतीकडला हर्मोन पर्वतना तळपाईन, बाल-गादपाईन हमाथाना घाटपावोत बठा लबनोन.
6 लबानोनपाईन मिस्रोपोथ-माईमपावोत सीदोन्यासना डोंगराळ देशना रहीवाशी यासले मी इस्त्राएल लोकसनामोरे हाकली दिसू; एवढं मात्र तु कर की मनी आज्ञाप्रमाणे चिठया टाकीसनं त्यासना देश इस्त्राएल लोकेसले वाटी देय.
7 हाई देश नऊ वंश अनी मनश्शना आर्धा वंश यासले वतनदाखल वाटी देय.”
यार्देनना पुर्व भागनी वाटनी
8 मनश्शना बाकीना आर्धा वंश अनी रऊबेनी अनी गादी यासले वतनना वाटा मिळीसनं चुकेल शे; परमेश्वरना सेवक मोशे यानी पुर्वले यार्देननातिकडे त्यासले आपूण करेल ठरावप्रमाणे वतन दिध.
9 म्हणजे आर्णोन खोरानं बाजुले जे अरोएर शे अनी खोरामाधला नगर आठेतीन गिबोनपावोत मेदबाना बठा पठारना परदेश,
10 अमोर्यासना हद्दपावोत हेशबोननिवासी अमोर्यासना राजा सीहोन याना बठा नगर,
11 गिलाद देश, गशुरी अनी माकाथी यासना बठा प्रांत, हर्मोन पर्वत अनी सलकापावोत बठा बाशान देश;
12 म्हणजे रेफाईतमा जो एकठाच वाचेल अष्टरोथ अनी एद्रई आठे राज्य करणारा ओग याना बठा राज्य, तठे बठासना मोशेनी मोड करीसनं त्यासले देशमाईन घालाडी दिध व्हतं.
13 तरी इस्त्राएल लोकसनी गशुरी अनी माकाथी यासले त्यासना देशमाईन घालानं नही म्हणीसनं गशुरी अनी माकाथी आजपावोत इस्त्राएलमां वस्ती करीसनं राही राहीना शेतस.
14 लेवी वंशासले मात्र त्यानी कोणतच वतन दिद नही, कारण इस्त्राएलना देव यानी सांगाप्रमाणे परमेश्वरले वाहेल हव्ये हाईच त्यासना वतनभाग शे.
रऊबेनना वंशले देयल भाग
15 मोशेनी रऊबेनी वंशसले त्यासना कुळप्रमाणे वतन दिधा.
16 त्यासना मुलूख हावु शे; आर्णोन खोराना बाजुले जे अरोएर अनी खोरामाधला नगर यानापाईन मेदबानाजोडेना बठा पठार परदेश;
17 पठारवरना हेशबोन अनी त्याना बठा नगर, दिबोन, बामोथ-बाल, बेथ-बालमोन;
18 याहस, कदेमोथ, मेफाथ;
19 किर्या-थईम, सिब्मा, खोरामाधला बसेल सरेथ शहर;
20 बेथ-पौर, पिसगानी उतरती, बेथ-याशिमोथ;
21 अनी माळवरना बठा गाव, म्हणजे हेशबोनमां राज्य करणारा अमोर्यासना राजा सीहोन याना बठा राज्य; या राजाले मोशेनी ठार मारं, अनी त्यानासंगे त्या देशमां राहानारा सिहोनना अधिपति अनी मिद्द्यानसना सरदार अवी, रेकेम, सूर, हूर अनी रेबा यासलेबी त्यानी मारं.
22 इस्त्राएल लोकेसनी तलवारघाई ज्यासना संहार करं त्यामाच बौरना पोर्या बलाम दैवज्ञ यासनाबी वध करं.
23 रऊबेन यानी सीमा यार्देनना काठले ठरनी, रऊबेनी यासना वतनभाग त्यासना कुळप्रमाणे नगर अनी गाव हयासलेबी हाईच ठरनं.
गादना वंशले देयल भाग
24 मंग मोशेनी गाद वंशनीसंगे त्यासना कुळप्रमाणे वतन दिधं.
25 त्यासना मुलूख हाई शे; याजेर, गिलादांतली बठा नगर; अनी राब्बासनामोरेना अरोएरापावोत अमोर्यासना आर्धा देश;
26 हेशबोनापाईन रामाथमिस्पापावोतना परदेश, बतोनीम महनाईमापाईन दबीरना हद्दपावोतना परदेश;
27 खोरामाधला बेथहाराम , बेथ-निम्रा, सक्कोथ, साफोन, म्हणजे हेशबोनाना राजा सीहोन याना राज्यना अवशिष्ट भाग अनी यार्देनना काठनं किन्नेरोथ सरोवरपावोत यार्देनना पुर्वेना परदेश.
28 गादी यासनं वतन त्यासना कुळप्रमाणे नगर अनी गाव यानासंगे हाईच ठरनं.
मनश्शेना वंशले देयल भाग
29 मंग मोशेनी मनश्शना आर्धा वंशले वतन दिद व्हतं ते मनश्शना आर्धा वंशले त्याना कुळप्रमाणे व्हतं.
30 त्यासना मुलूख हाई; महनाईमापाईन बठा बाशान देश म्हणजे बाशानना राजा ओग याना बठा राज्य अनी बाशानमाधला याईरना साठ नगर;
31 गिलादना आर्धा भाग, अनी बाशानना राजा ओग याना राज्यमाधला अष्टरोथ अनी एद्रई या नगरे मनश्शना पोर्या माखीर याना वंशना म्हणजे माखीरना आर्धा वंशना त्याना कुळप्रमाणे वतन ठरन.
32 यरीहोनाजोडे यार्देनना पुर्वेले मवाबना मैदानमां मोशेनी वाटी देयल वतन हया शेतस;
33 पण लेवी वंशले मोशेनी एक बी वतन दिधा नही; इस्त्राएलना देव यहोवा हाऊच त्याना सांगाप्रमाणे त्यासना वतन शे.