14
यार्देनना पक्षिम भागनी वाटनी
1 एलाजार याजक, नूनाना पोर्या यहोशवा अनी इस्त्राएल वंशना पितृकुळना प्रमुख यासनी वाटा पाडी देयेल जे वतनभाग म्हणीसन इस्त्राएल लोकेसले जे भेटनं ते हाई शे;
2 परमेश्वरनी साडेनऊ वंशनाबारामां मोशेकडतीन देयेल आज्ञाप्रमाणे त्यासना वतनभाग चिठया टाकीसनं वाटं.
3 अडीच वंशसले मोशेनी यार्देनना पुर्वले वतन देयेल व्हतच; पण लेवी वंशसले त्यासनासंगे काहीएक वतन देयल नव्हतं.
4 योसेफना वंशना दोन शाखा व्हयेल व्हत्यात, त्या मनश्शे अनी एफ्राईम हया व्हत्यात; पण त्या देशमां लेवीसले काही विभाग दिधा नही; पण राहावाले नगर अनी जनावर अनी धन याकरता काही शिवार देयेल व्हतात.
5 परमेश्वरनी मोशेले देयेल आज्ञाले अनुसरीसनं इस्त्राएल लोकेसनी तो देश वाटी लिदात.
हेब्रोन नगर कालेबले दिधं
6 मंग यहुदा वंशना लोके गिलगालमां यहोशवाकडे ऊनात; अनी कनिज्जी यफुन्नेना पोर्या कालेब त्याले बोलना, “परमेश्वरनी देवभक्त मोशे याले तुना बारामां अनी मना बारामां कादेश-बर्ण्यात काय सांग व्हतं ते तुले आठवत व्हयीच;
7 परमेश्वरना सेवक मोशे यानी माले हाई देश शोध कराले कादेश-बर्ण्यामाईन धाडं; तवय मी चाळीस वरीसना व्हतू अनी मना मनना समजुतप्रमाणे मी त्यानाकडे बातमी आणी;
8 पण मना भाऊ मनासंगे जायेल व्हतात त्यासनी लोकेसनी कायीजमां पानी पानी व्हयी अस करं; मी मात्र आपला देव यहोवा यानं सर्वाकाही अनुसरीसनं करं.
9 तवय त्या रोजले मोशेनी आणभाक करीसनं माले सांग की तु मना देव यहोवा यानं अनुसरनं करं म्हणीसनं ज्या भुमीले तुना पाय लागेल शे ती तुनी अनी तुना वंशनं कायमनं वतन व्हयी.
10 आते दख, परमेश्वरनी मोशेले हाई सांगं ती बातले पंचेचाळीस व्हयेल शेतस, एवढा येळमां इस्त्राएल लोक जंगलमां भटकत व्हतात तवय परमेश्वरनी आपला वचनप्रमाणे माले जीवत ठेयेल शे अनी मी आज पंचाऐंशी वरीसना व्हयेल शे.
11 मोशेनी माले धाडं त्या रोज मनामां जेवढी शक्ती व्हती तेवढी आज बी शे; लढाई करानी अनी येजा करानी ताकद मनामां जशी त्या येळली व्हती तशी आज बी शे.
12 तर त्या येळले परमेश्वरनी सांगाप्रमाणे हावु डोंगर माले दे; त्या येळले तु एकलाच व्हता की, तठे अनाकी लोके राहीसनं तठेना नगर मोठमोठा अनी तटबंदी शेतस; आते परमेश्वर माले सहाय्यक राहीना तर त्याना सांगाप्रमाणे मी त्याले तठेतुन हाकली दिसू.”
13 तवय यहोशवानी त्याले आशिर्वाद दिद; अनी यफुन्नेना पोर्या कालेब याले हेब्रोन नगर वतन करी दिद;
14 हाई परकारं आजपावोत कनिज्जी यफुन्नेना पोर्या कालेब याना हेब्रोन हाई वतन व्हयेल शे; कारण तो इस्त्राएलना देव यहोवा याले पुर्णपणे अनुसरना.
15 आगोदर हेब्रोनना नाव किर्याथ-आर्बा व्हतं; हाई आर्बा अनाक्यामां भलता थोर माणुस व्हयीसन गया, त्यानंतर त्या देशमां युध्दपाईन विसावा भेटनं.