11
प्रभुनी प्रार्थना
(मत्तय ६:९-१३; ७:७-११)
मंग अस व्हयनं की येशु एक जागावर प्रार्थना करी राहींता, अनी ती व्हवानंतर त्याना शिष्यमातीन एकनी त्याले सांगं, “प्रभुजी, जसं बाप्तिस्मा करनारा योहाननी त्याना शिष्यसले प्रार्थना कराले शिकाडेल शे तसं तुम्हीन बी आमले शिकाडा.”
येशु त्यासले बोलना, तुम्हीन प्रार्थना करशात तवय अस म्हणा;
“हे बाप,
तुनं नाव पवित्र मानोत;
तुनं राज्य येवो”
आमनी रोजनी भाकर रोज आमले दे.
अनी आमना पापसनी क्षमा कर,
जसं आम्हीन आमना प्रत्येक अपराधसले क्षमा करतस,
आमले परिक्षामा पडु देवु नको.
मंग येशु त्याना शिष्यसले बोलना, “तुमनामा असा कोण शे की त्याले मित्र शे अनी तो त्यानाकडे आर्धीरातमा जाईन त्याले म्हणस, ‘मित्र, माले तीन भाकरी उसन्या दे. कारण मना एक मित्र परवास करीसन मनाकडे येल शे, अनी त्याले खावाडाले मनाकडे काहीच नही शे!’ अनी समजा तुमना मित्रनी मझारतीन उत्तर दिधं, ‘माले तरास देवु नको! आते दार लावाई जायेल शे, अनं मना पोऱ्या मनाजोडे झोपेल शेतस, मनाघाई ऊठीसन तुले काही देवावनार नही.’ मी तुमले सांगस, तो त्याना मित्र शे यामुये जरी तो ऊठीसन त्याले देवाव नही, तरी त्यानी करेल रावण्यासमुये जे काही त्याले आवश्यक शे ते तो त्याले दि. अनी मी तुमले सांगस, मांगा म्हणजे तुमले भेटी; शोधा, म्हणजे तुमले सापडी; ठोका, म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई. 10 कारण जो कोणी मांगस त्याले भेटस, जो शोधस त्याले सापडस, अनी जो कोणी दार ठोकस त्यानाकरता उघडाई जास. 11 तुमनामा असा कोणता बाप शे की त्यानाजोडे त्याना पोऱ्यानी* जर भाकर मांगी तर तो त्याले दगड दि? मासा मांगा तर त्याले मासा नही देता साप दि का? 12 किंवा अंडा मांगात तर त्याले ईच्चु दि? 13 जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!”
येशु अनी बालजबुल
(मत्तय १२:२२-३०; मार्क ३:२०-२७)
14 एकदाव येशु दुष्ट आत्मा काढी राहींता अनं तो आत्मा मुका व्हता; तवय अस व्हयनं की दुष्ट आत्मा निंघावर तो माणुस बोलाले लागना, यावरतीन जमेल लोकसनी गर्दीले आश्चर्य वाटनं, 15 तरी त्यामातीन कितला जन बोलनात, “दुष्ट आत्मासना प्रमुख बालजबूल ह्याना सामर्थ्यघाई हाऊ दुष्ट आत्मा काढस.”
16 बाकीना बराच जणसनी येशुनी परिक्षा दखाकरता त्यानाकडे परमेश्वर कडतीन चिन्ह अनं चमत्कार करी दखाड अशी मागणी करी. 17 पण येशुनी त्यासना मनमधला ईचार वळखात अनं त्यासले बोलना, आपसमाच फुट पडनी तर कोणतं बी राज्य ओसाड पडस अनी घर बी टिकस नही. 18 सैतानमा बी फुट पडनी तर त्यानं राज्य कसं टिकी? कारण, मी बालजबूलना सामर्थ्यघाई भूतं काढस अस तुम्हीन म्हणतस. 19 मी जर बालजबूलना सामर्थ्यघाई दुष्ट आत्मा काढस तर तुमना अनुयायी कोणी सामर्थ्यघाई काढतस? यामुये त्या तुमना न्याय करतीन! 20 पण मी जर देवना सामर्थ्यघाई भूतं काढस तर देवना राज्य तुमनावर ई जायेल शे.
21 जर एखादा तगडा हत्यारबंद माणुस आपला वाडानी रखवाली करस तवय त्यानी मालमत्ता सुरक्षित ऱ्हास. 22 तरी त्यापेक्षा तगडा माणुस त्यानावर हमला करस अनी त्याले जिंकस, तवय ज्या हत्यारसवर त्याले भरवसा व्हता ती तो लई जास, अनी त्यानी लुटी आनेल वस्तु वाटी टाकस.
23 जो मना विरोधमा नही तो मना संगेनाच शे; अनी जो मनासंगे गोया करस नही तो उधळी टाकस.
दुष्ट आत्मानं परत येनं
(मत्तय १२:४३-४५)
24 माणुस मातीन दुष्ट आत्मा निंघना म्हणजे तो आराम कराकरता शांत जागाना शोध करत हिंडस; अनी ती भेटनी नही म्हणजे तो म्हणस, “ज्या मना घरमातीन मी निंघनु त्यामा परत जासु.” 25 तो परत येवावर ते घर झाडेल अनं सजाडेल शे अस तो दखस. 26 नंतर तो जाईन आपलापेक्षा दुष्ट असा सात आत्मासंगे लेस, अनी त्या मझार घुशीन तठे राहतस, मंग त्या माणुसनी शेवटली अवस्था पहिलापेक्षा वाईट व्हस.
खरं सुख
27 येशु या गोष्टी सांगीच राहींता तवय अस व्हयनं की त्या लोकसना गर्दीमातीन एक बाई वरडीन बोलनी, “जी बाईनी तुले जन्म दिधा अनी जिनी तुले दुध पाजेल शे ती धन्य!”
28 पण येशुनी उत्तर दिधं, “ज्या देवनं वचन ऐकीन पाळतस त्याच धन्य!”
परमेश्वकडतीन चमत्कारनी मागणी
(मत्तय १२:३८-४२)
29 लोकसनी गर्दी येशुजोडे एकत्र जमी राहींती तवय तो बोलना, “हाई पिढी कितली वाईट शे, या चमत्कारना चिन्ह मांगतस, पण योनाना चमत्कारना चिन्हशिवाय हाई पिढीले दुसरा चिन्ह मिळावच नही. 30 कारण योना जसं निनवेना लोकसले चमत्कारना चिन्ह व्हयना तसा मनुष्यना पोऱ्या हाई पिढीले व्हई. 31 दक्षिण दिशाकडली राणी न्यायकाळमा या पिढीना लोकससंगे ऊठीसन त्यासले दोषी ठराई, कारण शलमोन राजानं ज्ञान ऐकाकरता ती पृथ्वीना सिमापाईन प्रवास करीसन वनी, शलमोनपेक्षा श्रेष्ठ असा कोण आठे शे. 32 निनवेना लोके न्यायना काळमा या पिढीनासंगे उभा राहीन तिले दोषी ठरावतीन, कारण त्यासनी योनाना प्रचावरतीन पश्चाताप करा; अनी दखा योनापेक्षा श्रेष्ठ असा कोणी आठे शे!”
शरिरना दिवा
(मत्तय ५:१५; ६:२२,२३)
33 “कोणी दिवा लाईसन तळघरमा किंवा चंपानाखाल ठेवतस नही” तर मझार येणाराले उजेड दखावाले पाहिजे म्हणीसन दिवठणीवर ठेवतस. 34 तुना शरिरना दिवा तुना डोया शे, तुना डोया निष्पाप व्हई तर तुनं सर्व शरीर प्रकाशमय शे, वाईट व्हई तर तुनं शरीर अंधकारमय शे; 35 यामुये सावधान रहा, तुना मझार जो प्रकाश शे तो अंधार तर नही ना हाई दख. 36 तुनं सर्व शरीर प्रकाशमय व्हई म्हणजे त्याना कोणता बी भाग अंधकारमा नही शे तर दिवाना ज्योतीमुये तुले प्रकाश प्राप्त व्हस. तसच ते पुरं शरीर प्रकाशमय व्हई.
येशु परूशी अनं शास्त्री यासना जाहीरपणे निषेध करस
(मत्तय २३:१-३६; मार्क १२:३८-४०)
37 जवय येशुनी बोलानं समाप्त करा, तवय एक परूशीनी त्याले आपला आठे जेवणले येवानी ईनंती करी; मंग तो मझार जाईन जेवणले बसना. 38 येशुनी जेवणना पहिले यहूदीसना रितनुसार व्यवस्थीत हात नही धोयात अस दखीन परूशीले आश्चर्य वाटनं. 39 पण प्रभुनी त्याले सांगं, “तुम्हीन परूशी ताटवाटी बाहेरतीन स्वच्छ करतस, पण तुमना मझार लुटमार अनं दुष्टपण भरेल शे.” 40 अहो मुर्खसवन! ज्यानी बाहेरना भाग बनाडा, त्यानी मझारना बनाडा नही का? 41 ज्या गोष्टी तुमना जोडे शेतस त्या गरिबसले द्या, मंग दखा, सर्व तुमनाकरता शुध्द शे.
42 तुम्हीन परूशीसना धिक्कार असो! तुम्हीन पुदिना, सौफ अनी प्रत्येक भाजी यासना दशांश देतस, पण न्याय अनं देवनी प्रिती यानाकडे कानाडोया करतस, या गोष्टी कराले पाहिजे व्हत्यात, अनं त्या सोडाले नको पाहिजे व्हत्यात.
43 तुम्हीन परूशीसना धिक्कार असो! सभास्थानमा मुख्य आसन अनं बजारमा नमस्कार करी लेवाले तुमले आवडस. 44 तुमना धिक्कार असो! ज्या माणसंले माहीत नही की त्या नही दखावनारा कबरसवरतीन चाली राहीनात त्यासनामायक तुम्हीन शेतस.
45 तवय शास्त्रीसमातील एकजणनी त्याले सांगं, “गुरजी, तुम्हीन अस बोलीन आमनी बी निंदा करी राहीनात!”
46 येशु बोलना, “तुमना शास्त्रीसना बी धिक्कार असो! वाही लई जावाले जड ओझं तुम्हीन लोकसवर लादतस, अनी स्वतः तुमना एक बोट सुध्दा त्या ओझाले लावतस नही. 47 तुमना धिक्कार असो! तुम्हीन संदेष्टासना कबरी बांधतस, अनी त्यासले तर तुमना पुर्वजसंनीच मारी टाकेल शे. 48 तुम्हीन साक्षीदार शेतस अनं तुमना पुर्वजसंना कर्मले तुम्हीन मान्य करतस; कारण त्यासनी संदेष्टासले मारी टाकं अनी तुम्हीन त्यासन्या कबरा बांधतस. 49 देवनी बी सांगं, ‘मी त्यासनाकडे संदेष्टासले अनं प्रेषीतसले धाडसु, अनी त्यासनामातीन कहीकसले त्या मारी टाकतीन अनं छळतीन.’ 50 यानाकरता की जगनी निर्मिती व्हयनी तवयपाईन त्या सर्व संदेष्टासनं रंगत व्हावाडामा वनं त्या सर्वासना हिशोब ह्या पिढीना लोकसकडतीन लेवामा ई. 51 हाबेलना रंगतपाईन ते वेदीना अनं पवित्रस्थानमा ज्या जखऱ्याना घात व्हयना त्याना रंगतपावत जे रंगत सांडाई गयं त्याना हिशोब या पिढीपाईन लेवामा ई, हो, मी तुमले सत्य सांगस, त्याना हिशोब या पिढीपाईनच लेवाई जाई!”
52 “तुम्हीन शास्त्रीसना धिक्कार असो! तुम्हीन ज्ञाननी किल्ली लिसन गयात; तुम्हीन स्वतःबी मझार गयात नही अनं ज्या मझार जाई राहींतात त्यासले बी तुम्हीन आडफाटा करा!”
53 येशु तठेन बाहेर येवावर शास्त्री अनं परूशी संतापमा त्याना आंगवर ईसन त्यानी बऱ्याच गोष्टीसबद्दल बोलाले पाहिजे म्हणीन त्याले चिडावाले लागनात, 54 अनी त्याना तोंडमाईन काहीतरी चुकीनं निंघनं म्हणजे त्याले पकडसुत अस म्हणीन त्या टपी राहीनात.
* 11:11 हाई वचन जुना हस्तलेखमा नही शे 11:15 मत्तय ९:३४; १०:२५ 11:16 मत्तय १२:३८; १६:१; मार्क ८:११ 11:23 मार्क ९:४० 11:29 मत्तय १६:४; मार्क ८:१२ 11:33 मत्तय ५:१५; मार्क ४:२१; लूक ८:१६