18
अन्यायी न्यायाधीश
त्यासनी नाराज व्हवाले नको अनं कायम प्रार्थनामा ऱ्हावाले पाहिजे, यानाकरता येशुनी त्यासले एक दृष्टांत दिसन शिकाडं. एक नगरमा कोणी एक न्यायाधीश व्हता, तो देवले घाबरे नही अनं माणससनी बी पर्वा करे नही; अनी त्याच नगरमा एक विधवा व्हती, ती त्यानाकडे कायम ईसन अस सांगे, की, मना न्याय करीसन माले मना विरोधीपाईन सोडाव. तरी त्यानी ते बराच काळ पर्यंत करा नही; मंग तो आपला मनमा बोलना, जरी मी देवले घाबरत नही अनं माणससनी पर्वा करस नही, पण हाई विधवा माले त्रास देस म्हणीसन मी तिना न्याय करसु, नही तर ती कायम ईसन माले त्रास देत ऱ्हाई. तवय प्रभु बोलना, अन्यायी न्यायाधीश काय म्हणस ते ऐका. तर ज्या देवना निवडेल लोके शेतस त्या रात्रंदिन रडी रडी मदत करता त्याले हाक मारतस त्यासना तो न्याय करावु नही का? अनी त्यासना न्याय कराले तो येळ लाई का? अनी मी तुमले सांगस, तो त्यासना न्याय लवकर करी; तरी पण मनुष्यना पोऱ्या म्हणजे मी ईसु तवय माले पृथ्वीवर ईश्वास सापडी का?
परूशी अनं जकातदार
आम्हीन धार्मीक शेतस असा ज्या स्वतःबद्दल ईश्वास करीसन अनं दुसरासले तुच्छ मानी ऱ्हाईंतात त्यासले बी येशुनी हाऊ दृष्टांत सांगा; 10 एक परूशी अनं एक जकातदार असा दोनजन प्रार्थना कराकरता वर मंदिरमा गयात; 11 परूशीने उभं राहिसन आपला मनमा स्वतःबद्दल अशी प्रार्थना करी; हे देवा, इतर माणसं लोभी, अप्रामाणिक, व्यभिचारी असा शेतस, त्यासनामायक किंवा ह्या जकातदारनामायक मी नही, म्हणीन मी तुना उपकार मानस. 12 मी आठवडामा दोनदा उपास करस; जे माले मिळस ते सर्वासना दशांश देस. 13 पण जकातदार तर दूर उभा ऱ्हाईसन वर स्वर्गकडे बी दखं नही अनी आपली छाती ठोकीन बोलना, हे देवा, मनामायक पापीवर दया कर. 14 मी तुमले सांगस, की, त्या परूशीपेक्षा, जकातदार धार्मीक ठरीसन खाल आपला घर गया; कारण जो कोणी स्वतःले उचा कराले दखस त्याले निचा करामा ई, अनी जो कोणी स्वतःले निचा करस त्याले उचा करामा ई.
येशु धाकला पोऱ्यासले आशिर्वाद देस
(मत्तय १९:१३-१५; मार्क १०:१३-१६)
15 येशुनी पोऱ्यासले आशिर्वाद देवाले पाहिजे म्हणीन काही लोके आपला धाकला पोऱ्यासले त्यानाकडे लई वनात, पण हाई दखीसन शिष्य त्यासले दताडु लागनात. 16 पण येशुनी पोऱ्यासले आपलाजोडे बलावं अनी सांगं, पोऱ्यासले मनाजोडे येऊ द्या, त्यासले मना करू नका; कारण देवनं राज्य यासना मायकसनंच शे. 17 मी तुमले खरंखरं सांगस, जो कोणी धाकला पोऱ्यासना मायक व्हईसन देवना राज्यना स्विकार कराऊ नही, त्याना स्वर्गमा प्रवेश व्हवावुच नही.
श्रीमंत माणुस
(मत्तय १९:१६-३०; मार्क १०:१७-३१)
18 एक यहूदी अधिकारीनी येशुले ईचारं, अहो उत्तम गुरजी, काय करावर माले सार्वकालिक जिवन भेटी? 19 येशुनी त्याले सांग, माले चांगला का बरं म्हणस? एक म्हणजे देवना शिवाय कोणीच चांगला नही. 20 तुले तर देवन्या आज्ञा माहित शेतस; “मनुष्यहत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, कोणी खोटी साक्ष देऊ नको, फसाडु नको, ‘आपला बाप अनी माय यासना मान राख.” 21 तो यहूदी अधिकारी बोलना, मी तरूणपणपाईन ह्या सर्व आज्ञा पाळी ऱ्हाईनु शे. 22 हाई ऐकीन येशु त्याले बोलना, तुले आखो एक गोष्ट करनी शे; तुनं सगळं ईकीसन गरीबसले वाटी दे म्हणजे तुले स्वर्गमा संपत्ती भेटी; चल मनामांगे ये. 23 पण हाई ऐकीसन तो भलताच नाराज व्हईना, कारण तो खुप श्रीमंत व्हता. 24 तवय येशु त्यानाकडे दखीसन बोलना, श्रीमंतसना देवना राज्यमा प्रवेश व्हवानं कितलं कठीण शे! 25 श्रीमंतनी देवना राज्यमा प्रवेश करानं यानापेक्षा उंटले सुईना नाकमातीन जावानं सोपं शे. 26 ज्यासनी हाई ऐकं त्या ईचाराले लागनात, मंग कोणं तारण व्हई? 27 येशु बोलना, ज्या गोष्टी मनुष्यले अशक्य शे, त्या देवले शक्य शेतस. 28 तवय पेत्र बोलना, आम्हीन, आमना घरदार सोडीसन तुमना मांगे येल शेतस. 29 येशु त्यासले बोलना, मी तुमले खरंखरं सांगस, देवना राज्यकरता ज्यानी आपला घरदार, बायको, भाऊ, मायबाप किंवा पोऱ्यासोऱ्या सोडेल शे. 30 त्याले ह्या युगमा पुष्कळ पटमा भेटी अनं येणारा युगमा सार्वकालिक जिवन भेटी.
येशुनी तिसरांदाव स्वतःना मृत्युबद्दल करेल भविष्य
(मत्तय २०:१७-१९; मार्क १०:३२-३४)
31 तवय येशुनी बारा शिष्यसले बाजुले लई जाईसन सांगं, दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत, अनी मनुष्यना पोऱ्याबद्दल जे संदेष्टासद्वारे लिखामा येल शे त्या सर्व गोष्टी पुर्ण व्हणार शेतस, 32 त्या त्याले गैरयहूदीसना स्वाधीन करतीन, त्या त्यानी थट्टा करतीन अनी बेईज्जती करतीन, त्यानावर थुंकतीन, 33 त्याले फटका मारतीन, त्याना जीव लेतीन, अनी तिसरा दिन तो परत जिवत व्हई. 34 त्यासले ह्या गोष्टीसबद्दल काहीच समजनं नही, कारण हाई वचन त्यासनापाईन गुप्त ठेवामा येल व्हतं अनी येशुनी सांगेल गोष्टी शिष्यसले समजेल नव्हत्यात.
आंधया बार्तीमयले दृष्टीदान
(मत्तय २०:२९-३४; मार्क १०:४६-५२)
35 येशु यरीहो जोडे वना तवय अस व्हयनं की, एक आंधया वाटमा भीक मांगत बशेल व्हता; 36 त्यानी जोडेतीन जाणारी लोकसनी गर्दीना आवाज ऐकीन ईचारं, हाई काय शे?
37 त्यासनी त्याले सांगं, येशु नासरेथकर आठेन जाई राहिना.
38 तवय तो वरडीन बोलना, “हे येशु, दावीदना पोऱ्या! मनावर दया कर!”
39 मंग त्यानी गप्प ऱ्हावाले पाहिजे म्हणीन पुढे चालनारासनी त्याले दताडं; तरी पण तो आखो जास्तच वरडीन बोलना, हे दावीदना पोऱ्या, मनावर दया कर.
40 तवय येशुनी उभं राहिन आज्ञा करी की, त्या आंधया माणुसले मनाकडे लई या, तो जोडे येवावर त्यानी त्याले ईचारं, 41 मी तुनाकरता काय करू अशी तुनी ईच्छा शे? तो बोलना, प्रभु, माले परत दृष्टी मिळु दे.
42 येशु त्याले बोलना, तुले दृष्टी मिळो, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे.
43 त्याच क्षणले त्याले दखावाले लागणं अनं अनी तो देवना गौरव करीसन त्यानामांगे चालाले लागना; तवय सर्व लोकसनी हाई दखीन देवना उपकार मानात.
18:14 मत्तय २३:१२; लूक १४:११