19
येशु अनी जक्कय
मंग येशु यरीहो शहरमातीन जाई राहिंता, तवय दखा, जक्कय नावना कोणी एक माणुस व्हता, तो मुख्य जकातदार व्हता अनी तो श्रीमंत व्हता. येशु कोण शे हाई दखाकरता तो प्रयत्न करी राहिंता पण गर्दीमा त्यानं काही चाली नही ऱ्हाईंत, कारण तो बुटक्या व्हता. तवय तो पुढे पयत जाईसन येशुले दखाकरता उंबरना झाडवर चढना; कारण येशुले त्याच वाटतीन जाणं व्हतं. मंग येशु ती जागावर येताच वर दखीसन त्याले बोलना, “जक्कय, पटकन उतरीसन खाल ये, कारण आज माले तुना घर येणं शे.” तवय त्यानी पटकन उतरीसन त्यानं आनंदमा स्वागत करं. हाई दखीसन सर्व लोके कुरकुर कराले लागनात की, “हाऊ पापी माणुसना पाहुना म्हणीन ऱ्हावाले जाई ऱ्हाईना!” तवय जक्कय उभा राहिन प्रभुले बोलना, “प्रभुजी दख! मी मनी निम्मी संपत्ती गरीबसले दि टाकस, अनी मी अन्याय करीसन कोणं काही लिधं व्हई तर ते चौपट परत करस.” येशुनी त्याले सांगं, “आज हाई घरले तारण प्राप्त व्हयेल शे, कारण हाऊ बी अब्राहामनाच संतान शे. 10 कारण मनुष्यना पोऱ्या ‘दवडायेलसना शोध कराले’ अनं त्यासनं तारण कराले येल शे.”
सोनाना नाणासना दृष्टांत
(मत्तय २५:१४-३०)
11 जवय लोके ह्या गोष्टी ऐकी राहींतात तवय येशुनी त्यासले एक दृष्टांत सांगा; कारण तो यरूशलेम जोडेच व्हता, अनी देवनं राज्य आत्तेच प्रकट व्हई अस त्यासले वाटी राहींत 12 तवय तो बोलना, “कोणी एक उच्च पदवरला माणुस व्हता, आपण राज्य मियाडीन परत ईसु ह्या उद्देशतीन तो दुर देशमा निंघी गया.” 13 त्यानी आपला दहा नोकरसले बलावं अनी प्रत्येकले सोनाना दहा नाणा दिसन सांगं, मी येस तोपावत यासवर व्यापार करा. 14 त्याना स्वतःना नगरना लोके त्याना व्देष करेत, म्हणीन त्यासनी निरोप्यासले त्यानामांगे हाई सांगाले धाडं की, “ह्या माणुसनी आमनावर राज्य कराले पाहिजे अशी आमनी ईच्छा नही शे.”
15 मंग अस व्हयनं की राजा बनीन परत येवावर ज्या नोकरसले त्यानी सोनाना नाणा देयल व्हतात त्यासनी व्यापारमा कितलं कमाडं हाई दखाकरता त्यानी त्यासले बलावाले सांगं. 16 मंग पहिला त्यानाजोडे ईसन बोलना, “महाराज, तुम्हीन माले देयल नाणासवर मी अजुन नाणा कमाडात.” 17 त्यानी त्याले सांगं, शाब्बास, तु चांगला नोकर शे! तु धाकल्या गोष्टीसमा बी ईश्वासु निंघना म्हणीन मी तुले दहा शहरसवर अधिकार देस. 18 नंतर दुसरा नोकर ईसन बोलना, “महाराज, मी आपला पाच सोनाना नाणासवर अजुन पाच नाणा कमाडात.” 19 त्याले पण त्यानी सांगं, “तुले बी पाच शहरसवर आधिकार दिसु.” 20 मंग आखो एक नोकर ईसन त्याले बोलना, “महाराज, हाई दखा, तुम्हीन देयल नाणा, मी रूमालमा लपाडीन ठेल व्हतात.” 21 कारण तुम्हीन कठोर शेतस म्हणीन माले तुमनी भिती वाटनी; कारण जे तुम्हीन ठेल नही ते तुम्हीन उचलीन लई जातस अनी ज्यानी पेरणी तुम्हीन करी नही ते तुम्हीन कापतस. 22 तो त्याले बोलना, “अरे दुष्ट नोकर, मी तुनाच शब्दसघाई तुना न्याय करस, तुले माहित व्हतं मी कठोर माणुस शे, जे मनं नही ते मी लेस अनी ज्यानी पेरणी मी करी नही ते मी कापस.” 23 मंग तु मना पैसा व्याजतीन का बर नही दिधात? जर व्याजतीन देता तर माले त्या व्याजसकट परत मिळतात. 24 मंग त्यानी जोडे उभा राहणारासले सांगं, “ह्याना कडतीन त्या सोनाना नाणा परत ल्या अनं ज्यानाकडे दहा सोनाना नाणा शेतस त्याले द्या.” 25 त्या त्याले बोलनात, “महाराज, त्यानाजोडे ते दहा सोनाना नाणा शेतस!” 26 “मी तुमले खरंखरं सांगस, ज्यानाजोडे शे त्याले अजुन देवामा ई, अनी ज्यानाजोडे नही त्यानं जे काही व्हई ते पण त्यानापाईन काढी लेतीन. 27 आते ज्या मना वैरीसले अस वाटे की, मी त्यासनावर राज्य कराले नको त्यासले आठे आणा अनं मनासमोर मारी टाका.”
येशुना येरूशलेमा प्रवेश
(मत्तय २१:१-११; मार्क ११:१-११; योहान १२:१२-१९)
28 ह्या गोष्टी सांगिसन तो यरूशलेममा जातांना स्वतः पुढे चाली राहींता. 29 मंग अस व्हयनं की, ज्याले जैतुनना डोंगर म्हणतस त्या डोंगरजोडेना बेथफगे अनं बेथानी ह्या गावसनाजोडे तो ईसन पोहचावर त्यानी शिष्यसमाईन दोन जणसले अस सांगीसन धाडं की, 30 “तुम्हीन समोरना गावमा जा; म्हणजे तठे जाताच ज्यानावर कोणी कधी बशेल नही अस एक शिंगरू बांधेल तुमले सापडी, त्याले सोडीसन आणा. 31 शिंगरूले कसाले सोडी राहिनात अस जर तुमले कोणी ईचारं, तर प्रभुले यानी गरज शे, अस सांगा.” 32 तवय ज्यासले धाडेल व्हतं त्या तठे जावावर त्यासले त्यानी सांगेल प्रमाणे घडणं. 33 त्या शिंगरू सोडी राहींतात तवय शिंगरूना मालक त्यासले बोलना, “शिंगरू कसाले सोडी राहिनात?” 34 तवय त्या बोलनात, “प्रभुले ह्यानी गरज शे.” 35 मंग त्यासनी शिंगरूले येशुजोडे आनं, अनी आपला कपडा त्या शिंगरूवर टाकीसन त्यावर येशुले बसाडं. 36 अनी जसं तो पुढं जावाले लागना तसा लोके आपला कपडा वाटवर पसारत गयात. 37 तो जैतुन डोंगरना उतरतीवर पोचतास सर्व शिष्यसनी गर्दी आनंद करीसन मोठा आवाजमा देवनी स्तुती करीसन बोलु लागनात. 38 “प्रभुना नावतीन येणारा राजा आशिर्वादित राहो; स्वर्गमा शांती, अनी परमेश्वरना गौरव!”
39 तवय लोकसनी गर्दीमाईन काही परूशीसनी त्याले सांगं, “गुरजी, आपला शिष्यसले शांत ऱ्हावाले आज्ञा द्या!” 40 येशु त्यासले बोलना, “मी तुमले सांगस, या जर गप्प राहिनात तर धोंडा वरडतीन.”
यरूशलेमकडे दखीन येशुले दुःख व्हस
41 जवय येशु शहरना जोडे वना तवय शहरले दखीसन रडीन बोलना, 42 “जर तु बी आजना दिनले शांतीना गोष्टी वळखी लेता तर कितलं बरं व्हतं! पण आते तुम्हीन दखु शकतस नही! 43 कारण पुढे तुले असा दिन येतीन की, त्यामा तुना शत्रु, तुना आजुबाजू दाटीवाटी करीसन तुले वेढा घालतीन, तुले चारीमेरतीन कोंडतीन. 44 तुले अनं ‘तुना पोऱ्यासोऱ्यासले धुळमा मियाडतीन,’ अनी तुनामा दगडवर दगड राहु देवाऊत नही; कारण देव तुमले वाचाडाले वना ति येळ तुम्हीन वळखी लिधी नही!”
येशु मंदिरमा येस
(मत्तय २१:१२-१७; मार्क ११:१५-१९; योहान २:१३-२२)
45 नंतर येशु मंदिरमा गया अनं त्यामा ज्या व्यापारी व्यापार करी राहींतात त्यासले तो बाहेर काढाले लागना; 46 अनी त्यासले बोलना, प्रभु म्हणस, “मनं घर प्रार्थनानं मंदिर व्हई,” अस शास्त्रमा लिखेल शे; पण तुम्हीन त्याले लुटारूसना अड्डा करेल शे! 47 येशु मंदिरमा रोज शिकाडे; पण मुख्य याजक, शास्त्री अनं लोकसना पुढारी या त्याले मारी टाकाले दखी राहींतात; 48 पण काय करानं हाई त्यासले कळेच नही; कारण सर्व लोके त्यानं मन लाईसन ऐकेत.
19:10 मत्तय १८:११ 19:26 मत्तय १३:१२; मार्क ४:२५; लूक ८:१८ 19:27 मत्तय २५:१४-३० 19:47 लूक २१:३७