20
येशुना अधिकारविषयी संशय
(मत्तय २१:२३-२७; मार्क ११:२७-३३)
1 त्या दिनसमा एकदाव अस व्हयनं की, येशु मंदिरमा लोकसले शिकाडी राहिंता अनं सुवार्ता सांगी राहिंता तवय मुख्य याजक अनं शास्त्री ह्या वडील लोकसनासंगे त्यानापुढे ईसन त्याले बोलनात,
2 “तुम्हीन हाई गोष्ट कोणता अधिकारतीन करतस, अनी तुमले हाऊ अधिकार देणारा कोण शे, हाई आमले सांगा?”
3 तवय येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी पण तुमले एक प्रश्न ईचारस; त्यानं माले उत्तर द्या.
4 योहानले बाप्तिस्मा कराना अधिकार देवपाईन व्हता की, माणुसपाईन व्हता?”
5 तवय त्या आपसमा चर्चा करीसन बोलनात, आपण काय उत्तर देवाणं “स्वर्गपाईन शे अस सांगं, तर हाऊ सांगी, मंग तुम्हीन त्यानावर ईश्वास का ठेया नही?
6 अनी माणुसपाईन शे अस जर सांगं, तर सर्व लोके आपले दगडमार करतीन, कारण योहान संदेष्टा व्हता अस त्यासना भरवसा शे.”
7 तवय त्यासनी उत्तर दिधं, “तो कोणापाईन भेटना हाई आमले माहित नही.”
8 येशुनी त्यासले सांगं, “तर मंग मी पण तुमले सांगस नही की, कोणता अधिकारतीन ह्या गोष्टी मी करस.”
द्राक्षमळाना दृष्टांत
(मत्तय २१:३३-४६; मार्क १२:१-१२)
9 मंग तो लोकसले हाऊ दृष्टांत सांगाले लागना; कोणी एक माणुसनी “द्राक्षमया लावा” अनी तो बटाईवर दिसन बराच दिन परदेशमा जाईन राहिना.
10 मंग द्राक्षना हंगाम येवावर मळामालकनी त्याना वाटा लेवाले बटाईदार एक नोकरले शेतकरीसकडे धाडं; पण त्या शेतकरीसनी त्याले मारझोड करीसन रिकामं धाडी दिधं.
11 परत त्यानी दूसरा एक नोकरले धाडं; त्याले बी मारीनझोडीन अनं त्याना अपमान करीसन रिकामं धाडी दिधं.
12 परत त्यानी तिसराले धाडं; त्याले पण त्यासनी जखमी करीसन बाहेर फेकी दिधं.
13 तवय द्राक्षमयाना मालक बोलना, “मी आते काय करू? मी मना आवडता पोऱ्याले धाडस; कदाचित त्या त्याना तरी मान राखतीन!”
14 पण शेतकरी त्याले दखीसन आपसमा ईचार करीसन बोलनात, “हाऊ ते वारीस शे; याले आपण मारी टाकुत म्हणजे मळा आपलाच व्हई जाई!”
15 मंग त्यासनी त्याले द्राक्षमयाना बाहेर काढीसन मारी टाकं; “तर द्राक्षमयाना मालक त्यासनं काय करी?”
16 तो ईसन त्या शेतकरीसना नाश करी अनं द्राक्षमया दूसरासले सोपी दि. हाई ऐकीसन त्या बोलनात, “अस नको व्हवाले!”
17 येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, तर जो “दगड बांधणारासनी नापसंत करा तोच कोणशिला व्हयेल शे, अस जे शास्त्रमा लिखेल शे त्याना अर्थ काय?
18 जो कोणी त्या दगडवर पडी त्याना तुकडा तुकडा व्हतीन; पण ज्या कोणवर तो पडी त्याना तो भुगा भुगा करी टाकी.”
कैसरले कर देवाबाबत प्रश्न
(मत्तय २२:१५-२२; मार्क १२:१३-१७)
19 तवय शास्त्री अनं मुख्य याजक यासनी त्याच येळले येशुले धराना प्रयत्न करा; पण त्यासले लोकसनी भिती वाटणी; कारण येशुनी हाऊ दृष्टांत आपले लाईन दिधा अस त्यासले वाटनं.
20 मंग त्या त्यानावर नजर ठेईन राहिनात अनी येशुले प्रश्न ईचारिन त्याना बोलामा फसाडीन सुभेदारना ताबामा अनं रोमी सरकारना अधिकारमा धरी देवाकरता काही गुप्त हेरसले धार्मीकतेनं ढोंग रचाडीन त्यानाकडे धाडं.
21 गुप्त हेरसनी येशुले सांगं, गुरजी, तुम्हीन योग्य बोलतस अनं शिकाडतस; तुम्हीन तोंड दखीन बोलतस नही, तर देवना खरा मार्ग शिकाडतस हाई आमले माहित शे.
22 आम्हीन “कैसरले कर देवानं हाई योग्य शे की, नही?”
23 येशुनी त्यासनं युक्ती वळखीन त्यासले सांगं,
24 “माले एक चांदिनं नाणं दखाडा, यानावर कोण चित्र अनी लेख शे?” त्या बोलनात, “रोमना राजानं.”
25 तवय येशुनी त्यासले सांगं, “तर जे राजानं शे ते राजाले अनं देवनं ते देवले द्या.”
26 तवय लोकसना समोर या त्याना बोलनावर त्यासले त्याले धरता ई नही राहींत, अनी त्यानी देयल उत्तरनं नवल वाटीन त्या गप्पच राहिनात.
पुनरूत्थाननाविषयी प्रश्न
(मत्तय २२:२३-३३; मार्क १२:१८-२७)
27 नंतर, पुनरूत्थान व्हस नही अस म्हणनारा सदुकी लोकसमाईन बराच जणसनी येशुजोडे ईसन त्याले ईचारं,
28 “गुरजी, मोशेनी आमनाकरता असा लिखेल शे की; ‘एखादाना भाऊ त्यानी बायको असतांना मरना अनं त्याले संतान नही शे, तर त्याना भाऊनी त्या बाईसंगे लगीन करीसन आपला भाऊना वंश चालाडानं.’
29 असाच कोणतरी सात भाऊ व्हतात; त्यासमाईन पहिला भाऊनी बायको करी अनं तो बिगर संतानना मरी गया.
30 मंग दुसरानी अनं तिसरानी बी ती बाईसंगे लगीन करं;
31 असंच त्या सातही भाऊ बिगर संतानना मरी गयात.
32 शेवट ती बाई बी मरनी.
33 तर पुनरूत्थानना येळले ती त्यासनामाईन कोणी बायको राही? कारण त्या सात जणसनी तिनासंगे लगीन करेल व्हतं.”
34 येशुनी त्यासले सांगं, “या युगमा लोके लगीन करी लेतस अनं लगीन करी देतस;
35 पण त्या ज्या युगमा प्रवेश कराकरता अनी अनं मरेल मातीन जिवत व्हईन ऊठाकरता योग्य ठरेल शेतस त्या, लगीन कराऊत नही अनी करी बी देवाऊत नही;
36 अनी त्या पुढे मराऊत बी नहीत, कारण त्या देवदूतसना मायक राहतीन, अनी मरेल मातीन जिवत व्हईन ऊठामुये त्या देवना पोऱ्या व्हतीन.
37 आखो मरेल बी ऊठतस हाई मोशेनी जळणारा झुडूपणा उदाहरणमा, परमेश्वरले ‘अब्राहामना देव, इसहाकना देव अनं याकोबना देव’ अस म्हणीन दखाडेल शे;
38 तो मरेलसना देव नही, तर जिवतसना शे; कारण त्यानामा सर्वाच जिवत शेतस.”
39 तवय शास्त्रीसमाईन बराच जणसनी सांगं, “गुरजी, बराबर बोलनात!”
40 मंग त्याले अजुन काही ईचाराले त्यासनी हिम्मत व्हईनी नही.
ख्रिस्त कोणा पोऱ्या शे?
(मत्तय २२:४१-४६; मार्क १२:३५-३७)
41 त्यावर येशुनी त्यासले ईचारं, “ख्रिस्त दावीदना पोऱ्या शे अस का म्हणतस?
42 कारण दावीद स्वतः स्तोत्रना पुस्तकमा सांगस, ‘प्रभुनी मना प्रभुले सांगं; तू मना उजवीकडे बस
43 जोपावत मी तुना शत्रुसले तुना पायसनं आसन करस नही.’
44 दावीद त्याले जर ‘प्रभु’ म्हणस; तर तो त्याना पोऱ्या कसा राही?”
शास्त्रीसबद्दल इशारा
(मत्तय २३:१-३६; मार्क १२:३८-४०)
45 जवय सर्व लोके त्यानं ऐकी राहींतात तवय येशुनी आपला शिष्यसले सांगं,
46 “शास्त्रीसबद्दल सावध राहा; त्यासले लांबलांब झगा घालीन फिराले चांगलं वाटस; बाजारमा नमस्कार अनं सन्मान, सभास्थानमा मुख्य आसन अनं मेजवानीमा चांगली जागा हाई त्यासले आवडस;
47 त्या विधवा बाईसनी संपत्ती हड्डप करतस अनी त्यासना गैरफायदा उचलतस अनी ढोंगीसनामायक लांबलचक प्रार्थना करतस; त्यासले भलती शिक्षा व्हई!”