5
पहिला शिष्यले पाचारण
(मत्तय ४:१८-२२; मार्क १:१६-२०)
एक दिन येशु गनेसरेत तलावना किनारवर उभा व्हता अनी लोकसनी गर्दी त्याना आजुबाजूले उभं राहिन देवनं वचन ऐकी राहींती. तवय त्यानी तलावना काठवर लागेल दोन नाव दख्यात; त्यावरला कोळी खाल उतरीन जाळं धोई राहींतात. तो त्यासनामातीन एक नाववर चढी गया जी शिमोननी व्हती अनी त्यानी त्याले सांगं की, नावले किनारावरतीन जरा दुर सरकाई ले. मंग येशु नावमा बशीन लोकसनी गर्दीले शिकाडु लागना.
नंतर आपलं बोलणं संपाडानंतर त्यानी शिमोनले सांगं, “नाव खोल पाणीमा जाऊ दे अनी मासा धराकरता आपलं जाळं खाल टाक.”
शिमोन त्याले बोलना, “हे प्रभु, आम्हीन पुरी रात भलतं काम करं पण काहीच भेटणं नही, तरी तु सांगस म्हणीन मी जाळं टाकस.” मंग त्यानी तसं करावर मासासना मोठा घोळका जाळामा सापडना अनी त्यासनं जाळं फाटाले लागनं. तवय त्यासनी दुसरा नावमा बशेल जोडीदारसनी आपले मदत कराले पाहिजे म्हणीन इशारा करा, मंग त्या येवावर दोन्ही नाव इतल्या भरण्यात की बुडाले लागन्यात. हाई दखीन पेत्र येशुना पाया पडीन बोलना, “प्रभुजी, मनापाईन निंघी जा, मी पापी माणुस शे!”
कारण त्यासनी धरेल मासासना घोळका दखीन, तो अनी त्यानासंगेना सर्वजण आश्चर्यचकीत व्हयेल व्हतात. 10 तसच शिमोनना जोडीदार जब्दीना पोऱ्या याकोब अनं योहान ह्या बी आश्चर्यचकीत व्हयेल व्हतात. तवय येशुनी शिमोनले सांगं, “भिऊ नको; आठेन पुढे तु लोकसले देवना राज्यमा लईशी.”
11 मंग नाव काठवर लाईसन सर्व सोडीन त्या येशुना मांगे निंघनात.
येशु कोडी माणुसले बरं करस
(मत्तय ८:१-४; मार्क १:४०-४५)
12 नंतर अस व्हयनं की, येशु एक गावमा व्हता, तवय तठे एक कुष्टरोगी माणुस व्हता; त्यानी येशुले दखीन खाल पडीन ईनंती करी की, “प्रभुजी, तुमनी ईच्छा व्हई तर माले शुध्द कराकरता तुम्हीन समर्थ शेतस!”
13 तवय येशुनी हात पुढे करीसन त्याले स्पर्श करीसन सांगं, “मनी ईच्छा शे; शुध्द व्हई जाय!” अनी लगेच त्यानं कोड निंघी गयं. 14 मंग येशुनी त्याले आज्ञा दिधी, “दख कोणलेच काही सांगु नको. तर तु स्वतः जाईसन याजकले * दखाड, तुनं कोड निंघी गयं, अनी याजकले खरं पटी म्हणीन शुध्द व्हवानंतर जे अर्पण मोशेनी देवानं ठराई देयल शे; ते अर्पण कर.”
15 पण त्यानाबद्दलन्या बातम्या लगेच पसरन्यात, अनी बराच लोकसनी गर्दी त्यानं ऐकाले अनी आपला आजार बरा कराकरता वनी. 16 पण तो एकांतमा जाईन प्रार्थना करी राहिंता.
येशु लखवा व्हयेल माणुसले बर करस
(मत्तय ९:१-८; मार्क २:१-१२)
17 एक दिन अस व्हयनं की, येशु शिकाडी राहिंता तवय गालीलमातीन प्रत्येक गावतीन अनी यहूदीया अनं यरूशलेमतीन येल परूशी अनं शास्त्री तठे बशेल व्हतात. लोकसले बरा करानं प्रभुनं सामर्थ्य त्यानासंगे व्हतं. 18 तवय दखा, काही लोके एक लखवा व्हयेल माणुसले खाटवर लई वनात अनं त्याले मझार लई जाईन त्याना समोर ठेवाना प्रयत्न करा. 19 पण गर्दीमुये त्याले मझार लई जावाले त्यासले जमी नही राहिंतं, म्हणीन त्यासनी घरवर चढीन कौलं काढीन त्याले खाटसंगेच येशु समोर खाल उतारी दिधं. 20 तवय ज्या त्याले लई वनात त्यासना ईश्वास दखीन येशु बोलना, “हे माणुस, तुना पापसनी क्षमा व्हयेल शे.”
21 तवय काही शास्त्री अनं परूशी एकमेकसले बोलाले लागनात, “हाऊ कोण शे अस बोलणारा हाऊ तर देवनी निंदा करी राहिना! फक्त देवच पापसनी क्षमा करू शकस!”
22 येशुनी त्यासना ईचार वळखीन त्यासले सांगं, “तुम्हीन ह्या गोष्टीसना का बर ईचार करतस? 23 ‘तुना पापसनी क्षमा व्हयेल शे’ हाई बोलनं, की, ‘ऊठीसन चाल हाई बोलनं,’ यामातीन कोणतं सोपं शे? 24 पृथ्वीवर पापसनी क्षमा कराले मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले अधिकार शे.” मंग येशु लखवा व्हयेल माणुसले बोलना, “मी तुले सांगस, ऊठ, आपली खाट उचलीसन घर जा!”
25 तवय तो लगेच त्यासनासमोर ऊठीसन ज्या खाटवर तो झोपेल व्हता, ती उचलीन देवना गौरव करत घर गया. 26 तवय सर्व लोके चमकाई गयात! त्या देवना गौरव कराले लागनात अनी भलता घाबरीसन बोलणात, “आम्हीन आज अद्भुत गोष्टी दख्यात!”
लेवी नावना माणुसले पाचारण
(मत्तय ९:९-१३; मार्क २:१३-१७)
27 नंतर येशु बाहेर गया तवय त्यानी लेवी नावना एक जकातदारले जकात नाकावर बशेल दखं, अनं त्याले सांगं, “मनामांगे ये.” 28 तवय लेवी सर्व सोडीन त्यानामांगे ऊठीसन गया.
29 मंग लेवीनी आपला घर त्याले मोठी मेजवानी दिधी, अनी त्यासनासंगे जकातदार अनं दुसरा लोकसनी गर्दी जेवाले बशेल व्हती. 30 तवय तठला परूशी अनी शास्त्री ह्या त्याना शिष्यसकडे कुरकुर करीसन बोलनात, “तुम्हीन का बर जकातदार अनं पापी लोकससंगे खातस पितस?”
31 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “निरोगी माणुसले वैद्यनी गरज ऱ्हास नही, तर आजारी माणुसले ऱ्हास. 32 मी धार्मीक माणससले नही, तर पापी माणससले पापपाईन सोडावाले येल शे.”
उपासना प्रश्न
(मत्तय ९:१४-१७; मार्क २:१८-२२)
33 काही लोके येशुले बोलनात, “बाप्तिस्मा करनारा योहानना शिष्य कायम उपास अनं प्रार्थना करतस, अनी तसच परूशीसना शिष्य बी करतस; पण तुना शिष्य खातस पितस.”
34 येशुनी उत्तर दिधं, “तुमले वाटस का जोपावत वऱ्हाडीसनासंगे नवरदेव शे तोपावत तुम्हीन त्यासना कडतीन उपास करी लेवु शकतस? 35 तरी असा दिन येतीन जवय त्यासकडतीन नवरदेवले काढीन लई जातीन त्या दिनसमा त्या उपास करतीन.”
36 आखो तो त्यासले दृष्टांत दिसन बोलना, “कोणी नवा कपडा फाडीन त्यानं जुना कपडाले ठिगळं लावस नही, तसं कर तर नवा कपडा फाटी जाई अनं जुना कपडावर नवा कपडा शोभाव बी नही. 37 कोणी नवा द्राक्षरस कातडापाईन बनाडेल जुनी थैलीमा भरीन ठेवस नही. जर तसं करं तर थैली फाटी जाई, अनी सर्व द्राक्षरस सांडाई जाई. 38 म्हणीसन नवा द्राक्षरस नवी थैलीमाच भरीन ठेवाना. 39 जुना द्राक्षरस पेवानंतर तुम्हीन नवा द्राक्षरस मांगतस नही, कारण तुम्हीन म्हणतस जुना चांगला शे.”
5:1 मत्तय १३:१,२; मार्क ३:९,१०; ४:१ 5:5 योहान २१:३ 5:6 योहान २१:६ * 5:14 याजक धार्मीक विधी करनारा 5:30 लूक १५:१,२