9
येशु बारा प्रेषितसले प्रचारले धाडस
(मत्तय १०:५-१५; मार्क ६:७-१३)
1 मंग येशुनी बारा शिष्यसले एकत्र बलाईन त्यासले सर्व दुष्ट आत्मा काढाना अनी रोग बरा कराना अधिकार दिधा,
2 अनी त्यानी देवराज्यना प्रचार कराले अनं रोगीसले बरं कराले त्यासले धाडी दिधं.
3 त्यानी त्यासले सांगं, “प्रवासकरता काहीच ली जाऊ नका, काठी, झोळी, भाकर, पैसा बी लई जाऊ नका, दोन सदरा बी ली जाऊ नका.
4 ज्या घरमा तुम्हीन जाशात, त्याच घरमा थांबा अनं तठेनच निंघी जा.
5 अनी जो तुमना स्विकार कराव नही, तवय त्या गावमातीन निंघतांना तुम्हीन तुमना पायनी धुळ तठेच झटकी टाका, यामुये त्यासनाविरूध्द हाई साक्ष व्हई.”
6 मंग त्या निंघीन सर्वीकडे गावसमा सुवार्ता सांगत अनं रोग बरा करत फिरनात.
हेरोद गोंधळी जास
(मत्तय १४:१-१२; मार्क ६:१४-२९)
7 जवय गालीलना हेरोद राजानी त्या सर्व गोष्टीसबद्दल ऐक ज्या घडी राहींतात, तो त्या ऐकीसन भलता गोंधळमा पडना, कारण बाप्तिस्मा करनारा योहान मरेल मातीन ऊठेल शे अस बराच जणसनी त्याले सांगं.
8 बराच जणसनी एलिया प्रकट व्हयेल शे अस सांगं, अनी बराच जणसनी जुना संदेष्टास माधला कोणतरी ऊठेल शे अस सांगं.
9 हेरोद बोलना, “मी योहाननं मुंडक कापाले सांगं, पण ज्यानाबद्दल मी ह्या गोष्टी ऐकी राहिनु तो कोण शे?” ह्यावरतीन येशुले भेटानी त्याले उत्सुकता लागनी.
येशु पाच हजार लोकसले जेवण देस
(मत्तय १४:१३-२१; मार्क ६:३०-४४; योहान ६:१-१४)
10 मंग प्रेषितसनी परत ईसन त्यासनी जे करेल व्हतं ते येशुले सांगं. तवय तो त्यासले लिसन बेथसैदा नावना गावले एकांतमा गया.
11 पण लोकसनी गर्दीले हाई माहित पडणं अनी त्या पण त्यानामांगे गयात, तवय येशुनी त्यासनं स्वागत करीसन त्यासनासंगे देवना राज्यबद्दल बोलना, अनी ज्यासले बरं व्हवानी ईच्छा व्हती त्यासले त्यानी बरं करं.
12 जवय सुर्य बुडाले लागना, तवय बारा शिष्य ईसन त्याले बोलनात, “लोकसनी गर्दीले धाडी द्या, म्हणजे त्या आजुबाजूना गावसमा अनं वावरसमा जाईन ऱ्हावाले अनं खावाले काहीतरी शोधतीन, कारण आपण आठे एकांतमा शेतस.”
13 पण येशु त्यासले बोलना, तुम्हीनच त्यासले काहीतरी खावाले द्या.
त्या बोलनात, आमनाकडे पाच भाकरी अनं दोन मासा यासना शिवाय काहीच नही, तुमले काय वाटस आमले जाईन या लोकसकरता जेवण ईकत लईनं पडी का?
14 त्या जवळपास पाच हजार माणसे व्हतात.
तवय येशुनी आपला शिष्यसले सांगं की, पन्नास पन्नासन्या पंगतमा त्यासले बसाडा.
15 त्यासनी तसच सर्वासले बसाडं.
16 तवय येशुनी त्या पाच भाकरी अनं त्या दोन मासा लिसन वर स्वर्गकडे दखीन देवना उपकार मानात, अनी त्या मोडीन लोकसनी गर्दीले वाढाकरता शिष्यकडे दिध्यात.
17 तवय सर्वजण जेवण करीसन तृप्त व्हयनात, अनी त्यासनी जे उरेल व्हतं त्याना बारा डालक्या उचल्यात.
येशु हाऊ तारणारा ख्रिस्त शे अस पेत्र कबुल करस
(मत्तय १६:१३-१९; मार्क ८:२७-२९)
18 नंतर अस व्हयनं की, “येशु एकांतमा प्रार्थना करी राहिंता तवय त्याना शिष्य त्यानासंगे व्हतात, मंग त्यानी त्यासले ईचारं. मी कोण शे, लोक माले काय म्हणतस?”
19 त्यासनी उत्तर दिधं, काहीजण म्हणतस बाप्तिस्मा करनारा योहान, “काहीजण एलिया, अनी काही लोक जुना संदेष्टासमातीन कोणतरी ऊठेल शे अस म्हणतस.”
20 त्यानी त्यासले ईचारं, तुम्हीन माले काय म्हणतस?
पेत्रनी उत्तर दिधं, तु देवनी धाडेल तारणारा ख्रिस्त शे.
स्वतःना मृत्यू अनं पुनरूत्थानबद्दल येशुनी करेल भविष्य
(मत्तय १६:२०-२८; मार्क ८:३०–९:१)
21 येशुनी त्यासले बजाईन सांगं की, हाई कोणलेच सांगु नका,
22 आखो येशु शिष्यसले बोलना, “मनुष्यना पोऱ्याले भलता दुःख सहन करना पडतीन, वडील लोके, मुख्य याजक अनं शास्त्री लोके या मना त्याग करतीन, अनं माले मारी टाकतीन, अनी मी तिसरा दिन जिवत व्हसु,” हाई व्हनं आवश्यकच शे.
23 त्यानी सर्व लोकसले सांगं, जर कोणी मनामांगे येवाले दखस त्याले आत्मत्याग करना पडी अनी दुःख सहन करना पडतीन, मरनं पडी, असासनीच मनामांगे येवानं.
24 जो कोणी आपला जिव वाचाडाले दखस तो त्याले गमाडी, पण जो कोणी मनाकरता आपला जिव गमाडी, तो त्याले वाचाडी.
25 एखादानी सगळं जगनं सुख कमाडं, अनी स्वतःना जिव गमाडा किंवा स्वतःना नाश करी लिधा तर त्याले काय लाभ?
26 ज्याले कोणले मनी अनी मना वचननी लाज वाटी, त्यानी लाज जवय मनुष्यना पोऱ्या स्वतःना, पिताना अनं पवित्र देवदूतना गौरवमा ई, तवय त्याले बी वाटी.
27 मी तुमले सत्य सांगस की, आठे उभा राहणारासपैकी काही लोके असा शेतस की, त्या देवनं राज्य दखतस नही तोपावत त्यासले मरणना अनुभव येवावच नही.
येशुनं रूपांतर
(मत्तय १७:१-८; मार्क ९:२-८)
28 या गोष्टी सांगा नंतर अस व्हयनं की आठ दिन नंतर पेत्र, योहान अनी याकोब यासले संगे लिसन येशु प्रार्थना कराकरता डोंगरवर गया.
29 अनी तो प्रार्थना करी राहींता तवय लगेच त्याना चेहरानं रूपांतर व्हईसन त्याना कपडा धवळा व्हईसन चमकाले लागनात.
30 अनी दखा, मोशे अनं एलिया या दोन्हीजन, येशुनासंगे बोली राहींतात,
31 त्या स्वर्गीय महीमामा प्रकट व्हईसन जो परमेश्वरना उद्देश यरूशलेममा पुरा व्हणार व्हता त्यानाबद्दल म्हणजे त्याना मरणबद्दल गोष्टी करी राहींतात.
32 तवय पेत्र अनं त्यानासंगेना लोके गाड झोपमा व्हतात, तरी त्यासनी जागं व्हईन त्यानं रूप अनं त्यानाजोडे उभा राहेल त्या दोन्ही माणससले दखं.
33 मंग अस व्हयनं की त्या येशु कडतीन जाई राहींतात तवय पेत्रनी येशुले सांगं, प्रभु, आपण आठे राहसुत हाई बरं व्हई! तर आपण तीन मंडप बनाडु, एक मोशेकरता अनं एक एलियाकरता, हाई जे तो बोलना यानं त्याले भान नव्हतं.
34 तो हाई बोली राहींता ईतलामा ढगनी ईसन त्यासले झाकी दिधं; अनी त्या ढगमा झाकाई जातांना घाबरी गयात.
35 तवय ढगमातीन अशी वाणी व्हयनी की, “हाऊ मना पोऱ्या, ज्याले मी निवाडेल शे, त्यानं तुम्हीन ऐका!”
36 हाई वाणी व्हयनी तवय येशु एकलाच व्हता. शिष्य गप्पच राहीनात अनी त्या दिनसमा ज्या गोष्टी त्यासनी दखेल व्हत्यात त्यामाधलं काहीच शिष्यसनी कोणलेच सांगं नही.
येशु दुष्ट आत्मा लागेल पोऱ्याले बरं करस
(मत्तय १७:१४-१८; मार्क ९:१४-२७)
37 मंग दुसरा दिन येशु अनी त्याना तिन शिष्य डोंगरवरतीन उतरनात तवय मोठी लोकसनी गर्दी त्याले ईसन भेटनी.
38 तवय गर्दीमातीन एक माणुस जोरमा वरडीन बोलना, “प्रभु! मी तुमले ईनंती करस, मना पोऱ्याकडे दखा! कारण हाऊ मना एकुलता एक पोऱ्या शे!
39 एक दुष्ट आत्मा त्याले धरस अनी तो अचानक वरडस, तो त्याले असा पिळस की, त्याना तोंडमाईन फेस निंघस; त्याले भलता ठेचस अनं लवकर बी सोडस नही.
40 तुमना शिष्यसनी दुष्ट आत्मा काढाले पाहिजे म्हणीन मी त्यासले ईनंती करी, पण त्यासले काढता वनं नही.”
41 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “हे अईश्वासी अनं चुकायल पिढी! मी कोठपावत तुमनासंगे ऱ्हासु? अनं सहन करू?” तो त्या माणुसले बोलना, “तु तुना पोऱ्याले मनाकडे लई ये.”
42 तो पोऱ्या येशु जोडे ई राहींता ईतलामा दुष्ट आत्मानी त्याले आपटं अनं पिळी टाकं. येशुनी त्या दुष्ट आत्माले धमकाडं, अनी पोऱ्याले बरं करीसन त्याना बापजोडे दिधं.
43 तवय देवनी महानता दखीन सर्व लोके आश्चर्यचकीत व्हयनात.
दुसरांदाव येशुनी आपला मृत्युबद्दल करेल भविष्य
(मत्तय १७:२२,२३; मार्क ९:३०-३२)
येशुनी करेल सर्व कृत्यसवरतीन सर्व लोक आश्चर्य करी राहींतात तवय येशु त्याना शिष्यसले बोलना,
44 “हाई गोष्टवर ध्यान द्या! कारण मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले लोकसना हातमा धरीन देवामा येवाव शे.”
45 हाई शिष्यसले समजनं नही, कारण त्यासनापाईन ती गुप्त ठेवामा येल व्हती, अनी या गोष्टीसबद्दल येशुला ईचारानी त्यासले भिती वाटनी.
सर्वात मोठा कोण?
(मत्तय १८:१-५; मार्क ९:३३-३७)
46 मंग आपलामा मोठा कोण शे या विषयवरतीन शिष्यसमा वाद व्हवाले लागना.
47 येशुनी त्यासना मनमातील ईचार वळखीन, एक धाकला बाळले लिधं अनी त्याले आपलाजोडे उभं करं,
48 मंग त्यानी शिष्यसले सांगं, “जो कोणी या धाकला बाळले मना नावतीन स्विकारस, तो माले स्विकारस, अनी जो कोणी माले स्विकारस, तो ज्यानी माले धाडेल शे त्याले स्विकारस. तुमना सर्वासमा जो धाकला शे तोच श्रेष्ठ शे.”
जो आपला विरोधमा नही तो आपलाच शे
(मार्क ९:३८-४०)
49 योहान बोलना, “प्रभु, आम्हीन एक माणुसले तुमना नावतीन दुष्ट आत्मा काढतांना दखं, आम्हीन त्याले मना करं, कारण तो आपलामाधला नव्हता.”
50 येशुनी त्यासले सांगं, “त्याले मना करू नका, कारण जो आपला विरोधमा नही तो आपला संगेनाच शे.”
शोमरोनी लोकसना विरोध
51 मंग अस व्हयनं की येशुनी स्वर्गमा जावानी येळ जोडे वनी तवय त्यानी यरूशलेमले जावाना दृढ निश्चय करा.
52 त्यानी निरोपीसले धाडं, तवय त्या जाईन त्यानाकरता तयारी कराले शोमरोनीसना एक गावमा गयात.
53 पण त्यासनी त्याना स्विकार करा नही. कारण तो यरूशलेमकडेच जाई राहींता.
54 हाई दखीन त्याना शिष्य याकोब अनं योहान बोलनात, “प्रभुजी, स्वर्गमातीन अग्नी पडीन त्यासना नाश व्हवाले पाहिजे म्हणीन आम्हीन आज्ञा करूत,” अशी तुमनी ईच्छा शे का?
55 येशुनी वळीन त्यासले दताडं.
येशुना शिष्य कशा पाहिजेत
(मत्तय ८:१९-२२)
56 मंग येशु अनी त्याना शिष्य पुढे दुसरा गावले गयात.
57 तवय अस व्हयनं की त्या वाटतीन चाली राहींतात तवय एकनी येशुले सांगं, “तुम्हीन जठे कोठे जाशात तठे मी तुमना मांगे ईसु.”
58 येशु त्याले बोलना, “कोल्हासकरता बिळा अनं आकाशमाधला पक्षीसले घरटा शेतस, पण मनुष्यना पोऱ्याले डोकं टेकाले जागा नही.”
59 येशुनी दुसराले सांगं, “मनामांगे ये.”
पण तो बोलना, “प्रभुजी, माले पहीले मना बापले पुराले जावु द्या.”
60 येशुनी उत्तर दिधं, “मरेलसलेच त्यासना मरेलसले पुरू दे, तु जाईन देवना राज्यना सुवार्ताना प्रचार कर.”
61 त्यावर आखो एकजण बोलना, “प्रभुजी, मी तुमना मांगे ईसु, पण पहिले माले मना घरना मंडळीले निरोप देवु दे.”
62 येशुनी त्याले सांगं, “जो कोणी नांगरले हात लावावर मांगे दखस, त्याना देवना राज्यमा उपयोग नही.”