8
येशुनी सेवा करनाऱ्या बाया
1 त्यानंतर लगेच अस व्हयनं की येशु उपदेश करत अनं देवराज्यनी सुवार्ता सांगत गावगावसमा अनी खेडापाडासमा फिरना तवय त्यानासंगे बारा शिष्य व्हतात,
2 अनी काही बाया बी ज्या दुष्ट आत्मा अनं रोगसघाई मुक्त करेल व्हत्यात; त्यासनामा, जिनामातीन सात दुष्ट आत्मा काढेल व्हतात ती मरीया जिले मग्दालीया म्हणेत ती बी व्हती;
3 हेरोद राजाना कारभारी खुजा यानी बायको योहान्ना, सुसान्ना, अनी बऱ्याच दुसऱ्या बाया बी त्यानासंगे व्हत्यात, त्या आपली स्वतःनी कमाईमातीन येशुनी अनी त्याना शिष्यसनी सेवा करेत.
पेरणी करनाराना दृष्टांत
(मत्तय १३:१-९; मार्क ४:१-९)
4 तवय लोकसनी मोठी गर्दी जमी राहींती; अनी येगयेगळा गावतीन लोके त्यानाजोडे ई राहींतात तवय येशु दृष्टांत दिसन बोलना;
5 “एक पेरणारा माणुस दाना पेराले निंघना; अनी तो पेरी राहींता तवय काही दाना वाटवर पडनात,” त्या पायसखाल रगडाई गयात अनं पक्षीसनी खाईसन उडी गयात.
6 काही खडकाळी जमीनवर पडनात, अनी त्या ओलावा नव्हता म्हणीसन उगताच सुकाई गयात.
7 काही काटेरी झुडपसमा पडनात, काटेरी झुडप बी त्यासनासंगे वाढनात म्हणीन त्यासनी वाढ खुंटी गयी.
8 काही चांगली जमीनवर पडनात; त्या उगीन शंभरपट पीक वनं. अस बोलावर येशु जोरमा बोलना, “ज्याले ऐकाले कान शेतस, तो ऐको!”
दृष्टांत सांगानं कारण
(मत्तय १३:१०-१७; मार्क ४:१०-१२)
9 येशुना शिष्यसनी त्याले ईचारं, ह्या दृष्टांतना अर्थ काय शे,
10 त्यानी उत्तर दिधं, “देवराज्यनं रहस्य जानी लेवानं दान तुमले देयल शे” पण दुसरासले दृष्टांतसघाई सांगाई जास, यानाकरता की, “त्यासनी दखत असतांना दखाले नको अनं ऐकत असतांना समजाले नको.”
पेरणीना दृष्टांतना अर्थ
(मत्तय १३:१८-२३; मार्क ४:१३-२०)
11 हाऊ दृष्टांतना अर्थ असा; दाना हाई देवनं वचन शे.
12 वाटवर पडेल दाना ह्या शेतस की त्या ऐकतस; पण सैतान ईसन त्यासना मनमातीन वचनले काढीन लई जास कारण त्यासनी ईश्वास कराले नको अनं त्यासनं तारण व्हवाले नको.
13 खडकाळ जमीनवर पेरेल दाना ह्या शेतस की, त्या ऐकतस तवय वचन आनंदमा ग्रहण करतस; पण त्यासले मुळ नही ऱ्हास; त्या काही येळपुरता ईश्वास धरतस, अनं परिक्षाना येळले भयकी जातस.
14 काटेरी झुडपसमा पडेल दाना ह्या शेतस त्या ऐकतस; पण संसारनी चिंता, धन अनं जिवनना सुखविलासमा फसी जातस म्हणीन त्यासनी वाढ खुंटस अनं त्या पक्क फळ देतस नही.
15 चांगली जमीनवर पडेल या शेतस की ज्या वचन ऐकीन आपला शुध्द अनी चांगला मनमा त्याले धरी ठेवतस अनी टिकी राहीसन फळ देत जातस.
दिवावरतीन दृष्टांत
(मार्क ४:२१-२५)
16 कोणी दिवा लाईसन तो चंपानाखाल झाकीन ठेवतस नही किंवा खाटना खाल ठेवतस नही, तर मझार येणारासनी उजेड दखाकरता म्हणीन दिवा दिवठणीवर ठेवतस.
17 प्रकट व्हवाव नही अस काहीच गुप्त नही अनी कळाव नही अनं उघड व्हवाव नही अस काहीच झाकायल नही.
18 “यामुये तुम्हीन कसं ऐकतस, यानाबद्दल जपा; ज्यानाजोडे शे त्याले देवाई जाई, अनी ज्यानाजोडे नही त्यानं जे काही त्यानाकडे शे अस त्याले वाटस ते बी त्यानाकडतीन काढाई जाई.”
येशुनी माय अनी त्याना भाऊ
(मत्तय १२:४६-५०; मार्क ३:३१-३५)
19 येशुनी माय अनं भाऊ त्यानाकडे वनात, पण दाटीमुये त्यासले त्यानाजोडे येता ई नही राहींत.
20 तवय कोणतरी त्याले सांगं की, “तुनी माय अनं तुना भाऊ तुले भेटाकरता बाहेर उभा शेतस.”
21 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मनी माय अनी मना भाऊ तर ह्या शेतस ज्या देवनं वचन ऐकणारा अनं पाळणारा शेतस.”
येशु वादयले शांत करस
(मत्तय ८:२३-२७; मार्क ४:३५-४१)
22 एक दिन येशु आपला शिष्यससंगे नावमा बसना अनी त्यासले बोलना, “आपण समुद्रना पलीकडे जाऊत.” तवय त्या जावाकरता निंघनात.
23 नंतर त्या नाव चालावत पुढे जाई राहींतात, तवय येशु झोपी गया. मंग समुद्रमा मोठं वादय सुटनं, नावमा पाणी भराले लागनं अनी त्या मोठा संकटमा पडनात.
24 तवय त्या येशुजोडे ईसन त्याले जागं करीसन बोलनात, “प्रभु, प्रभु! आपण बुडी राहीनुत!”
तवय त्यानी ऊठीसन वाराले अनं ऊठनारा लाटासले धमकाडं; मंग त्या बंद व्हईन शांत व्हयनात.
25 तवय त्यानी त्यासले सांगं, “तुमना ईश्वास कोठे शे?”
पण त्या घाबरीन चकीत व्हईनात अनं एकमेकसले बोलनात, “हाऊ शे तरी कोण? कारण वारा अनं पाणी यासले बी हाऊ आज्ञा करस अनं त्या त्यानं ऐकतस!”
येशु दुष्ट आत्मा काढस
(मत्तय ८:२८-३४; मार्क ५:१-२०)
26 मंग येशु अनी त्याना शिष्य गालीलना समोर गरसेकरसना प्रदेशमा ई पोहचनात.
27 येशु जमीनवर उतरना तवय गावमाधला एक माणुस त्याले भेटना, त्याले दुष्ट आत्मा लागेल व्हता. बराच काळ व्हई जायेल व्हता त्यानी कपडा घालेल नव्हतात, अनी घरमा नही राहता तो कब्रस्तानमा राहे.
28 तो येशुले दखीन वरडना अनं त्यानापुढे पाया पडीन वरडीन बोलना, “हे येशु, परमप्रधान देवना पोऱ्या! मना तुना काय संबंध? मी तुले ईनंती करस, माले शिक्षा देऊ नको!”
29 कारण येशुनी त्या दुष्ट आत्माले त्या माणुस मातीन निंघानी आज्ञा करेल व्हती. त्यानी त्याले बराचदाव धरेल व्हतं, साखळ्यासघाई अनी बेड्यासघाई बांधीन त्यावर पहारा ठेवा तरी तो त्या बंधनं तोडी टाके, अनं दुष्ट आत्मा त्याले जंगलमा लई जाये.
30 येशुनी त्याले ईचारं, “तुनं नाव काय शे?”
त्यानी सांगं, “मनं नाव सैन्य शे,” कारण त्यानामा बराच दुष्ट आत्मा घुशेल व्हतात.
31 त्यासनी येशुले ईनंती करीसन सांगं की, आमले अथांग डोहामा जावाले सांगु नको.
32 तठे डुकरसना मोठा कळप डोंगरसमा चरी राहींता, “आमले त्या डुकरसमा जावु दे” अशी त्यासनी त्याले ईनंती करी. मंग येशुनी त्यासले परवानगी दिधी.
33 तवय दुष्ट आत्मा त्या माणुस मातीन निंघीन त्या डुकरसमा घुसनात, अनी तो कळप उंच कडावरतीन जाईन समुद्रमा पडना अनी गुदमरीन मरना.
34 मंग डुकरं चारनारा लोके हाई व्हयेल घटना दखीन पळनात अनी गावमा अनं आजुबाजूना वस्तीसमा जाईन त्यासनी हाई बातमी सांगी.
35 तवय जे व्हयनं ते दखाले लोके निंघनात अनी येशुकडे येवावर ज्या माणुस मातीन दुष्ट आत्मा निंघेल व्हतात तो माणुस येशुना पायजोडे बशेल, कपडा घालेल अनं शुध्दीवर येल असा त्यासनी दखा; तवय त्यासले भिती वाटनी.
36 ज्यासनी हाई दखेल व्हतं त्यासनी तो दुष्ट आत्मा लागेल कशा बरा व्हयना, हाई लोकसले सांगं.
37 तवय गरसेकरसना चारीमेरना प्रदेशमातीन सर्व लोकसनी, “तुम्हीन आमना आठेन निंघी जा” अशी येशुले ईनंती करी, कारण त्या भलताच घाबरी जायेल व्हतात. मंग तो नावमा बशीन माघारे जावाकरता निंघना.
38 तवय ज्या माणुस मातीन दुष्ट आत्मा निंघेल व्हतात, त्यानी, “माले बी तुमनासंगे लई चाला” अशी येशुकडे ईनंती करी,
पण त्यानी त्याले निरोप दिसन सांगं,
39 “तुना घर परत जाय, अनी देवनी तुनाकरता कितलं महान काम करेल शे ते सांग.”
मंग तो आपलाकरता येशुनी कितलं महान काम करेल शे ते गावभर सांगत फिरना.
याईरनी मरेल पोर अनी रक्तस्रावी बाई
(मत्तय ९:१८-२६; मार्क ५:२१-४३)
40 मंग येशु माघारे वना तवय लोकसनी गर्दीनी त्यानं स्वागत करं; त्या सर्व त्यानी वाट दखी राहींता.
41 तवय दखा याईर नावना कोणी एक माणुस वना, तो सभास्थानना अधिकारी व्हता; तो येशुना पाया पडीन, तुम्हीन मना घर या, अशी त्याले ईनंती करी,
42 कारण त्यानी बारा वरीसनी एकुलती एक पोर मराले टेकेल व्हती.
मंग येशु जाई राहिंता तवय लोकसनी त्याना आजुबाजू गर्दी व्हती.
43 तवय अशी एक बाई, जीले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता अनी तिनी आपली सर्वी कमाई बरं व्हवाकरता खर्ची टाकी तरी ती बरि व्हयेल नव्हती.
44 तिनी येशुना मांगेन ईसन त्याना कपडाना गोंडाले स्पर्श करा, अनी त्याच येळले तिना रक्तस्राव बंद व्हयना.
45 येशु बोलना, “माले कोणी स्पर्श करा?”
तवय सर्वा लोके मी नही, अस म्हणी राहींतात तवय पेत्र बोलना, “प्रभु, लोकसनी गर्दी तुमले दाटी करीसन चेंगरी ऱ्हायनी.”
46 पण येशु बोलना, “कोणी तरी माले स्पर्श कराच; मनातीन शक्ती निंघनी, हाई माले समजनं.”
47 मंग ती बाईनी दखं की, आते आपण दपु नही शकतस म्हणीन घाबरीन कापत कापत ईसन त्याना समोर पडनी, मी कोणता कारणमुये याले स्पर्श करा अनी कशी लगेच बरी व्हयनी, हाई तिनी सर्व लोकसना समोर सांगी टाकं.
48 तवय येशु तिले बोलना, “बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे, सुखरूप जाय.”
49 येशु बोलीच राहींता ईतलामा यहूदी सभास्थानना अधिकारीले त्याना घरतीन कोणी ईसन सांगं, “तुमनी पोर मरी गई, आते गुरजीले कष्ट देवु नका.”
50 ते ऐकीन येशु याईरले बोलना, भिऊ नको, “फक्त ईश्वास ठेव म्हणजे ती बरी व्हई.”
51 मंग येशु घर वना तवय पेत्र, याकोब अनं योहान पोरना मायबाप यासना शिवाय आपलासंगे कोणलेच त्यानी मझार येवु दिधं नही.
52 ती पोरकरता सर्वाजन रडी अनी शोक करी राहींतात; पण येशु बोलना, “रडु नका; कारण ती मरेल नही, झोपेल शे!”
53 ती मरी जायेल शे हाई त्यासले माहीत व्हतं म्हणीन त्यासनी त्यानी थट्टा करी.
54 मंग येशुनी तिना हात धरीन, पोर, ऊठ! अस जोरमा सांगं.
55 तवय तिना जिव परत वना, अनं ती लगेच ऊठनी, मंग तिले खावाले द्या अशी येशुनी त्यासले आज्ञा करी.
56 तवय तिना मायबाप थक्क व्हयनात, पण हाई घडेल गोष्ट कोणलेच सांगु नका, अस त्यानी त्यासले ताकिद दिसन सांगं.