18
अनैतीक संबंधना बारामा
परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले सांग की मी परमेश्वर तुम्हना देव शे. तुम्ही मिसर देशमा राहात व्हतात तठेन्या चालीरितीसना अनुकरण करानं नही; अनी ज्या कनान देशमा लयी जाई राहीनू शे, तठेन्या चालीरितीसना अनुकरण करानं नही अनी तठेन्या विधी परमानं चालानं नही. मना नियम पाळानं अनी म्हनास विधी मान्य करीसनी त्यानापरमानं वागान; मी तुम्हना देव यहोवा शे. तुम्हीन म्हना विधी अनी नियम पाळानं; त्या जो पाळी तो‍ त्यानामा जीवता राही; मी परमेश्वर शे. तुम्हना माईन कोणी आपला जोडेना नातेवाईकसना काया उघडी कराले त्यासपान जावानं नही; मी परमेश्वर शे. तु आपला वडीलनी म्हणजे आपली मायनी काया उघडी करानं नही, ती तुन्ही माय शे म्हणून तिनी काया उघडी करानं नही. आपली सावत्र मायनी काया उघडी करानं नही; ती तुन्ही वडिलनीस काया शे. आपली बहीण मंग ती सगी राही का सावत्र राहो; ती घरमा जन्म व्हयेल राहो का बाहेर जन्म व्हयेल राहो, तिनी काया उघडी करानी नही. 10 आपली नात, मंग ती पोर्‍यानी पोर राहो का पोरनी पोर राहो तिनी काया उघडी करानी नही, तिनी काया ती तुनीस शे. 11 वडीलले व्हयेल वडीलनी व्हयेल पोर ती तुनी बहीण शे म्हणून तिनी काया उघडी करानी नही. 12 आपली आत्यानी काया उघडी करानी नही. ती तुनी वडीलनी बहीण शे. 13 आपली मावशीनी काया उघडी करानी नही; कारण ती तूनी मायनी बहीण शे. 14 आपला चुलतानी काया उघडी करानी नही म्हणजे त्यानी बायकोनीसंगे संभोग करानं नही; ती तुनी चुलती शे. 15 आपली सुननी काया उघडी करानी नही; ति तुनी पोर्‍यानी बायको शे;‍ म्हणून तिनी काया उघडी करानी नही. 16 आपली भावजायनी काया उघडी करानी नही; ती तुनी भाऊनी काया शे. 17 एकादी बायनी अनी तिनी पोरनी दोन्हीसनी काया उघडी करानी नही; तिनी नात मंग ती तिना पोर्‍यानी पोर राहो नाहिते पोरनी पोर राहो, तिले आपली बायको करिसनी तिनी काया उघडी करानी नही; त्या जोडेना नाता शेत. आशे करानं म्हणजे मोठ पाप शे. 18 तु तुनी बायकोनी बहीणले आपली बायको करिसनी तिले सवत करानं नही; ती जीवत राहीसनी तिनी बहीणनी काया उघडी करानं नही. 19 बाय ऋतुमती व्हावानंतर ती अशुध्दस राहास तोपावत तिनी काया उघडी कराकरता तिना जोडे जावानं नही. 20 तु आपली शेजारनी बाईनीसंगे कुकर्म करिसनी अशुध्द व्हवानं नही. 21 आपला संतानमाईन एकादानं मोलख देवना करता आगनं होम करानं नही; तुना देव यहोवा याना पवित्र नावले कलंक लावानं नही; मी परमेश्वर शे. 22 स्रीसंभोगपरमानं पूरुषसंभोग करानं नही, ते अमंगळ काम शे. 23 कोणतेभी जनावरनीसंगे संभोग करिसनी अशुध्द व्हवानं नही; बाईनी जनावरनीसंगे कुकर्म कराले त्यानामोरे उभं राहावानं नही; हाई विपरीत कर्म शे. 24 आशापरकारनं कोणतेभी कर्म करीसनी भ्रष्ट व्हवानं नही; कारण ज्या देशले मी तुम्हनामोरेतीन घालाडानार शे त्या आशा बठा कर्म करीसनी भ्रष्ट व्हयेल शेतस. 25 त्यासना देश भ्रष्ट व्हयेल शे, त्यासनं दुष्टतामुळे मी त्यासना समाचार लि राहीनू शे अनी तो देश आपला रहिवाशासले वकी टाकेल शे. 26 हयानाकरता तुम्ही मना विधी अनी नियम पाळानं अनी स्वदेश अनी तुमनामासला विदेशी उपरी यासनामाईन कोणी भी आशे अमंगळ काम करानं नही. 27 कारण तुम्हना आगोदर हाई देश राहाणारा लोकेसनी आशे बठा अमंगळ कर्म करामुळे हाई देश अशुध्द व्हयेल शे. 28 तुमना आगोदर ज्या लोक हाई देशमा राहात व्हतात त्यासले जशे हाई देशनी वकी टाकं, तशे तुम्ही देश अशुध्द करं तुम्हलेभी वकी टाकाले नही पाहिजे; 29 ज्या कोणी आशे अमंगळ कर्म करतीन त्या बठासना त्यासना लोकेसनामोरे नाश व्हयी. 30 हाई ज्या आज्ञा मी तुम्हले देयेल शे त्या तुम्ही पाळानी; तुमनआगोदर प्रचलित राहेल अमंगळ रिवाजपरमानं तुम्ही चालानं नही अनी त्यानामुळे अशुध्द व्हवानं नही; मी परमेश्वर तुमना देव शे.