20
आज्ञा मोडामुये व्हणारी शिक्षा
परमेश्वर मोशेले बोलना इस्राएल लोकेसले आजुन आशे सांग; इस्राएल लोकेसमाईन नाहिते इस्राएल लोकेसमा राहानारा उपर्‍यासमाईन कोणी आपला अपत्य मोलखा अर्पण करं त्याले मारी टाकानं; देशना लोकेसनी त्याले दगडमार करानं मी त्याना विरोधी व्हयीसनी त्याना स्वजनासनमोरे नाश करसु; कारण त्यानी अपत्य मोलख देवताले देईसनी मना पवित्रस्थानले अशुध्द करेल शे अनी मना पवित्र नावले कलंक लायेल शे. मोलख देवताले आपला अपत्य अर्पण करनाराकडे देशमासला लोकेसनी कानाडोळा करीसनी त्याले मारी टाकानं. तर मी त्या माणुसले अनी त्याना कूटुंबले विरोधी व्हयीसनी त्याना अनी जो कोणी त्यानासारखा व्यभिचार मनतीन मोलख देवताले धरतीन, त्या बठासना नाश करी टाकसु. जो माणुस व्यभिचार मनतीन पंचाक्षरी अनी चेटका यासना मांगे लागी त्याले विरोध व्हयीसनी त्याना नाशे करी टाकसु. म्हणुत तुम्ही स्वताले पवित्र करिसनी पवित्र राहावानं; कारण मी परमेश्वर तुमना देव शे. तुम्ही मना विधी मान्य करिसनी पाळानं; तुम्हले पवित्र करनारा मीच परमेश्वर शे. आपला बापले अनी मायले जो शिव्याशाप देस त्यासले नक्की मारी टाकानं; जो आपला बापले अनी मायले शिव्याशाप देई त्याना रंगत त्याना माथाले लागी. 10 कोणी एकादी बाईनीसंगे संभोग करी तर आपला शेजारनी बाईनीसंगे व्यभिचार करणारा तो जार अनी ती जारनी या दोन्हीसले नक्की मारी टाकानं. 11 जो आपला बापनी बाईनीसंगे झोपना तर तो आपली बापनी काया उघडी करसं त्या दोन्हीसले नक्की मारी टाकानं; त्यासना रंगत त्यासना माथाले लागी. 12 कोनी आपली सुननीसंगे झोपना तर त्या दोन्हीसले नक्की मारी टाकानं; त्यासना कर्म विपरित शे; त्यासना रंगत त्यासनास माथाले राही. 13 कोनी स्री-स्रीसंगेझोपी किवा पुरुषप-पुरुषसंगेझोपी तर त्या दोन्हीसना हाई अमंगळ कर्म शे. त्यासले नक्की मारी टाकानं. त्यासना रंगत त्यासनास माथाले राही. 14 एकादी बाई अनी तिनी माय या दोन्हीसले कोणी ठेवं तर ते महापाप शे; तो माणुस अनी त्या दोन्ही बाया यासले आगमा जाळी टाकानं; तुम्हनामं आशे दुष्कर्म राहावाले नही पाहिजे. 15 एकादा माणुसनी एकाद जनावरनीसंगे झोपना तर त्याले मारी टाकानं; अनी ते जनावरलेबी मारी टाकानं 16 एकादी बाई कुकर्म कराले एकादा जनावरकडे गयी तर तिले अनी जनावरले मारी टाकानं; त्यासना रंगत त्यासनास माथाले राही. 17 कोणी आपली बहीणले, मंग ती त्यानी बापनी पोर असो नाहिते त्यानी मायनी पोर असो, आपली बायको करिसनी तो तिनी काया दखी अनी ती त्यानी काया दखी तर हाई वाईट परकार शे; त्या दोन्हीसले त्यासना भाऊबंदसनादेखत नाश करानं; त्यानी आपली बहीणनी काया उघडी करी आशे व्हयी; त्यानी आपला दुष्कर्मना भार वाहावाले पाहिजे. 18 जर एकादी बाईले मासिक पाळी व्हयी अनी तिनासंगे कोणी झोपना अनी तिनी काया उघडी करी तर त्यानी तिना रंगतना झरा उघडं कर आशे व्हयी, त्या दोन्हीसना भाऊबंदसनादेखत नाश करानं. 19 आपली मावशी नाहिते आत्या यासनी काया उघडी करानी नही जो तशे करी त्यानी जोडेना नातेवाईकासकडे काया उघडी करेल शे आशे व्हयी, त्यानी आपला दुष्कर्मना भार वाहावाले पाहिजे. 20 कोणी आपली काकूनीसंगे झोपना तर त्यानी आपला काकानी काया उघडी करेल शे आशे व्हयी, त्या आपला पापना भार वाहीसनी बिना अपत्यसना मरतीन. 21 कोणी आपली भावजायले ठेई तर ती भ्रष्टता शे; तशे करीसनी आपला भाऊनी काया उघडी करेल शे आशे व्हयी; त्या बिना पोऱ्यासोऱ्यासना राहातीन 22 हयानाकरता तुम्ही मना बठा विधी अनी मना बठा नियम मान्य करीसनी पाळानं म्हणजे ज्या देशमा तुम्हले लयी जाई राहीनु शे तो तुम्हले वकनार नही. 23 ज्या देशले मी तुम्हनामोरेतीन घालाडनार शे त्यासना चालीरितीसना अनुकरण करानं नही; त्यासनी आशे भ्रष्टाचार करं म्हणीन माले त्यासना तिटकारा व्हनं 24 पण मी तुम्हले सांगेल शे की त्यासना देश तुम्हना वतन व्हयी, मी ते तुम्हले सोपासुं जठे दुधमधना प्रवाह वाही राहीना शेतस आशा देश तुम्हना ताब्यामां दिसु; तुम्हले इतर राष्ट्रासमाईन येगळा करणारा मी परमेश्वर तुम्हना देव शे. 25 याकरता तुम्ही शुध्द अनी अशुध्द चिडा यामासला भेद पाळानं अनी जो कोणताबी जनावर,चिडा नाहिते जमिनवर रांगणारा जनावर मी तुम्हनाकरता अशुध्द ठराईसनी निषेधेल शे. त्यानद्वारे तुम्ही स्वताले अमंगळ करानं नही. 26 तुम्ही मनाकरता पवित्र व्हवानं; कारण मी परमेश्वर पवित्र शे; तुम्ही मनावाला राहावाले पाहिजे म्हणुन मी तुम्हले इतर देशमाईन येगळं करेल शे. 27 कोणी करनीकवटाळ वाला व्हयी, मंग तो माणुस राहो की बाई राहो त्यासले नक्की मारी टाकानं, त्यासले दगडमार करानं; त्यासना रंगतपात त्यासना माथाले राहि.