पेत्राने लिहिलेले पहिले पत्र
पेत्रनी लिखेल पहिलं पत्र
वळख
१ पेत्र, हाई पुस्तक प्रेषित पेत्र यानी लिखेल व्हतं. पेत्रनी हाई सांगीसन आपला पत्रनी सुरवात करी की, तो कोण शे अनी कोणाकरता लिखी राहीना. त्यानी गैरयहूदी म्हणेल सर्व ख्रिस्ती लोकसले पत्र धाडीसन सुचना कऱ्यात. १:१; १:१७ अनी २:११ त्यानी आपला वाचकसले असा बराचदाव संदर्भ दिधा, कारण त्या येगयेगळा दिशामा पसरेल व्हतात. कारण हाई पत्र थोडफार इफिसकरसले पौलनी लिखेल पत्रसनामायक शे. बराच लोकसना असा ईश्वास शे की, १ पेत्र हाई पुस्तक ख्रिस्तना जन्मनंतर जवळपास ६५ वरीस नंतर इफिसना लोकसले लिखामा वनं. पेत्रनी रोमले पत्र लिखं त्याले तो बाबेल म्हणे. ५:१३
पेत्र सांगस की, त्यानी तुमले प्रोत्साहन देणारं अनी हाईच देवनं खरं तारण शे हाई सिध्द कराकरता हाई पत्र लिखेल शे. ५:१२१ पेत्र २:११; ३:७; अनं इफिस ५:१८–६:९; कलस्सै ३:१८; ४:६; यासनामा बरीच समानता शे. या सर्व तीन भागसमा कौटुंबिक नातेसंबध अनी अधिकाऱ्यासनी आज्ञा पाळानी सुचना देवानी अस तो सांगस. तो ईश्वासनारासले दुःखना काळमा त्यासले प्रोत्साहन दिधं की शेवटना काळ जवळ येल शे. ४:१
रूपरेषा
१. पेत्र स्वतःनी वळखं करी देस, अनी त्याना वाचणारासले संबोधित करस. १:१-२
२. मंग तो देवना तारणकरता आभार मानस अनी त्याना त्यासना जिवनकरता काय अर्थ शे, हाई सर्वासले सांगस. १:३–२:१०
३. पुढे तो ईश्वास ठेवस की, जगमा चांगलं कसं ऱ्हावानं अनी नवरा अनं बायको अनी दास अनं मालक यासना येगयेगळा संबधले संबधीत करस. ४:१२–५:११
४. नंतर जवय पीडीत लोकेसले त्रास देवामा वना, तवय त्यासले धीर दिसन प्रोत्साहन करस. ४:१२–५:११
५. त्यानानंतर त्यानी आपला पत्रनी समाप्ती करी. ५:१२-१४
1
येशु ख्रिस्तना प्रेषित पेत्र याना कडतीन; देवबापनी निवडेल पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया अनं बिथुनिया या गावसमा पांगेल यहूदी लोकेसमा राहणारा, देवपिताना पुर्वज्ञानतीन, आत्मानाद्वारा व्हयेल पवित्रतामा टिकीन ऱ्हावाकरता अनं त्यावर येशु ख्रिस्तना रक्तनं सिंचन व्हवाकरता निवाडेल प्रवाशी, यासले तुमले कृपा अनी शांती भरभरीन मिळो.
जिवननी आशा
आमना प्रभु येशु ख्रिस्तना देव अनी पिताना गौरव व्हवो, ज्यानी येशु ख्रिस्तले मरेलस मातीन जिवत करीसन अनी आपली मोठी दयातीन आमले जिवत आशाकरता नवा जन्म दिधा. की, तो वारसा प्राप्त कराले पाहिजे जो अविनाशी, निष्कलंक अनी निर्मळ शे अनी तुमनाकरता स्वर्गमा ठेयल शे. तुमनी रक्षा परमेश्वरना सामर्थ्यना द्वारा ईश्वासतीन त्या तारणकरता कराई जास, जे शेवटना काळले प्रकट व्हनार शे. तुम्हीन तारणबद्दल आते आनंद करतस जरी थोडा येळपावत, बराच परिक्षासमा पडीन तुम्हीन दुःख भोगात. तुम्हीन यानाकरता भोगं की, तुमना ईश्वास खरा शे हाई पारखाई जावं, जश नाशवंत सोनं पारखाई जास त्या सोनापेक्षा तुमना ईश्वास मुल्यवान शे यामुये तो बी पारखाई जाईन तो शुध्द असा निंघो ज्यामुये प्रशंसा, गौरव अनं मान ह्या फळं येशु ख्रिस्तना प्रकट व्हवाणा येळेले तुमले मिळतीन. त्याले तुम्हीन दखं नही तरी तुम्हीन त्यानावर प्रेम करतस; आते तो दखास नही, तरी त्यानावर ईश्वास ठेवतस; म्हणजे तुम्हीन गौरवतीन मोठा आनंद करतस जो शब्दसमा नही सांगता येस. अनी त्यानामा तुमनं ईश्वास कराना उद्देश म्हणजे तुमले तुमना जिवनं तारण मिळेल शे, 10 ज्या संदेष्टासनी तुमनावर होणारी कृपाबद्दल भविष्य करं, त्यासनी त्या तारणबद्दल बारकाईतीन शोध करा; 11 त्या भविष्यवक्तासनी ख्रिस्तवर येणारा दुःखनी येळ अनी तो गौरव जो या दुःखनंतर प्रकट व्हई याना शोध ख्रिस्तना आत्माघाई करा जो त्यासनामा व्हता. 12 त्यासले अस प्रकट करामा येल व्हतं की स्वर्गामातीन धाडेल पवित्र आत्माघाई तुमले सुवार्ता सांगणारासनी ज्या गोष्टी तुमले आते सांगेल शेतस त्याच गोष्टी सांगानी सेवा त्या करी राहींतात; ती सेवा स्वतःकरता नही, तर तुमनाकरता करी राहींतात; या गोष्टी लक्ष लाईन दखानी तीव्र ईच्छा देवदूतसले शे.
पवित्र जिवन जगाकरता बलवणं
13 यामुये तुमनं मन कृतीकरता तयार करा, अनी सावध राहिन येशु ख्रिस्तनं प्रकटीकरण व्हवाना येळले तुमले मिळणारी कृपावर पुर्ण आशा ठेवा. 14 तुम्हीन आज्ञाधारक पोऱ्या व्हा अनी अज्ञान व्यवस्थामातील आपला पूर्वीना वासनाना मायक वागु नका; 15 तर ज्यानी तुमले पाचारण करं तो जशा पवित्र शे तस तुम्हीन पण सर्व प्रकारनी वागणुकमा पवित्र रहा. 16 कारण, “मी पवित्र शे यामुये तुम्हीन पवित्र व्हा” असा शास्त्रलेख शे. 17 जो तोंड नही दखता प्रत्येकना कामप्रमाणे त्याना न्याय करस, त्याले जर तुम्हीन पिता म्हणीन हाक मारतस, जवय तुम्हीन प्रार्थना करतस तर आपला प्रवासना काळमा घाबरीन वागा. 18 तुमना पुर्वजसंना परंपरातीन चालत येल आपला व्यर्थ वागणुकपाईन सोनं, रूपं असा नाश होणारा वस्तुसपाईन नही, 19 तर निष्कलंक अनं निर्दोष कोकरा, असा जो ख्रिस्त, त्याना मुल्यवान रक्तघाई तुम्हीन मुक्त व्हयेल शेतस ह्या ध्यानमा ठेवा, 20 जगनी स्थापना व्हवाना पहिले त्याले देवनी निवडेल व्हतं अनी तोच काळना शेवट तुमनाकरता प्रकट व्हयना. 21 तुम्हीन त्यानाघाई देववर ईश्वास ठेवणारा व्हयेल शेतस; त्या देवनीच त्याले मृतअवस्थामातीन ऊठाडीन त्यानं गौरव करं, यामुये तुमना ईश्वास अनं आशा देववर शे. 22 सत्यनं पालन करत खरं बंधुप्रेम दखाडाकरता तुम्हीन आपला आत्माले शुध्द करी लेयल शे, म्हणीन आते एकमेकसवर मनपाईन प्रेम करा. 23 कारण तुम्हीन नाश व्हणारा बीयापाईन नही, तर अविनाशी बीयापाईन म्हणजे देवना कायम जिवत राहणारं अनं टिकणारं वचनघाई परत जन्म लियेल शे. 24 *कारण, सर्व मानवजात गवतसारखी शे; अनी तिनं सर्व गौरव गवतना फुलमायक शे. गवत सुकस अनं त्यानं फुल गळस; 25 पण प्रभुनं वचन सर्वकाळ टिकस. जी सुवार्ता तुमले घोषीत करेल व्हती ती सुवार्ता म्हणजे हाईच ते वचन.
* 1:24 या वचनबद्दल यशया 40:6 मा लिखेल शे