2
जिवत दगड अनी पवित्र राष्ट्र
1 यामुये सर्व दुष्टभावना, सर्व कपट, ढोंग, हेवा अनं सर्व वाईट भाषण सोडी द्या,
2 नविन जन्मेल पोऱ्यासना मायक, कायम शुध्द आध्यात्मिक दुधबद्दल तहान लागेल असा रहा म्हणजे तुम्हीन वाढशात अनं तुमनं तारण व्हई.
3 “प्रभु कृपाळु शे याना तुम्हीन अनुभव लेयल शे” अस शास्त्रलेख म्हणस.
4 माणससनी नाकारेल तरी देवना दृष्टीतीन निवडेल अनं मुल्यवान असा जो जिवत दगड त्यानाजोडे येवामुये,
5 तुम्हीन बी अध्यात्मिक मंदिर, जिवत दगड, देवले आवडणारा असा आध्यात्मिक स्वरूपना यज्ञ येशुख्रिस्तघाई अर्पण कराकरता पवित्र याजकगण असा रचाई जाई राहिनात.
6 कारण असा शास्त्रलेख शे; “दखा, निवडेल, मूल्यवान अशी कोनशीला मी सियोनमा बसाडस; तिनावर ईश्वास ठेवणारा कवय बी फजित व्हवाऊ नही.”
7 यामुये तुमले ईश्वास ठेवणारासले मान भेटी; ज्या ईश्वासले अमान्य शेतस त्यासले, “बांधणारासनी नापसंत करेल दगड तोच मुख्य कोणशीला व्हयना.”
8 “अनी ठेच लागणारा दगड अनं आडफाटा व्हवाणा खडक असा व्हयना; त्या लोके वचनले नही मानतस म्हणीन ठेच खातस,” त्यानाकरता त्यासले नेमेल पण व्हतं.
9 तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे.
10 त्या तुम्हीन पहिले लोक नव्हतात, आते तर देवना लोक शेतस; तुमले दया मिळेल नव्हती, आते तर दया मिळेल शे.
11 प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, ज्या तुम्हीन परका अनं अनोळखी शेतस त्या तुमले मी ईनंती करस की, जिवसंगे लढाई करनारा शारिरीक वासनांपाईन दुर रहा;
12 गैरयहूदी लोकसमा आपली वागणुक चांगली ठेवा, यानाकरता की, ज्यानाबद्दल त्या तुमले वाईट कामं करनारा समजीन तुमना विरूध्द वाईट बोलतस त्याबद्दल त्यासनी तुमना चांगला कामे दखीन बातमीना दिनले देवनं गौरव कराले पाहिजे.
देवना सेवक
13 मनुष्यनी स्थापन करेल प्रत्येक व्यवस्थाले प्रभुकरता अधीन ऱ्हावा; राजा श्रेष्ठ शे म्हणीन त्याना अधीन ऱ्हावा;
14 अनी अधिकारी वाईट करनारासले शिक्षा देवाकरता अनं चांगलं करनारासनी स्तुती कराकरता देवनी धाडेल शे, म्हणीसन त्यासना अधीन रहा.
15 देवनी ईच्छा अशी शे की, तुम्हीन चांगलं करशात त्याघाई निर्बुध्द माणससना अज्ञानले कोंडी ठेवानं.
16 आपला स्वतंत्रपणा हाई दुष्टपणानं झाकीन नही ठेवता तुम्हीन स्वतंत्र, तरी देवना दास, अस रहा.
17 सर्वासले मान द्या, ईश्वासु लोकसवर प्रेम करा, देवना भय धरा. राजाले मान द्या.
ख्रिस्तनं दुःखनं उदाहरण
18 घरना नोकरसवन, तुम्हीन आपला मालकना अधीन रहा; ज्या चांगला अनं नम्र फक्त त्यासनाच नही, तर ज्या कठोर त्यासले बी पुरं घाबरीन रहा.
19 कोणी देवनं नाव लिसन अन्यायतीन येल दुःखं सहन करतस तर हाऊ प्रशंसा करासारखं शे.
20 चुकीनं करामुये मिळेल बुक्क्या शांततातीन सहन करात त्यामा काय मोठी किर्ती? चांगलं करी राहिनात तरी दुःख भोगणं अनं ते शांतीतिन सहन करनं हाई देवले योग्य अस वाटी.
21 यानाकरताच तुमले पाचारण करेल शे; तुम्हीन त्याना पायासनं अनुकरण कराले पाहिजे म्हणीन ख्रिस्तनी दुःख सहन करीसन तुमनाकरता कित्ता घाली ठेल शे;
22 त्यानी पाप करं नही, अनी त्याना चेहरावर कपट दिसनं नही;
23 त्यानी निंदा व्हई राहिंती तवय त्यानी उलट निंदा करी नही; दुःख सहन करी राहिंता तवय त्यानी धमकी दिधी नही; तर सर्व न्याय करनारा परमेश्वरवर आपली आशा ठेवा.
24 तो स्वतः तुमना आमना पापं स्वतःना शरिरवर वाहिन क्रुसखांबवर लई गया, यानाकरता की आपण पाप बद्दल मृत व्हईन न्यायीपणकरता जिवत ऱ्हावानं; त्याले बशेल मारना फटकामुये तुम्हीन निरोगी व्हयेल शेतस.
25 तुम्हीन मेंढरसनामायक भटकी राहींतात; पण आते तुमना जिवना मेंढपाळ अनं राखणारा यानाकडे मागे फिरेल शेतस.