4
बदलेल जिवन
1 ख्रिस्तनी शरिरना रूपमा दुःख सहन करात तसच तुम्हीन बी त्याच मनोवृत्तीतीन भक्कम व्हा; कारण ज्यानी शरिरना रूपमा सहन करेल शे तो पापपाईन निवृत्त व्हयेल शे.
2 यानाकरता की तुम्हीन उरेल शारिरीक जिवन मनुष्यना वासनांप्रमाणे नही तर देवना ईच्छाप्रमाणे जगानं.
3 कारण गैरयहूदीसनी ईच्छातीन काम करनं अनी असभ्यता, वासनासनी अभिलाषा, रंगेलपणा, दारूड्या अनं अमंगळ मुर्तिपुजा यामा ऱ्हावामा जो काळ गया तितला पुरा शे;
4 तुम्हीन त्यासना ह्या जंगलीपणमा सहभागी व्हतस नही यानं त्यासले नवल वाटस अनी त्या तुमनी निंदा करतस.
5 जो जिवतसना अनी मरेलसना न्यायनिवाडा कराले तयार शे त्या देवले त्या हिशोब देतीन.
6 सुवार्ता मरेलसले बी सांगेल व्हती, यानंकरता की, मनुष्यनमायक त्यासना शरिरसंबंधतीन न्यायनीवाडा व्हवाले पाहिजे, पण त्यासनी आत्माप्रमाणे देवसंगे जगाले पाहिजे.
देवना दानसना चांगला कारभारी
7 आते सर्वासना शेवट येल शे; यामुये मर्यादामा रहा, अनं प्रार्थना कराकरता तयार रहा;
8 एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.
9 कुरकुर नही करता एकमेकसना पाहुणचार करा;
10 प्रत्येकले जसं कृपादान मिळेल शे तसं देवना येगयेगळ्या दानसना चांगला कारभारीनामायक ते एकमेकसनं चांगलं कराकरता वापरा.
11 भाषण देणारासनी आपण देवनं वचन सांगी राहिनुत अस बोलानं; सेवा करनारासनी, ती आपण देवनी पुरायेल शक्तीतीन करी राहिनुत, अशी करानी; यानाकरता सर्व गोष्टीसमा येशु ख्रिस्तद्वारा देवनं गौरव व्हवाले पाहिजे; गौरव अनं पराक्रम हाई युगानुयुग त्यानीच शेतस. आमेन.
ख्रिस्तकरता दुःख सहन कराना हक्क
12 प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, तुमना अग्नीपरिक्षाकरता संकट तुमनावर येल शे त्यानावरतीन आपलासंगे काही येगळं घडनं तर त्यानं नवल वाटू देऊ नका;
13 जसं जसं तुम्हीन ख्रिस्तना दुःखना वाटेकरी व्हयेल शेतस तवय आनंद करा; म्हणजे त्यानं गौरव प्रकट व्हवाना येळले तुम्हीन उल्लासतीन आनंद करशात.
14 ख्रिस्तना नावमुये तुमनी निंदा व्हवामुये तुम्हीन धन्य शेतस; कारण गौरवना आत्मा म्हणजे देवना आत्मा तुमनावर ई राहिना शे.
15 तरी खुण करनारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसरासना कामसमा ढवळाढवळ करनारा अस व्हईन दुःख भोगाले नको.
16 ख्रिस्ती म्हणीन कोणी दुःख सहन करस तर त्यानी लाजानं नही; त्या नावमुये देवनं गौरव करानं.
17 देवना घरपाईन न्यायनिवाडानी सुरवात करानी येळ शे; अनी ती सुरवात पहिले आपलापाईन व्हयनी, तर देवना सुवार्ताना अपमान करनारासना परिणाम काय व्हई?
18 पवित्रशास्त्र हाई सांगस, “नितीमान माणुस जर कष्टतीन वाचस तर अनितीमान अनं पापी माणुसनं काय व्हई?”
19 यामुयेच देवना ईच्छाप्रमाणे दुःख सहन करनारासनी चांगली कृती करत, आपण स्वतःले ईश्वासु उत्पन्नकर्ताले सोपी देवाना.