13
अधिकारीसना आज्ञा पाळाबद्दल सुचना
1 प्रत्येक जणसनी आपला वरिष्ठ अधिकारसना अधीन रावानं; कारण देवनी नेमाशिवाय अधिकार स्थापित व्हस नही अनं ज्या अधिकार शेतस त्या देवनी नेमेल शेतस.
2 म्हणीन जो अधिकारले आड येस; तो देवना व्यवस्थेतमा विरोध करस; अनी विरोध करनारा आपलावर दंड ओढाई लेतीन.
3 कारण चांगला काममा अधिकारीसनी भिती ऱ्हास नही, तर वाईट काममा ऱ्हास, मंग तुले अधिकारीसनी भिती वाटाले नको म्हणीन तुनी अस ईच्छा व्हई तर चांगलं ते कर, म्हणजे तुले त्यासनाकडीन तुनी प्रशंसा व्हई.
4 कारण तुना हितकरता तो देवना सेवक शे, पण तु जर वाईट करशी तर त्यानी भिती धर; कारण तो तलवार विनाकारण धरस नही; तर क्रोध दखाडाकरता वाईट करनारासना सूड लेनारा असा तो देवना सेवक शे.
5 म्हणीन तुम्हीन फक्त देवना क्रोधकरता नही, तर आपला विवेकबुध्दीकरता बी अधीन रावानं अगत्यानं शे.
6 ह्या कारणास्तव तुम्हीन कर बी देतस; कारण अधिकारी देवनं सेवा करनारा शेतस अनं त्या ह्या सेवामा तत्पर शेतस.
7 म्हणीन सर्वासले त्यासनं देणं द्या; ज्याले कर देवानं त्याले ते द्या; ज्याले जकात देवानं शे त्याले ते द्या; ज्याना आदर धराले पहिजे त्याना आदर धरा अनं ज्याना सन्मान कराना शे त्याना सन्मान करा.
एकमेकसवरनी प्रिती
8 तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, ह्याशिवाय कोणाच देणेकरी राहु नका; कारण जो दुसरासवर प्रिती करस त्यानी नियमशास्त्र पुर्ण पाळेल शे.
9 कारण, “व्यभिचार करू नको, हत्या करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको, अनी अस दुसरी कोणती बी आज्ञा व्हई तर ‘तु जशी आपलावर तशीच आपला शेजाररीसवर प्रिती कर,” हाई एकच वचनमा ती भरेल शे.
10 प्रिती आपला शेजारीसना काही वाईट करस नही; म्हणीन प्रिती हाई नियमशास्त्रनी पुरीपुर्णता शे.
11 अनी आते समय वळखीसन हाई करा, कारण तुमनी आते झोपमाईन ऊठानी येळ येल शे; कारण आपण ईश्वास ठेवात त्यानापेक्षा तारण आते आपले जोडे येल शे.
12 रात सरामा ईसन अनी दिन जोडे येल शे; म्हणीन आपण अंधारमधला काम टाकीसन उजेडमधला शस्त्रसामग्री धारण करानं.
13 दिनले शोभी अस चालानं. चैनबाजीमा, अनैतीकतामा अनं कामचुकारपणमा, कलहमा अनं मत्सरमा रावानं नही;
14 तर तुम्हीन प्रभु येशु ख्रिस्तले परिधान करा, अनी शरिरवासना तृप्त कराकरता तरतुद करानं नही.