14
एकमेकसना न्याय करानं नही
1 जो ईश्वासमा अशक्त शे त्याना स्विकार करा, पण त्याना व्यक्तीगत ईचारबद्दल वाद करानं नही.
2 एखादानं ईश्वास अस ऱ्हास की, त्याले कसं बी खावानं चालस; पण जो अशक्त शे तो भाजीपालाच खास.
3 जो खासपेस त्यानी न खाणाराले तुच्छ लेखानं नही; अनी जो खासपेस नही त्यानी खाणाराले दोष देवानं नही; कारण देवनी त्याना स्विकार करेल शे.
4 दुसराना चाकरले दोष लावणारा तु कोण शे? तो स्थिर राहिना काय किंवा पडना काय, तो त्याना धनीना प्रश्न शे. त्याले तर स्थिर करामा ई; कारण त्याले स्थिर कराले त्याना धनी समर्थ शे.
5 कोणी माणूस एखादा दिन दुसरा दिनपेक्षा जास्त मानत. दुसरा कोणी सर्वा दिन मायकच मानस. तर प्रत्येक माणूसनी आपला मननी पुर्ण खात्री करी लेवाले पाहिजे.
6 जो कोणी एखादा दिन पाळस, तो प्रभुकरता पाळस, अनी खास तो प्रभुकरता खास, कारण तो देवनं आभार मानस; जो काही खास नही, तो प्रभुकरता खास नही, अनी तो पण देवनं आभार मानस.
7 कारण आपलामधला कोणीच स्वतःकरता जगस नही अनं कोणीच स्वतःकरता मरस नही.
8 कारण जर आपण जगतस तर प्रभुनाकरता जगतस, अनी जर आपण मरतस तर प्रभुनाकरता मरतस; म्हणीन आपण जगनुत किंवा मरनुत तरी आपण प्रभुनाच शेतस;
9 कारण ख्रिस्त यानाकरता मरण पावना अनं परत जिवत व्हयना की, त्यानी मरेलसना अनं जिवतसना बी प्रभु ऱ्हावाले पाहिजे.
10 तर मंग तु आपला बंधुले का दोष लावस? किंवा तु आपला बंधुले तुच्छ का मानस? कारण आपण सगळा जणसले देवना न्यायासनासमोर उभं राहनं शे.
11 कारण शास्त्रमा अस लिखेल शे की, “प्रभु अस सांगस, ज्याप्रमाणे मी जिवत शे, त्याप्रमाणे मनापुढं प्रत्येकजण गुडघा टेकतीन, अनं प्रत्येक जिभ देवनं स्तुती करी.”
12 तर मंग आपलामधला प्रत्येकजन आपलाबद्दल देवले हिशोब दी.
आपला बंधुना अशक्त व्हवान कारण बनानं नही
13 तर आपण यानापुढं एकमेकसना न्याय कराना नही. तर अस ठरावानं की, आपला बंधुना मार्गमा अडखळण किंवा ठेच लागीन पडानं कारण व्हई अस काही ठेवानं नही.
14 माले हाई ठाऊक शे अनी प्रभु येशुमा एक व्हवाव कारण मनी पक्की खात्री शे की, जेवण मुळपाईन अशुध्द नही, पण जो कोणी जेवण अशुध्द समजस त्याले ते अशुध्द शे.
15 पण जर तुना भाऊ अनं बहिण, तुना अन्नमुये दुःखी व्हत व्हई तर तु प्रितीमा वागानं सोडी देयल शे, अस दखास. ज्यानासाठे ख्रिस्त मरणा त्यानं नाश तु आपला अन्नघाई करू नको.
16 म्हणीन तुमले जे उत्तम लाभनं शे, त्यानी निंदा व्हवु देवानं नही.
17 कारण खावानं किंवा पेवानं यामा देवनं राज्य नही; तर न्यायीपण, शांती अनं पवित्र आत्मानंद्वारा भेटनारा आनंद यामा ते शे.
18 कारण जो ह्याप्रमाने ख्रिस्तनी सेवा करस, तो देवले संतोष देणारा अनं मानसंसनी पसंत करेल असा शे.
19 तर आपण ज्या गोष्टी शांतीकरता अनं एकमेकसना बुध्दीले उपयोगी शेतस, त्या गोष्टीसना मांगे आपण लागानं.
20 अन्नकरता तु देवनं काम नष्ट करू नको, सर्वा गोष्टी शुध्द शेतस; पण जो मनुष्य दुसराले अडखळण करीसन खास त्याले ते वाईट शे.
21 मास न खावानं किंवा द्राक्षरस न पेवानं किंवा ज्यानामुये तुना भाऊले अनं बहिणले अडखळण व्हस, अस काही बी न करानं हाई चांगलं शे.
22 तुनाठायी जो ईश्वास शे, तो तु देवना समोर आपला मनमा राहु दे. जो स्वतःना पसंत करेल गोष्टीसमा स्वतःले दोष लावस नही तो धन्य शे.
23 पण जो मनुष्य संशय धरीसन खास, तर तो दोषी ठरस, कारण त्यानं खावानं ईश्वासमा ऱ्हास नही. कारण जे काही ईश्वासमा व्हयेल नही ते पाप शे.