5
देवनासंगे समेट
1 तर आते, आपन ईश्वासतीन देवसमोर न्यायी ठरी जायेल शेतस, म्हणीन आपला प्रभु येशु खिस्त यानाद्वारा आपन देवनासोबत शांतीमा शेतस.
2 आपन जिवन जगी राहिनुत त्या कृपामा बी त्यानाद्वारा ईश्वासतीन आपलाले प्रवेश भेटेल शे अनं आपण देवना गौरवना आशामा अभिमान मिरावतस.
3 अनी इतलंच नही, तर आपन संकटमा बी अभिमान मिरावतस; कारण आपन जाणतस की, संकट धीर उत्पन्न करस.
4 अनी धीर प्रचिति अनं प्रचिति आशा उत्पन्न करस.
5 अनी हाई आशा लज्जित करस नही; कारण आपला अंतःकरणमा आपलाले देयल पवित्र आत्मानाद्वारा देवनी प्रितीना वर्षाव व्हयेल शे.
6 कारण आपन दुर्बळ व्हतुत त्याच येळले ख्रिस्त पापी लोकसंनाकरता मरना.
7 कारण एखादा न्यायी मनुष्यकरता क्वचित कोणी मनुष्य मरी, कारण एखादा चांगला मनुष्यकरता कदाचित कोणी मराना बी धाडस करी.
8 पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
9 तर आते आपन ज्या त्याना रक्तमा न्यायी ठरी जायेल शेतस, त्यापेक्षा विशेषकरीन हाई शे की, त्यानाद्वारा आपन देवना क्रोधपाईन ताराई जासुत!
10 कारण आपन शत्रु ऱ्हाईसन बी देवनासोबत त्याना पोऱ्याना मरणना द्वारा आपला समेट करामा वना. तर त्यानापेक्षा हाई अधिक शे की, आपला समेट करामुये ख्रिस्तना जिवनमुये आपन ताराई जासुत!
11 इतलंच नही तर आते ख्रिस्तनाद्वारा आपलाले समेट हाई देणगी आते भेटेल शे तो आपला प्रभु येशु खिस्त यानाद्वारा आपन देवना ठायी अभिमान मिरवतस.
आदामकडीन मरण, खिस्तकडीन जिवन
12 म्हणीन एक मनुष्यनाद्वारा जगमा पाप वनं अनं पापनाद्वारा मरण वनं; अनी सर्वासनी पाप करामुये सर्वा मनुष्यसंवर मरण वनं.
13 कारण नियमशास्त्रना पहिले पाप जगमा व्हतंच; पन नियमशास्त्र नही ऱ्हाईनं म्हणजे पाप मोजामा येस नही.
14 तरी आदामपाईन मोशेपावत, ज्यासनी आदामना उल्लंघनंना रूपप्रमाणे पाप करा नव्हतात त्यासनावर बी मरणंनी राज्य करा; अनी आदाम तर, जो पुढं येवावं व्हता त्याना प्रतिरूप व्हता.
15 पन अपराधनी गोष्ट शे तशी कृपादाननी नही; कारण आदामना अपराधमुये जर बराच मरणात, तर त्यानापेक्षा हाई जास्त शे की, देवनी कृपा अनं येशु खिस्त ह्या एकच मनुष्यना कृपानी देणगी बराचजन करता विपुल व्हयनी.
16 अनी पाप करनारा एकमुये जसं परिणाम व्हयना, तसं दाननी गोष्ट नही; कारण एक अपराधमुये दंडआज्ञाकरता न्याय वना, पन बराच अपराधसमुये निर्दोष करासाठे कृपादान वनं.
17 कारण मरणनी एक अपराधमुये एकनाद्वारा राज्य करा, तर त्यानापेक्षा तर हाई जास्त शे की, ज्या कृपानी अनं नितीमत्वाना कृपादाननी विपुलता स्विकारतस, त्या एकना म्हणजे येशु खिस्तनाद्वारा अनंत जिवनमा राज्य करतीन.
18 म्हणीन जसं एकच अपराधमुये सर्वा मनुष्यसंले दंडाज्ञा ठरवाले कारण व्हयनं, तसं एकच निर्दोष करनामुये सर्वा मनुष्यसंले जिवननाकरता न्यायी ठरवाकरता कारण व्हयनं.
19 कारण जसं एकना आज्ञाभंगमुये बराचजन पापी ठरनात, तसच एकना आज्ञा पाळामुये बराचजन न्यायी ठरतीन.
20 तसच अपराध वाढाले पाहिजे म्हणीन नियमशास्त्र मझार वनं, पन जठे पाप वाढनं तठे देवनी कृपा आणखी जास्त व्हयनी.
21 म्हणजे जसं पापनी मरणना योगमा राज्य करा, तसं देवना कृपानी न्यायीपनणा योगमा प्राप्त होणारा सर्वकाळना जिवनकरता आपला प्रभु येशु खिस्त ह्यानाद्वारा राज्य करानं.