9
देव अनी त्याना लोकं
1 मी ख्रिस्तमा खरं सांगस, लबाड सांगस नही, अनी मनी विवेकबुध्दी बी पवित्र आत्मामा मनासोबत साक्ष देस की,
2 माले मोठं दुख व्हई ऱ्हाईना शे, अनी मना अंतःकरणमा सारखी व्हनारी यातना शे.
3 कारण शारीरिकदृष्टया ज्या मना नातेवाईक शेतस, त्या मना बंधुजनसकरता मी स्वतःले परमेश्वर पाईन शापित अनी ख्रिस्त कडतीन येगळं ऱ्हाणं असं शक्य राहतं तर मी तशी ईच्छा धरतु.
4 त्या इस्त्राएली शेतस; त्यासनाकरता दत्तकपण, गौरव, अनी करार, नियमशास्त्र, उपासना, अनं अभिवचन हाई त्यासनं शेतस;
5 महान पुर्वज बी त्यासना शेतस अनं त्यासनापाईन शारीरिकदृष्टया ख्रिस्त शे, तो सर्वासवर राहणारा देव युगानुयुग धन्यवाद असो; आमेन.
6 तरी देवनं वचन व्यर्थ व्हयनं असं नही; कारण इस्त्राएल वंशामधला त्या सर्वा इस्त्राएल शेतस असं नही.
7 अनी त्या अब्राहामना संतान शेतस म्हणीन त्या सर्वा त्याना पोऱ्या शेतस असं नही, तर इसहाकना वंशले तुना संतान म्हणतीन असं वचन शे;
8 म्हणजे शरिरना पोऱ्या ह्या देवना पोऱ्या नहीत, पन अभिवचनमा जन्मेल पोऱ्या फक्त संतान म्हणीन गणामा येल शेतस.
9 कारण अभिवचनना शब्द असं शे की, “मी योग्य येळले ईसु तवय साराले पोऱ्या राही.”
10 इतलंच नही, तर रिबकाले बी एकपाईन म्हणजे आपला पुर्वज इसहाक यानापाईन दोन पोऱ्या व्हयनात.
11 अनी पोऱ्यासना जन्म व्हयेल नव्हता, अनं त्यासनी काही बरा वाईट करेल नव्हता तवय निवडीप्रमाणे देवनी योजना कायम ऱ्हावाले पाहिजे म्हणीन, कृतीप्रमाणे नही तर पाचारण करनाराना ईच्छाप्रमाणे तो कायम ऱ्हावाले पाहिजे.
12 म्हणीन तिले सांगामा येल व्हतं की, मोठा धाकलानी सेवा करी.
13 कारण शास्त्रमा असं लिखेल शे की, इसहाकले सोडीसन “याकोबवर मी प्रिती करी पण एसावना व्देष करा.”
14 तर आपन काय सांगाले पाहिजे? देवना ठायी अन्याय शे का? असं शक्यच नही!
15 कारण तो मोशेले सांगस, “मी ज्यानावर दया करस त्यानावर दया करसु, अनी मी ज्यानावर कृपा करस त्यानावर कृपा करसु.”
16 तर मंग जो ईच्छा धरस त्यानामुये नही, किंवा जो धावपळ करस त्यानामुये नही, तर जो देव दया करस त्यानामुये हाई शे.
17 म्हणीन शास्त्रलेख फारोले असं सांगस, “मी मना सामर्थ्य प्रकट करावं अनी सर्व पृथ्वीमा मना नाव गाजाले पाहिजे.”
18 ह्यावरतीन त्यानी ईच्छा राही त्यानावर तो दया करस, अनी त्यानी ईच्छा राही त्याले तो कठीण करस.
देवना क्रोध अनी दया
19 ह्यानावर तुमनामाईन एक माले सांगी, तर मंग तो अजुन दोष का लावस? कारण त्याना योजनाले विरोध करी राहिना?
20 हे मनुष्या, देवले उलटीसन बोलणारा तु कोण? घडेल वस्तु आपला घडणाराले, तू माले असं का बनाडं, असं म्हणी का?
21 किंवा एकच गोळाना एक पात्र उत्तम कामसाठे अनं एक हलका कामसाठे करानं असं कुंभारले मातीवर अधिकार ऱ्हास नही का?
22 मंग आपण आपला राग दखाडाले पाहिजे अनी आपलं सामर्थ्य प्रकट कराले पाहिजे अशी जरी देवनी ईच्छा व्हई, तरी त्यानी नाशकरता तयार करेल क्रोधना पात्रसले मोठ्या सहनशीलतातीन वागाडं
23 अनी गौरवकरता पहिले ठरायेल दयाना पात्रासवर आपला गौरवनं धन प्रकट कराले पाहिजे म्हणीन त्यानी अस कर तर काय.
24 त्यानी ज्यासले फक्त यहूद्यासमातीन नही, पण गैरयहूदीसमातीन बी बलायेल शे त्या पण आपण त्या दयाना पात्र शेतस.
25 कारण तो होशेयना ग्रंथमा अस बी म्हणस की, ज्या मनी प्रजा नव्हतात त्यासले मी मनी प्रजा म्हणसु, अनी जी माले प्रिय नव्हती, तिले मी प्रिय म्हणसु.
26 अनी अस व्हई की, त्यासले ज्या ठिकाणवर, तुम्हीन मनी प्रजा नही, अस सांगेल व्हतं, तठे त्यासले जिवत देवना पुत्र सांगामा ई,
27 यशया बी इस्त्राएलबद्दल वरडीन सांगस की, इस्त्राएलना पोऱ्यासनी संख्या जरी समुद्रना वाळूनामायक व्हयनी, तरी एक अवशेष वाचाडामा ई.
28 कारण प्रभु आपलं कार्य पुर्ण अनं समाप्त करीसन आपलं वचन पृथ्वीवर अमलमा लई.
29 अनी यशयानी पहिले सांगेल प्रमाणे, सेनाधीश प्रभुनी जर आपलाकरता बीज ठेया नसतं तर आम्हीन सदोमनामायक राहतुत, अनी गमोरानामायक बनी जातुत.
पौलनी इस्त्राएलकरता प्रार्थना
30 मंग आपण काय बोलाले पाहिजे? तर ज्या गैरयहूदी न्यायीपणना मांग लागना नहीत त्यासले न्यायीपण म्हणजे ईश्वासतीन मिळणारं न्यायीपण मिळेल शे.
31 पण ज्या इस्त्राएली न्यायीपणना नियमना मांगे लागेल व्हतात तरी त्या पण त्या नियमपावत पोहचना नहीत.
32 अनी का? कारण त्या ईश्वासतीन नही, पण कृतीघाई त्यानामांगे लागनात. कारण त्या अडखळणारा दगडवर अडखळणात.
33 कारण अस लिखेल शे की, “दखा, मी सियोनमा एक अडखळणारा दगड, एक अडथळाना खडक ठेवस. अनी जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस तो लज्जित व्हवाव नही.”